इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’, आता मातृभाषेत घेता येणार शिक्षण
Engineering Courses in Regional Language
इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’, आता मातृभाषेत घेता येणार शिक्षण
राष्ट्रीय शैक्षणिक संस्था (एनटीए) शालेय शिक्षण मंडळाच्या विद्यमान परिस्थितीचा आढावा घेऊन स्पर्धात्मक परीक्षांसाठी अभ्यासक्रम ठरवेल, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
पुढील शैक्षणिक वर्षापासून तांत्रिक शिक्षण, विशेषतः अभियांत्रिकी अभ्यासक्रम मातृभाषेत देण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी काही आयआयटी आणि एनआयटीची यादी तयार केली जात आहे, अशी माहिती मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
याशिवाय, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि फेलोशिप वेळेवर मिळेल हे निश्चित करावं, असे निर्देशही शिक्षण मंत्र्यांनी युजीसीला दिले.
तसेच, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि फेलोशिप वेळेवर मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडवता याव्यात यासाठी एक हेल्पलाइन सुरू करण्यासही शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांनी मातृभाषेत शिक्षणाला प्राधान्य द्यावं यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं म्हटलं जात आहे