केंद्राच्या टांकसाळीत नोकरीची सुवर्णसंधी; पदवी, आयटीआयधारक हवेत 

IGM Recruitment 2021

IGM  Recruitment 2021: The India Government Mint, Kolkata (West Bengal) invited an online application form for the posts of Supervisor (Technical Operations), Junior Office Assistant, Junior Bullion Assistant, Junior Technician (Electronics) Posts. There is a total of 54 vacancies to be filled under IGM Recruitment 2021.Apply Before Last date.

 केंद्राच्या टांकसाळीत नोकरीची सुवर्णसंधी; पदवी, आयटीआयधारक हवेत

 केंद्र सरकारची मिनी रत्न कंपनी म्हणजेच टांकसाळमध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. कोलकाता येथील टांकसाळीमध्ये विविध पदांवर भरती निघाली आहे. यासाठी जाहिरातही काढण्यात आली आहे.

 इंडियन गव्हर्नमेंट मिंटद्वारे १७ जानेवारीला जाहिरात (सं. IGMK/HR (Estt.)/Rect./01/2020) प्रसिद्ध करण्यात आली आहे.  यामध्ये ज्युनियर ऑफिस असिस्टंट, ज्युनियर टेक्निशिअन आणि अन्यसाठी एकूण 54 पदांसाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आयजीएम-एसपीएमसीआयएलच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन igmkolkata.spmcil.com अर्ज करायचा आहे. अर्जाची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 20 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर शेवटची मुदत ही 19 फेब्रुवारी असणार आहे. अर्ज आणि जाहिरातीच्या आवश्यक लिंक खाली देण्यात आल्या आहेत.

IGM SPMCIL Bharti Vacancy Details – रिक्त पदे आणि पगार…

  • सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशंस) – 10 जागा. 26,000 ते 1,00,000 रुपये
  • इंग्रेवर 3 – 6 पदे. 8,500 ते 20,850 रुपये
  • ज्युनियर ऑफिस असिस्टंट – 12 जागा. 8,350 ते 20,470 रुपये
  • ज्युनियर बुलियन असिस्टंट – 10 जागा. 8,350 ते 20,470 रुपये
  • ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) – 16 जागा. 7,750 ते 19,040 रुपये

Qualification – शिक्षणाची अट…

  • सुपरवायझरसाठी मॅकेनिकल, सिव्हील, मेलर्जीकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा डिप्लोमा. वय 18 ते 30 वर्षे.
  • इंग्रेवर 3 साठी फाईन आर्टमध्ये पदवी. वय 18 ते 28 वर्षे.
  • ज्युनियर ऑफिस असिस्टंट व ज्युनियर बुलियन असिस्टंटसाठी कोणत्याही विषयातील पदवी. इंग्रजी किंवा हिंदीमध्ये 40 शब्द प्रती मिनिट टायपिंग. वय 18 ते 28 वर्षे.
  • ज्युनियर टेक्निशियनसाठी इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट, सोबत एनएसी सर्टिफिकेट. वय 18 ते 25 वर्षे.

IGM SPMCIL Recruitment Application Fees – फीस 

अर्जासाठी 600 रुपये शुल्क आकारले जाणार आहे जे ऑनलाईन भरता येणार आहे.

असा करा अर्ज.- How to Apply

इच्छुक उमेदवारांनी आयजीएम-एसपीएमसीआयएलच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जावे. यानंतर तेथील करिअर सेक्शनच्या लिंकवर क्लिक करावे. यानंतर संबंधित भरतीच्या सेक्शनमध्ये 20 जानेवारी 2021 पासून उपलब्ध होणाऱ्या ऑनलाईन फॉर्मच्या लिंकवर क्लिक करावे. ही लिंक उद्यापासून अॅक्टिव्ह होणार आहे. अर्जामध्ये आवश्यक असलेली माहिती भरावी लागणार आहे.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!