IBPS RRB: ऑफिस असिस्टंट पदाच्या भरतीसाठी अर्ज

IBPS RRB Bharti 2020

IBPS RRB: ऑफिस असिस्टंट पदाच्या भरतीसाठी अर्ज

IBPS RRB: ऑफिस असिस्टंट पदाच्या भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात झाली आहे…

IBPS RRB Recruitment 2020: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्डाने सोमवारी ऑनलाइन नोंदणीसाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे. ग्रुप बी ऑफिस असिस्टंट पदाच्या भरतीसाठी ही नोंदणी होत आहे.

IBPS RRB Recruitment 2020 : योग्य आणि इच्छुक उमेदवार IBPS च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन IBPS RRB Recruitment साठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अखेरची तारीख ९ नोव्हेंबर २०२० आहे. उमेदवारांनी अर्ज भरून त्याचे एक प्रिंट आउट घ्यावे. शुल्क भरण्याची अखेरची तारीखही ९ नोव्हेंबर आहे.

अर्ज शुल्क

एससी/एसटी/दिव्यांग/माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी अर्जाचे शुल्क १७५ रुपये आहे आणि इतर प्रवर्गांसाठी ते ८५० रुपये आहे.

अर्ज कसा करायचा?

  • – IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावर जा. अधिकृत संकेतस्थळाचा पत्ता www.ibps.in
  • – ‘Common Recruitment Process for RRBs (CRP RRBs IX) for Recruitment of Group “B” – Office Assistant (Multipurpose)’ या पर्यायावर क्लिक करा.
  • – उमेदवारांनी CLICK HERE FOR NEW REGISTRATION या पर्यायावर देखील क्लिक करा..
  • – नंतर सिस्टीम एक प्रोव्हिजनल नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड जनरेट करेल आणि ही माहिती स्क्रीनवर दिसेल.
  • – प्रोव्हिजनल नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड उमेदवारांनी लिहून घ्यावा.
  • – प्रोव्हिजनल नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सांगणारा एक मेल आणि एसएमएस उमेदवारंना पाठवण्यात येईल. उमेदवारांनी सेव्ह केलेली माहिती या लॉग इननंतर उघडेल. आवश्यकता वाटल्यास ती एडिट करता येईल.

उमेदवारांनी पुढील गोष्टी अपलोड कराव्यात –

१) छायाचित्र
२) स्वाक्षरी
३) डाव्या हाताचं थब्म इंप्रेशन

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा

 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!