मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत मिळणार वाढीव गुण
Final Year Exam 2020
तसे झाले नाही तर प्रत्येक कॉलेज आपल्या पद्धतीने हे गुण देईल. यात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. हे गुण ठरविण्याची जबाबदारीही विद्यापीठाने लीड कॉलेजांवर दिली आहे. यामुळे सर्वांच्या गुणवाटपामध्ये एकसूत्रता नसेल, असे मतही प्राचार्य व्यक्त करत आहेत.
मुंबई विद्यापीठानं पदवी परीक्षांबाबत महत्त्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. पदवी परीक्षा कशा घेतल्या जाव्यात याचा पॅटर्न विद्यापीठानं दिला असून संलग्न महाविद्यालयांनी त्यानुसार परीक्षा घ्यायच्या आहेत.मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नियमित थिअरी परीक्षा १ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत, तर बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबरपासून बहुपर्यायी पद्धतीनं होणार आहेत. सर्व थिअरी परीक्षा ५० गुणांसाठी आणि एक तासाच्या कालावधीच्या असतील.
मुंबई विद्यापीठानं परीक्षांच्या आयोजनासंदर्भात मंगळवारी मध्यरात्री परिपत्रक जारी केलं. क्लस्टर पद्धतीनं महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेतल्या जाणार आहेत. म्हणजेच एक लीड महाविद्यालय आणि त्याअंतर्गत त्या परिसरातील ६ ते ७ विद्यालय अशी मिळून क्लस्टर्स असतील. या एका क्लस्टरमध्ये एका वेळी एका वेळापत्रकानुसार, परीक्षा होतील. प्रश्नपत्रिकाही क्लस्टरनिहाय असतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयाकडून सूचना मिळतील.
सर्व थेअरी परीक्षा १३ मार्च २०२० पर्यंत महाविद्यालयात शिकवण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. सर्व थेअरी परीक्षा ऑनलाइन होतील. बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असतील. परीक्षा ५० गुणांसाठी आणि १ तास कालावधीची असेल. ऑनलाइन पद्धतीने प्रत्येक विषयाची थेअरी परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक महाविद्यालयाने लगेचच मूल्यांकन प्रक्रिया सुरू करून विद्यार्थ्याचे गुण तयार करावेत, थेअरी परीक्षेचे मूल्यांकन हे ५० गुणांचे असल्यामुळे संबंधित विषयाच्या कमाल (६०, ७५, ८०, १०० इत्यादी) गुणांनुसार रुपांतर करून दोन दिवसांच्या आत विद्यापीठाच्या ऑनलाइन सिस्टिमध्ये अपलोड करावेत, अशा सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिल्या आहेत
बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबर २०२० पासून सुरू कराव्यात, असे निर्देश विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत. जर बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कॉलेजने फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेतल्या असतील, तर पुन्हा घेऊ नयेत
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होणार असून यासाठी संबंधित महाविद्यालयांकडून प्रकाशित होणारा गुगल फॉर्म विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२० पूर्वी भरून देणे अपेक्षित आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग, महामहिम राज्यपाल आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम वषार्तील विद्यार्थ्याच्या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार ऑक्टोबर महिन्यात या होतील, सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागून परीक्षेची तयारी करावी. परीक्षेचे स्वरूप हे घरी राहूनच ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे. तर, या परीक्षा एमसीक्यू म्हणजे मल्टीपल चॉईस क्वेशन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचे समजते, असे युवा सेनेचे सविच वरुण सरदेसाई यांनी म्हटले आहे.
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होणार असून यासाठी संबंधित महाविद्यालयांकडून प्रकाशित होणारा गुगल फॉर्म विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२० पूर्वी भरून देणे अपेक्षित आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनची सुविधा उपलब्ध होणार नाही, अशा विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थितीमध्येच ऑफलाईन परिक्षा देण्याची सुविधा राहणार आहे, परंतु त्याचे कारण विद्यार्थ्यांना गुगल फॉर्ममध्ये द्यावे लागणार आहे. अंतिम वषार्तील सर्व विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म भरावा लागणार आहे. संबंधित महाविद्यालये हा गुगल फॉर्म भरुन घेण्याची सोय विद्यार्थ्यांना लवकरच उपलब्ध करून देणार आहेत.
