मराठा समाजातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; आता व्यवसायासाठी मिळणार अर्थसहाय्य!

Financial Assistant To the Youth Of the Maratha Community For Business

Under the Chhatrapati Rajaram Maharaj Entrepreneurship and Skills Development Campaign, Annasaheb Patil Economic Backward Development Corporation is implementing a loan scheme to provide assistance to the youth and those who want to become entrepreneurs from the economically weaker sections of the Maratha community in the district.

 मराठा समाजातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; आता व्यवसायासाठी मिळणार अर्थसहाय्य!

 पुणे :  जिल्ह्यातील मराठा आर्थिक दुर्बल घटकातील तरुण-तरुणी आणि उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व्यक्तींना सहाय्य पुरवण्याच्या दृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने कर्ज पुरवठा योजना राबविण्यात येत असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 अण्णासाहेब पाटील वैयक्तिक कर्ज योजनेत जिल्ह्यातील एक हजार ४१८ लाभार्थ्यांना विविध बँकेमार्फत ८० कोटी ६० लाख ६८ हजार रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील ८४१ लाभार्थ्यांना दोन कोटी ५३ लाख ७१ हजार रुपये व्याज परतावा देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा समन्वयक संकेत लोहार यांनी दिली .

 मराठा समाजातील युवक युवतींनी नोकरीपेक्षा स्वतःचा उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच, सिबिल प्रणाली अंतर्गत बँकांनीही या योजनेंतर्गत प्रकल्पांना मंजुरी द्यावी, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले आहे

 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेऊन दुग्ध व्यवसाय, प्रवासी वाहने, किराणा दुकान, शेळीपालन, झेरॉक्स सेंटर, सायकल दुरुस्ती, चर्मोद्योग , फोटोग्राफी, गारमेंट्स, रिक्षा, घरगुती मसाले आदी व्यवसाय यशस्वीरित्या सुरू केले आहेत. महामंडळाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे कार्यालयामार्फत केले जाते. मराठा प्रवर्गातील लाभार्थ्यांनी महामंडळाच्या संधीचा लाभ घेऊन व्यवसायाला सुरुवात करावी, असे आवाहन पुणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!