अग्निशामक दलातील कर्मचारी भरतीचा मार्ग अखेर मोकळा

Fire Department Bharti 2020 Starting Soon

Fire Department BHarti 2020 Starting Soon –मुंबई अग्निशमन दलातील कर्मचारी भरतीवरील निर्बंध अखेर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी उठवले आहेत. त्यामुळे दलातील भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र तूर्तास ही भरती अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची होणार आहे.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

 
भरतीचा मार्ग मोकळा

मुंबई अग्निशमन दलातील कर्मचारी भरतीवरील निर्बंध अखेर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी उठवले आहेत. त्यामुळे दलातील भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र तूर्तास ही भरती अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची होणार आहे. त्यात अग्निशमन जवानांना प्राधान्य दिले जाणार आहे. अग्निशमन जवानांची सर्वाधिक म्हणजे ६०० हून अधिक पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ यंत्रचालकांची पदे भरण्यास प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

अग्निशमन दलात विविध प्रकारची एकूण ३,६९४ पदे आहेत. त्यापैकी सुमारे २,८०० पदे सध्या कार्यरत आहेत, तर ९००हून अधिक पदे रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक रिक्त पदे ही अग्निशमन जवानांची आहेत. जवानांच्या २,३४० पदांपैकी ६०४ पदे रिक्त आहेत. १५९ चालक-यंत्रचालक, ६९ प्रमुख अग्निशामक, ६६ दुय्यम अधिकारी, १७ वरिष्ठ केंद्र अधिकारी, १० केंद्र अधिकारी इतकी पदे रिक्त आहेत. एकूण पदांपैकी सुमारे २५ टक्के पदे रिक्त आहेत. अग्निशमन जवान संवर्गातील पदे सरळसेवा भरतीने भरण्याचा प्रस्ताव दलाकडून प्रशासनाला सादर करण्यात आला होता. दरम्यान, करोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने आयुक्तांनी ३० सप्टेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात काटकसरीचे धोरण अवलंबण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ही पदे नजीकच्या काळात भरण्याची शक्यता नव्हती. अग्निशमन जवान अत्यावश्यक सेवेत येत असल्याने ही पदे भरण्यासाठी दलाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून ही पदे भरण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे.

सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीची माहिती दलाकडे माहितीच्या अधिकारात मागितली होती. त्यावर दलाने दिलेल्या उत्तरात अग्निशमन जवानाची ८२ पदे रिक्त असून कार्यरत ४७ व संभाव्य ३५ पदे पदोन्नतीने भरणार असल्याचे म्हटले आहे. यंत्रचालकांची ३२ पदे मार्च २०२० मध्ये भरण्यात आली आहेत. ५५ रिक्त पदे भरण्यासाठी संबंधितांकडून वाहन परवाना आणि प्रशिक्षण कार्यवाही केली जात आहे. याच दरम्यान त्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव प्रशासनाला सादर करण्यात येणार असल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे.

दुय्यम अधिकारी संवर्गाच्या ६६ पदांचे प्रकरण २००८ पासून औद्योगिक न्यायालयात होते. पुढे हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झाले. या प्रकरणात कामगार संघटनांचा समेट घडवण्यात आला असून या पदांच्या सुधारित अर्हता सादर करण्याकरिता प्रशासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावात वरिष्ठ केंद्र अधिकाऱ्यांच्या चार पदांचाही समावेश आहे. तसेच केंद्र अधिकारी संवर्गाची सहा पदे भरण्याचा प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.

आरक्षित पदे रिक्तच

अग्निशमन दलाच्या कार्यशाळेत विविध संवर्गाची पदे असून त्यातील काही पदांसाठी आरक्षण असल्याने ८ जानेवारी २०१८ पासून फक्त खुल्या संवर्गातील पदे भरण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे आरक्षित पदे रिक्त आहेत. तर, काही पदांसाठी विहित अर्हता धारण करणारे कर्मचारी उपलब्ध नसल्याने रिक्त आहेत. कामगार संवर्गातील पदे प्रमुख कर्मचारी, अधिकारी विभागाकडून भरण्यात येतात. अर्हता धारण करणारे कर्मचारी उपलब्ध होतात तशी ही पदे पदोन्नतीने भरण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

सोर्स: म. टा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. SANTOSH says

    I am interested in job

  2. VITTHAL BABURAO ZORE says

    Evry work attend for me

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!