५ ते २९ ऑक्टोबर २०२० या कालावधीत अंतिम वषार्तील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील, असे नियोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे, इतरही विद्यापीठांकडून याच कालावधीत परीक्षांचे नियोजन करण्यात येईल, असे दिसून येते. युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेला मोठा विरोध केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही परीक्षा बंधनकारक झाली आहे. आता, ही परीक्षा MCQ पद्धतीने घेतली जाणार असल्याचे समजते. मात्र, विद्यार्थ्यांनी अशी परीक्षा घेण्यावर नाराजी दर्शवली असून इतर राज्यांप्रमाणेच असाईनमेंट बेस्ड परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
Final Year Exams 2020: पदवी परीक्षांच्या आयोजनासंदर्भात राज्य सरकारला शिफारशी सादर करण्यासाठी नेमलेल्या, कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखालील, समितीने पदवी परीक्षांसंदर्भातील अहवाल शुक्रवारी राज्य सरकारला सादर केला. या शिफारसींपैकी एक परीक्षा पद्धत विद्यापीठांनी निवडायची आहे आणि कोणत्या पद्धतीनुसार परीक्षा घेणार ते राज्य सरकारला ७ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत कळवायचे आहे. समितीच्या सर्व ११ शिफारशी या वृत्तात पुढे सविस्तर देण्यात आल्या आहेत.
कुलगुरू समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. विद्यापीठांनी या अहवालात नमूद केलेल्या पद्धतीनुसार परीक्षेची कोणती पद्धत निवडणार ते परीक्षांच्या वेळापत्रकासह राज्य सरकारला येत्या ७ सप्टेंबर २०२० पर्यंत कळवायचे आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत राज्य सरकार राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक घेणार आहे. या बैठकीत कुलगुरू समितीच्या अहवालातील शिफारशींवर चर्चा होऊन विद्यापीठ अनुदान आयोगाला त्याबाबतची माहिती दिली जाणार आहे तसेच ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढीची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरूंच्या समितीच्या सर्व ११ शिफारशी पुढीलप्रमाणे आहेत –
१) राज्यातील कोविड स्थिती लक्षात घेता विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या आरोग्याच्या काळजी याला सर्वोच्च प्राधान्य देऊन परीक्षांचे नियोजन करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी विद्यार्थी घरी बसून परीक्षा देतील, यासाठी सर्व विद्यापीठांनी प्रयत्न करावेत.
२) राज्यातील सर्व विद्यापीठांची गुणवत्ता राखणे आवश्यक आहे. विद्यापीठांची विषम परिस्थिती लक्षात घेऊन कमी कालावधीच्या परीक्षा विद्यापीठांनी घ्याव्या. त्या ऑनलाइन पद्धतीने घ्याव्या. जिथे ऑनलाइन शक्य नसेल तिथे ऑनलाइन आणि ऑफलाइन संमिश्र किंवा तेही शक्य नसेल तिथे पेन-पेपरने परीक्षा घ्याव्या. मात्र परीक्षा विद्यार्थ्यांनी घरबसल्याच देता यायला हव्यात. एमसीक्यू, ओेएमआर, असाइनमेंट पद्धत, ओपन बुक टेस्ट या पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय स्वीकारावा.
३) दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधांसह, त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या परीक्षा घ्यायच्या आहेत.
४) विशेष बाब म्हणून, विद्यार्थी एखाद्या विषयाला कोणत्याही कारणास्तव बसू शकला नाही, तर त्या विद्यार्थ्याला त्या विद्यापीठाने पुन्हा परीक्षेची संधी द्यायची आहे.
५) पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांच्या प्रकल्प अहवालांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने २९ एप्रिल २०२० ला निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यवाही करावी.
६) प्रात्यक्षिक परीक्षा आणि व्हायवासाठी स्काइप, अन्य मिटिंग अॅप्स किंवा टेलिफोनिक पद्धतीचा वापर विद्यापीठाने करावा.
