Fit India Quiz 2021 – ३.२५ कोटींचे बक्षिस, अशी करा नोंदणी
Fit India Quiz 2021
The Ministry of Sports, Government of India has announced free registration of 2 lakh school children for the Fit India Quiz. A notice to this effect has been posted on the official Twitter handle of the Sports Authority.
क्रीडा मंत्रालयातर्फे फिट इंडिया क्विझ; ३.२५ कोटींचे बक्षिस, अशी करा नोंदणी
FIT India Quiz 2021 : भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने फिट इंडिया क्विझसाठी २ लाख शालेय विद्यार्थ्यांची मोफत नोंदणी करणार असल्याची घोषणा केली आहे. स्पोर्ट्स अथोरिटीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेद्वारे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर जास्तीत जास्त दोन विद्यार्थ्यांना क्विझसाठी मोफत नावनोंदणी करता येणार आहे.
FIT India Quiz 2021 Registration
भारतात पहिल्यांदाच शालेय मुलांसाठी फिटनेस आणि स्पोर्ट्स क्विझ अधिक आकर्षक बनवण्यात आले आहे. देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना एक मोठी भेट म्हणून युवक आणि क्रीडा मंत्रालयाने जाहीर केले की, १ लाख शाळांमध्ये नोंदणी केलेले पहिले २ लाख विद्यार्थी आता देशव्यापी भारत क्विझसाठी मोफत नोंदणी करू शकतात. प्रत्येक शाळा जास्तीत जास्त २ विद्यार्थ्यांची मोफत नोंदणी करू शकते. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर मोफत नोंदणी केली जाणार आहे.
शालेय मुलांमध्ये फिटनेस आणि खेळांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी हा निर्णय जाहीर केला. ‘फिट इंडिया क्विझ पंतप्रधानांच्या कल्पनेतील फिट इंडिया मूव्हमेंटचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आली आहे. याद्वारे सुदृढ आयुष्य जगण्याच्या महत्त्वाबद्दल मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फिट इंडिया क्विझमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी, पहिल्या १ लाख शाळांमधील २ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क माफ करण्यात आले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत मंत्री अनुराग ठाकूर यांनी १ सप्टेंबर रोजी देशव्यापी क्विझचे उद्घाटन केले. खेळ आणि फिटनेसवर ही एक पहिली देशव्यापी क्विज झाले. स्टार स्पोर्ट्सवर राष्ट्रीय फेरीचे प्रसारण होणार आहे. या क्विझमधील विजेत्यास ३.२५ कोटी रुपये बक्षीस रक्कम म्हणून देण्यात येणार आहे.
या क्विझमध्ये देशातील प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधी असून ते ऑनलाइन आणि ब्रॉडकास्ट फेऱ्यांतील विजेते असतील. हा फॉर्मेट सर्वसमावेशक पद्धतीने तयार केला गेला आहे. ज्यामुळे देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या सहकाऱ्यांसोबत फिटनेस आणि क्रीडा ज्ञानाची चाचणी घेण्याची संधी मिळते. फिट इंडिया क्विझमध्ये सहभागी होण्यासाठी तपशीलवार माहिती फिट इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
जिल्हा-अमरावती
तालुका-धामंनगाव
पीन-444710
नाव-पवन कांबळे ््््््््््््््््््््््््््््््््््््््