IBPS RRB प्रीएक्झाम ट्रेनिंग परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी

IBPS RRB 2021 Admit Card

The Institute of Banking Personnel Selection (IBPS) is recruiting for the posts of RRB Officers (Scale 1, 2,) and Office Assistant (Multipurpose). The application deadline has expired and the examination will be held from July 19 to 25. Admission letter has been announced for this.

इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मध्ये आरआरबी ऑफिसर्स (स्केल १, २,) आणि ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पस) या पदांवर भरती आहे. यासाठी अर्ज भरण्याची मुदत संपली असून १९ ते २५ जुलैदरम्यान परीक्षा होणार आहे. यासाठी प्रवेश पत्र जाहिर करण्यात आले आहे.

प्री एक्झाम ट्रेनिंग १९ जुलै ते २५ जुलैदरम्यान आयोजित केली जाणार आहे. आयबीपीएस आरआरबी प्रवेश पत्र २०२१ असे डाऊनलोड करा.

How to Download IBPS RRB Admit Card 2021

  • सर्वात आधी अधिकृत वेबसाइट ibps.in वर क्लिक करा.
  • “IBPS RRB Admit Card 2021 for the pre-exam training” लिंकवर क्लिक करा.
  • मागितलेली माहिती भरा आणि सबमिट करा
  • प्रवेश पत्र तुमच्या समोर असेल
  • आता प्रवेश पत्र डाऊनलोड करा
  • भविष्यातील उपयोगासाठी प्रिटं आऊट काढा

इंस्टीट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) द्वारे देशातील ४३ बॅंकामध्ये ४५०० हून अधिक पदांची भरती केली जात आहे. आयबीपीएस आरआरबी वॅकेन्सी २०२१ (IBPS RRB 2021) च्या माध्यमातून नोकरी दिली जाणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा


IBPS RRB Prelims Admit Card 2020

आयबीपीएस आरआरबी परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी झाले आहेत….

IBPS RRB Prelims Admit Card 2020: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection,IBPS) आयबीपीएसने आरआरबी ऑफिसर स्केल १ आणि ऑफिस असिस्टंट प्रिलिम्स परीक्षा २०२० साठी प्रवेश पत्र जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, ते अधिकृत पोर्टल ibps.in वर जाऊन अॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात.

IBPS PO/MT Admit Card 2020


IBPS: ऑफिस असिस्टंट भरती परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी

आयबीपीएस आरआरबीच्या पूर्व परीक्षा २०२० लांबणीवर टाकण्याचा निर्णय मागे…

IBPS RRB prelims admit card 2020: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने आरआरबी पूर्व परीक्षा २०२० संदर्भातील आपला निर्णय मागे घेतला आहे. एक दिवसापूर्वी म्हणजेच सोमवारी ही परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा आयबीपीएसने केली होती. मात्र मंगळवारी ताज्या निर्णयानुसार या परीक्षा लांबणीवर न टाकता नियोजित वेळेतच होतील असे संस्थेने स्पष्ट केले आहे. आयबीपीएस आरआरबी ऑफिसर्स स्केल १ साठी पूर्व परीक्षा १२ आणि १३ सप्टेंबर २०२० रोजीच नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. या परीक्षांचे प्रवेशपत्र देखील आयबीपीएसने जारी केले आहे. तर ऑफिस असिस्टंट पदासाठी १९, २० आणि २६ सप्टेंबर २०२० रोजी परीक्षा होईल.

आयबीपीएसचे अधिकृत संकेतस्थळ ibps.in वर जाऊन उमेदवारांना प्रवेश पत्र डाऊनलोड करता येणार आहे. या वृत्ताच्या अखेरीस आम्ही प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची थेट लिंक देत आहोत. ऑफिस असिस्टंट पदासाठी परीक्षा ऑनलाइन स्वरुपात होणार आहे. १९, २० आणि २६ सप्टेंबर २०२० रोजी ही परीक्षा होईल. पूर्व आणि मुख्य अशा दोन टप्प्यांत ही परीक्षा होणार आहे. जे उमेदवार पूर्व परीक्षेत पात्र ठरतील, त्यांना मुख्य परीक्षेत सहभागी होता येईल.

उमेदवारांना अॅडमिट कार्डवर दिलेल्या किंवा एसएमएस / मेलद्वारे त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकाद्वारे परीक्षा केंद्रावर किती वाजता पोहोचायचे तो स्लॉट देण्यात येईल. या दिलेल्या स्लॉटमध्येच त्यांनी परीक्षा केंद्रावर पोहोचणे बंधनकारक आहे.

उमेदवारांनी मास्क, ग्लोव्ह्ज, पाण्याची पारदर्शक बाटली, वैयक्तिक सॅनिटायझर (५० एमएल), एक साधं पेन, परीक्षेसंदर्भातील कागदपत्रे (कॉल लेटर/अॅडमिट कार्ड, आयडी कार्ड (ओरिजनल), आयडी कार्डची फोटोकॉपी) आदी सोबत बाळगायचे आहे.

थेट लिंकद्वारे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

IBPS RRB पूर्व परीक्षांसंदर्भान नवे परिपत्रक वाचण्यासाठी  येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!