पोस्टात निघाली 2582 पदांवर बंपर भरती; दहावी उत्तीर्ण तरुणांना परीक्षेशिवाय मिळेल सरकारी नोकरी
Indian Post Office Recruitment 2020
दहावी उत्तीर्ण झालेल्या तरुणांना भारत सरकारची नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. भारतीय टपाल खात्याने दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी एकूण 2582 पदांवर भरती काढली आहे. इच्छुक उमेदवार भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाइट www.appost.in/gdsonline/home.aspx वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर 2020 आहे. दरम्यान, भारतीय पोस्टल विभाग कोणतीही परीक्षा न घेता दहावी उत्तीर्ण तरुणांना थेट नोकरी देत आहे.
कोणत्या पदांवर भरती
भारतीय टपाल विभागाने शाखा पोस्ट मास्टर, सहायक शाखा पोस्ट मास्टर आणि पोस्टल सर्व्हर या पदांसाठी अर्ज मागितले आहेत.
वय –
या पदांसाठी उमेदवार 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावे. वयोमर्यादा 12 नोव्हेंबरपासून मोजली जाईल. त्याचबरोबर वयाच्या सवलतीत सरकारी नियमांनुसार सुविधा उपलब्ध असेल.
अर्ज फी –
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागेल. अनुसूचित जाती / जमाती प्रवर्ग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे.
झारखंड, पंजाब आणि ईशान्यसाठी पोस्ट
भारतीय टपाल खात्याची ही भरती अधिसूचना पंजाब, झारखंड आणि उत्तर-पूर्व राज्यांसाठी जारी करण्यात आली आहे. झारखंडमधील 1118, ईशान्येकडील 948 आणि पंजाबमधील पदांची संख्या 516 आहे.
सोर्स: पोलीसनामा
भारतीय टपाल विभागातील हजारो पदांवर बंपर रिक्त पदांवर भरती काढण्यात आली आहे. तामिळनाडू सर्कल ऑफ इंडिया पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक (जीडीएस)च्या 3000हून अधिक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. टपाल खात्यात जीडीएस पदांवर नोकरी मिळविण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट appost.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात.
पदांची संख्या
- तामिळनाडू पोस्टल सर्कल भरती अंतर्गत ग्रामीण डाक सेवक(जीडीएस)च्या 3162 पदांची भरती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था / बोर्डाकडून दहावी उत्तीर्ण केलेली असावी
वय श्रेणी
- टपाल खात्यात जीडीएसच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व जास्तीत जास्त वय 40 वर्षे निश्चित केले गेले आहे
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: 01 सप्टेंबर 2020
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2020
अर्ज फी
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागेल. एससी/एसटी वर्ग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे
अर्ज कसा करावा
भारतीय टपाल खात्याच्या तामिळनाडू सर्कलमध्ये या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ appost.in वर भेट द्यावी लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे.
अधिक माहितीकरिता येथे क्लीक करा
Indian Post Office Recruitment 2020
Indian Post Office Recruitment 2020: A large recruitment drive has been organized in the Post Department (India Post). The recruitment has been made for the post of Rural Postman in Odisha Postal Circle. Accordingly, 2060 candidates will be selected. 10th pass candidates will be able to apply for this. The online application process has started.
Post Office: पोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार उमेदवारांची निवड
ग्रामीण पोस्टमनच्या 2060 जागा रिक्त आहेत. यासाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
पोस्ट खात्यामध्ये (India Post) मोठ्या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. ओडिसा पोस्टल सर्कलमध्ये ग्रामीण पोस्टमन या पदासाठी ही भरती काढली आहे. यानुसार 2060 उमेदवारांती निवड केली जाणार आहे. यासाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
Odisha Postal Circle GDS Recruitment 2020: ग्रामीण पोस्टमनच्या 2060 जागा रिक्त आहेत. या पदासाठी 10000 रुपये पगार देण्यात येणार आहे. उमेदवारांना गणित, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे. वय 18 ते 40 वर्षे निर्धारित करण्यात आले आहे.
मुख्य तारखा….
- ऑनलाईन अर्ज : 1 सप्टेंबरपासून नोदणीला सुरुवात
- अंतिम दिनांक 30 सप्टेंबर राहणार आहे.
अर्ज कसा करावा?
वरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी www.appost.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून पुढील प्रक्रियेसाठी सोबत ठेवावी. 10 वीच्या गुणांवर उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
[email protected] at.doldongargaon ta.maregaon.dist.yavtmal.post.nandepera
Thanks
Harshal Titarmare Weltur Tudka road
??