७) परीक्षा घेऊन निकाल जाहीर करण्यापर्यंतची संपू्र्ण प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी.
८) अंतिम वर्ष अंतिम सत्र विद्यार्थ्यांचे बॅकलॉग पेपर (एटीकेटी) याच पर्यायांनी घेण्यात यावेत.
९) परीक्षांसाठी अभ्यासक्रम, परीक्षांची पद्धत, वेळापत्रक प्रत्येक विद्यापीठाने त्यांच्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर सूचित करावे आणि अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना वेळ द्यावा.
१०) वरील सर्व तरतूदी केवळ २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षासाठीच राहील.
११) या परीक्षांसाठी बदललेल्या परिस्थितीनुसार कराव्या लागणाऱ्या परीक्षांचे नियोजन, त्यासाठी विद्यापीठांची प्रचलित पद्धती, नियम, अधिनियम, परिनियम यांची तपासणी करून संबंधित प्राधिकरणाची मंजुरी लवकरात लवकर घेणे आवश्यक आहे. परीक्षांचे सुलभ नियोजन व्हावे यासाठी विद्यापीठे-महाविद्यालये प्रशासनातर्फे विनंती केली गेल्यास शासकीय संस्थांनी देखील त्यांना सर्वतोपरि सहकार्य करावे.
परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी…
परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मागच्या सेमिस्टरपुरतं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट दिली जाईल, तसा सूचना कुलगुरूंना देण्यात आल्या आहेत, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या तारखा घोषित
Final Year Exams 2020: पदवी परीक्षा कधी होणार यावर गुरुवारी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अधिक स्पष्टपणे भाष्य केले. पदवी परीक्षांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत लावायचे आहेत. त्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते ३० सप्टेंबर घेण्याचा प्रयत्न असणार आहे. लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतील, त्यांच्या तारखा विद्यापीठे त्यांच्या स्तरावर जाहीर करतील, असे सामंत यांनी गुरुवारी सांगितले. शुक्रवारी दुपारी १२ वाजता कुलगुरू समितीच्या अहवालाच्या शिफारशी जाहीर केल्या जाणार आहेत. दरम्यान, गुरुवारी दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उदय सामंत आणि कुलगुरू समिती सदस्यांची बैठक झाली.
या बैठकीनंतर उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, ‘परीक्षा सोप्या पद्धतीने व्हाव्यात यासाठी राज्यपालही अनुकूल आहेत. शिवाय विद्यार्थ्यांनी घरी बसून परीक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी दिली आहे.’
पदवीच्या अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांना एटीकेटी लागलेली आहे, त्यांच्या एटीकेटी परीक्षाही पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांप्रमाणेच घेण्यात येतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. ‘ज्याअर्थी प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत लावायचे आहेत, त्याअर्थी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून पदवी परीक्षांना सुरूवात होईल हे स्पष्ट आहे. विविध विद्यापीठे त्यांच्या स्तरावर तारखा पुढे-मागे ठरवतील,’ असे सामंत म्हणाले.
अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील कृषी, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची आज राजभवन येथे ऑनलाईनच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, परीक्षेसंदर्भात गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनानुसार दि. १५ सप्टेंबर पासून सुरू करून दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत निकालासह परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळा समोर ठेऊन दोन दिवसात शासनास कळवावे आणि राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक मंगळवारी घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करावी अशी सूचना राज्यपालांनी केली. परीक्षा पद्धती संदर्भात विद्यापीठांनी व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मंडळामध्ये परीक्षेसंदर्भात गठित केलेल्या समितीचा अहवाल सादर करून परीक्षा पद्धती निवडावी, असेही राज्यपाल महोदय यांनी सांगितले.
सामंत म्हणाले, राज्यपाल महोदय यांच्या अध्यक्षेतेखाली आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून राज्यातील कोविड-१९ ची सद्याची परिस्थिती आणि परीक्षेसंदर्भातील नियोजन कळविण्यात येईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत विद्यापीठांनी परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्या संदर्भातील तयारी पूर्ण करावी. या बरोबरच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची प्रक्रिया वेळेत पूर्ण करुन अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तर अशा विद्यार्थांच्या परीक्षेचे सुद्धा नियोजन करण्यात यावे, या संदर्भात चर्चा करण्यात आली.
