बारावीच्या नव्या अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा जाहीर

Hsc Board Maharashtra Board 12th Marking System Framework Declared

बारावीच्या नव्या अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा जाहीर

बारावीच्या नव्या अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा बोर्डाने जाहीर केला आहे…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या पूनर्रचित व नविन पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठीची सुधारित मूल्यमापन योजना, घटकनिहाय गुणविभागणी व अंतर्गत मूल्यमापन योजना याला सरकारने मान्यता दिली असून त्यासंदर्भातील मूल्यमापन आराखडा राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्य मंडळाकडून वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.

इयत्ता बारावीच्या भाषेतर गटातील इतिहास,भूशास्त्र, राज्यशास्त्र, बालविकास, वस्त्रशास्त्र, तर्कशास्त्र, अर्थशास्त्र, पूस्तपालन व लेखाकर्म, व्यापार संघटन, चिटणीसांची कार्यपध्दती, सहकार, कृषीविज्ञान, माहिती तंत्रज्ञान-विज्ञान, कला व वाणिज्य, शिक्षणशास्त्र, पर्यावरण व जलसूरक्षा या विषयांच्या सुधारित मूल्यमापन योजनेची यंदा अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मंडळाने निश्‍चित केलेल्या सुधारित मूल्यमापन योजनेसाठी येत्या काळात शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात विषय शिक्षकांना विषयनिहाय मूल्यमापन आराखडे आणि अन्य तपशीलाची माहिती देण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
बदलेल्या मुल्यमापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्ञान,आकलन, उपयोजन आणि कौशल्य यावर भर दिला आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांचे प्रमाण वाढविल्याने विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान घेता येणार आहे. परंतु त्यांना मूल्यमापन पत्रिका सोडविताना देण्यात आलेला कालावधी कमी पडणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची नक्कीच होणार आहे.

अंतर्गत गुण असल्यामुळे मुल्यमापनात विद्यार्थ्यांचा बोर्डाच्या लेखी परीक्षेच्या दृष्टीने संपूर्ण अभ्यास व्हावा यावर भर दिल्याचे अभ्यासगटाचे सदस्य प्राचार्य अविनाश ताकवले यांनी सांगितले.

सोर्स:मटा
1 Comment
  1. Rajesh girhe says

    Bahut achya kiya sir ap logone thank you

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!