भारतीय लष्करात संधी ! इंजिनिअर, वकिलांना वेतन 1.77 ते 2.18 लाख, जाणून घ्या
Indian Army Vacancy 2020
भारतीय लष्करात संधी ! इंजिनिअर, वकिलांना वेतन 1.77 ते 2.18 लाख, जाणून घ्या
भारतीय इंजिनियरींगच्या कोणत्याही शोखेतून पदवी मिळवणाऱ्यांसाठी (BE/B Tech) भारतीय सैन्यात सेवा देण्याची संधी चालून आली आहे. इंजिनियर पदवीधारकांसाठी शॉर्ट सर्व्हीस कमिशन टेक्निकल कोर्स अंतर्गत जागा निघाल्या आहेत. यात पुरुष आणि महिला या दोन्हीसाठी भरती होणार आहे.
पदांची नावे
शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक्निकल)
शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक्निकल)
वेतन श्रेणी – ५६,१०० रुपये प्रति महिना ते १,७७,५०० रुपये प्रति महिना
अर्ज कसा आणि कधी करायचा?
या भरतीसाठी उमेदवारांनी जॉइन इंडियन आर्मी joinindianarmy.nic.in या द्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अॅप्लिकेशन लिंक बुधवारी १४ ऑक्टोबर २०२० पासून अॅक्टिव्ह होणार आहे. या भरतीसंबंधी पूर्ण तपशील जारी केला जाणार आहे. ज्या ऑफिशिअल वेबसाइट पेज वर तुम्हाला नोटिफिकेशन आणि अॅप्लिकेशनचा तपशील मिळणार आहे, त्याची लिंक पुढे दिली जाणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ नोव्हेंबर २०२० आहे. कोणत्याही उमेदवाराला यासाठी शुल्क भरायचे नाही. ही प्रक्रिया नि:शुल्क आहे.
कशी होणार निवड?
या कोर्ससाठी योग्य उमेदवारांची निवड फिजिकल एलिजिबिलिटी टेस्ट, इंटरव्ह्यू आणि मेडिकल परीक्षेच्या आधारे केलं जाईल.
आवश्यक पात्रता
मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान २० आणि कमाल २७ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांसाठी सवलत आहे.
Indian Army SSC Tech Vacancy notification, application तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.