सोर्स: मटा
विद्यापीठ व महाविद्यालयांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकारात्मक असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुंबई : विद्यापीठ व महाविद्यालयांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा> सोप्या पद्धतीने घेण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकारात्मक असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली
अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत कुलगुरूंचे अहवाल, विद्यार्थी प्रतिनिधी आणि संघटनांच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी उदय सामंत यांनी बुधवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. परीक्षा सहज, सोप्या पद्धतीने कशा घेता येतील यावर विचार करावा. कुलगुरूंचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्यावे, समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशा सूचना राज्यपालांनी केल्याचे सामंत यांनी भेटीनंतर माध्यमांना सांगितले. आॅनलाइन परीक्षांबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह गरीब विद्यार्थ्यांसमोर नेटवर्क आणि संसाधनांच्या समस्या आहेत. त्यावर सोप्या पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. कोणताही विद्यार्थी परीक्षांपासून वंचित राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित विद्यापीठाचीच असेल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
कोरोनात पदवी परीक्षा कशा घेतल्या जाणार; जाणून घ्या!
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेताना दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक असणार आहे. तसेच गरज भासल्यास विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर पुरविणे ही जबाबदारी शिक्षणसंस्थांची असणार आहे, अशा महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना बुधवारी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने विद्यापीठ आणि शिक्षणसंस्थांसाठी जारी केल्या आहेत. याशिवाय वय अधिक असलेले प्राध्यापक, गर्भवती कर्मचारी, प्राध्यापक, आजारांची पार्श्वभूमी असलेले कर्मचारी आणि प्राध्यापक यांना परीक्षा केंद्रावर काम देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या सूचना
- – जास्त गर्दी होणार नाही अशा प्रकारे आसन व्यवस्थेचे नियोजन करावे.
- जागोजागी साबण, सॅनिटायझर, मास्क आदींची उपलब्धता करून द्यावी.
- – विद्यार्थ्यांनी स्वत:चे मास्क, पाण्याची बाटली, सॅनिटायझर, ओळखपत्र बाळगावे.
- – शिस्तीचे पालन करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ पुरवावे.
- – आवश्यक त्या वर्गखोल्या उपलब्ध करून द्याव्यात.
- – संस्थांनी वाहतूक व्यवस्था उपलब्ध केल्यास त्यासाठी सॅनिटाझ केलेल्या गाड्या वापराव्या
- – केंद्रावर थर्मल स्क्रीनिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- एखाद्या विद्यार्थ्याला करोनाची लक्षणे असतील, तर त्याला जवळील आरोग्य केंद्रातून परीक्षा देण्याची सुविधा द्यावी.
- ये-जा करण्यासाठी पुरेसे मार्ग उपलब्ध असावेत.
- – केंद्रांचे सातत्याने सॅनिटायझेशन करावे.
- – केंद्रावर आल्यानंतर कोणाला लक्षणे आढळल्यास त्यांचे विलगीकरण करावे.
आरोग्य सेतू अॅप बंधनकारक
परीक्षा केंद्रावर जाताना प्रत्येक विद्यार्थ्याकडे आरोग्य सेतू अॅप असणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसेल, अशांना यातून सवलत देण्यात येणार आहे. याचबरोबर परीक्षा केंद्रांवर थुंकणे, सुरक्षित वावराचे नियम न तोडण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा;विद्यार्थ्यांची घरातूनच परीक्षा?
