कसा भरायचा अकरावी ऑनलाइन अर्ज भाग – १?
FYJC Online Admission 2020 How To Fill 11th Online Form Part-1
The eleventh online application process has begun. This year the registration form for 11th admission has to be filled online on mobile / computer. Because of the lockdown, schools may not be able to help students in a big way. So we are telling you how to fill the online application carefully by the students-parents
कसा भरायचा अकरावी ऑनलाइन अर्ज भाग – १?
अकरावी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. यावर्षी ११ वी प्रवेशाचा रेजिस्ट्रेशन फॉर्म स्वतः मोबाईल/कॉम्पुटरवर ऑनलाइन भरायचा आहे. लॉकडाऊन असल्यामुळे कदाचित शाळांची मदत विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणावर होणार नाही. त्यामुळे विद्यार्थी-पालकांनी काळजीपूर्वक ऑनलाइन अर्ज कसा भरायचा ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत…
११ वी प्रवेश पहिला टप्पा आजपासून सुरु..
ऑनलाइन अर्ज कसा भराल:-
https://mumbai.11thadmission.org.in/Registration/Registration.aspx या लिंकवर क्लिक करावे.
सर्व प्रथम वरील लिंकवर क्लिक करा एक फॉर्म दिसेल.
1. एमएमआर रिजनमधील विद्यार्थ्यांनी Within MMR Area वर क्लिक करा. इतरांनी Outside MMR Area तर महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांनी Outside Maharashtra Area या पर्यायावर क्लिक करा.
2. Fresher वर क्लिक करा.
3. SSC वर क्लिक करा.
4.Seat No. बॉक्स मध्ये तुमचा स्वतःचा 10वी परीक्षा बैठक क्र.(Seat No.) लिहा.
उदा. A011025.
5. Seat No.च्या खाली लाल रंगातील Get SSC Data वर क्लिक करा.
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे उद्घाटन
6. तुमचे पूर्ण नाव, आईचे नाव व इतर माहिती तुम्हाला दिसेल.
7. Mobile Number बॉक्स मध्ये तुमचा चालू असलेला मोबाईल नं. टाका.
8. Security Question पुढे Select ला क्लिक करा त्यातील एक प्रश्न निवडा, त्याच्या पुढच्या बॉक्स मध्ये त्या प्रश्नाचे उत्तर लिहा.
उदा. What is the name of your grandfather?
पुढच्या बॉक्स मध्ये तुमच्या आजोबांचे नाव लिहा.
(तुम्ही कोणताही प्रश्न निवडू शकता व त्याचे उत्तर लिहून तो प्रश्न व उत्तर लक्षात ठेवा)
9. तुमच्या 11वी ऍडमिशन फॉर्मचा पासवर्ड तुम्ही सेट करा पुढच्या बॉक्स मध्ये परत तोच पासवर्ड लिहा व लगेच ते वहीत लिहून घ्या व लक्षात ठेवा.
10. CAPCHA CODE बॉक्स मध्ये त्या बॉक्स खाली जे दिसते आहे सेम तसेच पाहून लिहा(टाईप करा)
11. वरील तुम्ही दिलेली सर्व माहिती बरोबर असेल तर परत एकदा चेक करून खालील हिरव्या Register बटन वर क्लिक करा.