ICMR Fellowship 2021-ICMR परीक्षेची प्रवेश प्रक्रिया सुरु

ICMR Fellowship 2021

ICMR Fellowship 2021- The application process for the Junior Research Fellowship Entrance Test (Fellowship 2021) has started. An information sheet for JRF exam has also been uploaded. July 31, 2021 is the last date for this exam. Interested and eligible candidates can apply online by visiting the official website main.icmr.nic.in.

ICMR Fellowship 2021-ICMR  परीक्षेची प्रवेश प्रक्रिया सुरु

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने २०२१ साठी फेलोशिप परीक्षा(Fellowship 2021) ची घोषणा केली आहे. आयसीएमआर जेआरएफ २०२१ (ICMR JRF 2021) परीक्षेच्या तारखेसहीत पूर्ण शेड्यूल जाहीर केले आहे. या वेळेस ही परीक्षा पीजीएमआर चंदीगड (PGIMER Chandigarh) च्या सहयोगाने आयोजित केली आहे.

ज्युनिअर रिसर्च फेलोशिप प्रवेश परीक्षेची (Fellowship 2021)अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. यासोबतच जेआरएफ परीक्षेसाठी माहिती पत्रक देखील अपलोड करण्यात आले आहे. ३१ जुलै २०२१ ही या परीक्षेची शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट main.icmr.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात. आयसीएमआर जेआरएफ २०२१ (ICMR JRF 2021) परीक्षा १२ सप्टेंबरला होणार आहे. ही कॉम्प्युटर आधारित परीक्षा असणार आहे.

आयसीएमआर ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (ICMR JRF) परीक्षा सप्टेंबर २०२१ मध्ये होणार आहे. आयसीएमआरने जाहीर केलेल्या शेड्यूलनुसार,परीक्षा रविवार, १२ सप्टेंबर २०२१ दुपारी ३ पासून संध्याकाळी ४.३० पर्यंत देशाच्या वेगवेगळ्या केंद्रांवर होणार आहे.

नोटिफिकेशन आणि अर्जाची माहिती

आयसीएमआर नवी दिल्ली आणि पीजीआयएमइआर चंदीगडच्या वेबसाइट्सवर या परीक्षेचे नोटिफिकेशन जूनच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया १ जुलैपासून ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरु आहे. ही संभाव्य तारीख आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!