मुंबई : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता यावी, अशा परीक्षा पद्धतीचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत राज्यातील कुलगुरूंचेही एकमत झाले आहे. त्यानुसार परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात येणार आहे. या परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येतील. परीक्षा कोणत्या पद्धतीने होतील, याचा निर्णय बुधवारी (ता.2) जाहीर होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरू सोबत झूमच्या माध्यमातून ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत परीक्षा किती तारखेपर्यंत घेऊ शकतो, परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन, परीक्षेची तारीख किती असावी, निकालाची तारीख किती असावी, परीक्षा पद्धत कशी असेल, अशा विविध विषयांवर कुलगुरू यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. अमरावती व यशवंतराव चव्हाण विद्यापीठाने परीक्षा सुरू करून निकालाची वेळ नोव्हेंबरपर्यंत असावी, अशी भूमिका मांडली आहे. तर उर्वरित 11 विद्यापीठांनी परीक्षा घेण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. विद्यापीठांना वेळापत्रक निश्चित करण्यासाठी आणखी एक दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर परीक्षा पद्धतीसंदर्भात गठीत केलेल्या समितीची बैठक बुधवारी (ता.2) सकाळी होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपत्कालीन व्यवस्थापनाची बैठक घेउन परीक्षे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. हा निर्णय युजीसीला कळविण्यात येणार असल्याचे, सामंत म्हणाले.
31 ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठांनी अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात निकालासह सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या विद्यापीठांना स्थानिक पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा तांत्रिक अडचणी आल्यास त्यांनी आपली निकालाची प्रक्रिया जास्तीत जास्त 10 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावी अशा सूचना सामंत यांनी यावेळी केल्या.
- – 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत परीक्षा आणि निकालासह संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार
- अडचणी असणाऱ्या विद्यापीठांना 10 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार
- – राज्यातील 7 लाख 92 हजार 385 विद्यार्थी देणार परीक्षा
- – परीक्षेचा पर्याय निवडण्याचे अधिकार कुलगुरूंना
एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णयही लवकरच
एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता विधी व न्याय विभाग आणि ऍडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. यानंतर या परीक्षांचा निर्णयही लवकरच जाहीर करण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले. </p>
Final Year Exam 2020
विद्यार्थ्यांना पदवी परीक्षा घरबसल्या देता येणार; उच्च शिक्षणमंत्र्यांची ग्वाही
Final Year Exam 2020: पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्र परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सप्टेंबर महिना दिला जाईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून विविध विद्यापीठे विविध तारखांना परीक्षा घ्यायला सुरूवात करतील, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. शिवाय संपूर्ण परीक्षा ही कमी कालावधीची असेल. विद्यार्थ्यांना फार त्रास न होता, शक्यतो घराबाहेर न पडता, परीक्षा केंद्रापर्यंत न जाता परीक्षा देता यावी याबाबत सर्व कुलगुरूंचे एकमत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देता यावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सामंत म्हणाले. परीक्षांच्या तारखा काय, स्वरुप काय याबाबतची घोषणा येत्या दोन-तीन दिवसांत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील अनेक विद्यापीठांनी परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढीची मागणी केली आहे. त्यामुळे आम्ही २ सप्टेंबर रोजी आपत्कालीन व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाकडे तशी विनंती करणार आहोत, अशी माहिती सामंत यांनी दिली. अंतिम वर्षाच्या परीक्षासंबंधी विविध विषयांबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. सोमवारी या समितीची बैठक पार पडली. त्यानंतर सामंत पत्रकार परिषदेत बोलत होते. समिती २ सप्टेंबर रोजी पुन्हा एकवार बैठक घेऊन सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुसरा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करणार आहेत.
एकूण ७ लाख ९२ हजार ३८५ विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठांना घ्यायची आहे. मुंबई विद्यापीठ, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर तसेच एसएनडीटी विद्यापीठाने ३१ ऑक्टोबरपर्यंत तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठाने १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी केली आहे. तर यासंदर्भात २ सप्टेंबर रोजी आपत्कालीन व्यवस्थापनाची बैठक घेऊन त्यानंतर यूजीसीकडे आम्ही मुदतवाढीची मागणी करणार आहोत, असे सामंत म्हणाले.
‘परीक्षा चांगल्या पद्धतीने, चांगल्या वातावरणात घेण्याचा प्रयत्न केला जाईल. शक्यतो, विद्यार्थ्यांना घरातल्या घरात बसून परीक्षा कशा प्रकारे देता येईल हे प्राधान्याने पाहिले जाईल,’ अशी माहितीही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली