Final Year Exams ज्यांची पदवी परीक्षा हुकली, त्यांची परीक्षा दिवाळीनंतर
Final Year Exams 2020
Final Year Exam 2020: राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या / अंतिम सत्राच्या परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑनलाइन आणि अपवादात्मक परिस्थितीत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. या सर्व परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या असून काही परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.
कोविड-१९ मुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा दिवाळीनंतर १५ दिवासांमध्ये घेण्याचे निर्देश विद्यापीठांना देण्यात आले असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले. आज मंत्रालयात सामंत यांनी सर्व कुलगुरुंची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन परीक्षा आणि निकालाचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कोविड-१९ मुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा दिवाळीनंतर १५ दिवासांमध्ये घेण्यासाठी संबंधित विद्यापीठाने नियोजन करावे, तसेच जे विद्यार्थी यावर्षी नापास झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा एक महिन्यात घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. असे सांगून सामंत यांनी कोविडचे संकट असतानासुद्धा सर्व विद्यापीठाने यशस्वीपणे परीक्षा प्रक्रिया यशस्वी राबविली त्याबद्दल सर्व कुलगुरु आणि परीक्षेशी संबंधित असलेले सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
आज काही विद्यापीठांनी निकाल जाहीर झालेल्या विषयांचे प्रातिनिधीक स्वरुपात विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली. या गुणपत्रिकेमध्ये कोणताही बदल नाही. मागच्या वर्षाप्रमाणेच ही गुणपत्रिका देण्यात आली. तसेच पदवी समारंभामध्येसुद्धा मागच्या वर्षाप्रमाणेच पदवी देण्यात येणार आहे.
विद्यापीठाने कोविडच्या पार्श्वभूमिवर सर्व उपाययोजना करुन परीक्षा यशस्वीपणे राबविली. एकाही विद्यार्थ्यांला कोविडची बाधा होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली आहे. तसेच ज्या विद्यापीठांमध्ये परिक्षेसंदर्भात तांत्रिक अडचणी आल्या आहेत, त्यासंदर्भात सत्यशोधन समिती गठीत केली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) मार्गदर्शक सूचनानुसार शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासंदर्भात दिवाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरुंसोबत बैठक घेवून त्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन परिषदेची बैठकीत चर्चा करुन राज्यातील कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेवून शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. या सर्व परीक्षांचा अहवाल राज्यपाल महोदयांकडे पाठविण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.
Re Examination For Final Year Students
अंतिम वर्षाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा
अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नोव्हेंबरमध्ये पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे.
पुनर्परीक्षा घेण्याचे नियोजन
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत वेळेत निर्णय होऊ शकला नाही. अखेर न्यायालयात सुनावणीनंतर यंत्रणा कामाला लागली होती. विद्यार्थांचे नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्ही पर्याय विद्यार्थांना उपलब्ध करून देण्यात आले. त्यानुसार गेल्या १२ ऑक्टोबरपासून ऑनलाइन व ऑफलाइन सुरू झालेल्या या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा लॉगीन न होणे, परीक्षा सुरू होणे, सर्व्हर एरर, टेक्स्ट सबमिट न होणे, चुकीच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होणे, राज्य सामाईक परीक्षा (सीईटी) व अन्य शासकीय स्पर्धा आदी परीक्षांसोबतच विद्यापीठाच्या परीक्षा आदी कारणांमुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. त्याअनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारींबाबत बैठक होऊन येत्या ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन स्वरूपात पुनर्परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
वेबपोर्टलवरील गुगल फॉर्ममध्ये माहिती भरावी
ज्या विद्यार्थ्यांकडून तक्रारी आल्या, अशाच विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे संबंधित अपेक्षित तपशील व अन्य माहिती २ नोव्हेंबरपर्यंत पाठवली जाणार आहे. तक्रारी प्राप्त होऊनही ज्यांना ऑनलाइन परीक्षेबाबत ई-मेल प्राप्त झालेले नसतील, अशा विद्यार्थ्यांनी ३ नोव्हेंबरला रात्री बारापर्यंत विद्यापीठाच्या वेबपोर्टलवरील गुगल फॉर्ममध्ये माहिती भरावी, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले.
‘अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत देशपातळीवर एकच निर्णय घ्यावा’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Final Year Exams 2020: Students are the future of the country and their lives should not be endangered, so Chief Minister Uddhav Thackeray once again urged Prime Minister Narendra Modi not to take the final year exams of non-professional courses. Students should pass with average marks (aggregate). There is no answer as to how long the corona will last. Therefore, it is necessary to take a single decision at the national level as soon as possible for how long the future of the students will hang in the balance, said Chief Minister Thackeray.
Final Year Exams 2020
Final Year Exams 2020: विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचे जीवन धोक्यात घालता कामा नये त्यामुळे नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेऊ नयेत अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. विद्यार्थ्यांना सरासरी मार्क्स देऊन (ॲग्रीगेट) उत्तीर्ण करण्यात यावे. करोनामुळे किती काळ असे राहणार याचे उत्तर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य किती काळ टांगून ठेवणार, यासाठी देशपातळीवर एकच निर्णय लवकरात लवकर घेण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
आज प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत करोना उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींशी राज्यातील पदवी परीक्षांच्या पेचाविषयी चर्चा केली.
वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार, मौखिक स्वरूपात परीक्षा घेण्याची गरज आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर करोना युद्धात त्यांच्या इच्छेनुसार मदत घेता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात करोना उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह सज्ज अशा साडेतीन लाख खाटा उपलब्ध असल्याचे सांगतानाच यासुविधांसाठी डॉक्टर, नर्से, कर्मचारी यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
परीक्षा विद्यार्थी हिताच्या: यूजीसी
अंतिम वर्षाच्या परीक्षा न होणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नसून राज्यांनी एकतर्फी निर्णय घेतल्यास परीक्षा न घेता बहाल केलेल्या पदव्यांना मान्यता मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सज्ज राहावे, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगालाच पदवी संबंधित नियम करण्याचे अधिकार असून राज्य सरकार या नियमांमध्ये दुरुस्त्या करू शकत नाही, असा युक्तिवाद विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केला.
सोर्स:मटा