IRB Bharti- भारतीय राखीव बटालियनमध्ये कमांडन्ट ते कॉन्स्टेबलची विविध पदे रिक्त !

Indian Reserve Battalion Recruitment 2021

The government has announced recruitment. There are about 60 vacancies in the Reserve Battalion (IRB) from Commandant to Sub-Inspector of Police and a total of 972 vacancies. The highest number of 727 vacancies are for constables. There are 50 vacancies for Assistant Sub-Inspectors and 12 vacancies for Constables. Apart from this, all the 36 posts of ‘A’ category officers are vacant. There are 36 vacancies for B category officers and 900 vacancies for C category officers.

भारतीय राखीव बटालियनमध्ये कमांडन्ट ते कॉन्स्टेबलची विविध पदे रिक्त !

सरकारने नोकरभरतीची घोषणा केली आहे. पोलीस खात्यातही मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त पदांचा आढावा घेतल्यास पोलीस खात्याप्रमाणे भारतीय राखीव बटालियनमध्ये (आयआरबी) कमांडन्ट ते पोलीस उपनिरीक्षक या वरिष्ठ श्रेणीतील सुमारे ६० तर सर्व मिळून ९७२ पदे रिक्त आहेत.

आयआरबीच्या तीन तुकड्या गोव्यात कार्यरत आहेत. या तिन्ही तुकड्यांत कमांडन्ट ते कॉन्स्टेबल तसेच इतर प्रशासकीय कर्मचारी मिळून ९७२ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक ७२७ रिक्त पदे ही कॉन्स्टेबलची आहेत. ५० रिक्त पदे सहाय्यक उपनिरीक्षकांची, तर १२ रिक्त पदे हवालदार पदाची आहेत. याशिवाय ‘ए’ श्रेणी अधिकाऱ्यांची सर्व म्हणजे ३६ पदे रिक्त आहेत. ‘बी’ श्रेणी अधिकाऱ्यांचे ३६ पदे तर ‘सी’ श्रेणी अधिकाऱ्यांची ९०० पदे रिक्त आहेत.

एका तुकडीत अ, ब आणि क श्रेणी अधिकारी आणि कर्मचारी मिळून प्रत्येक १ हजार ७ पदे मंजूर करण्यात आली होती. यात एक कमांडन्ट, तीन उप कमांडन्ट, ७ उपअधीक्षक, ७ निरीक्षक, २३ उपनिरीक्षक, १८ साहाय्यक उपनिरीक्षक, १६० हवालदार, ६७५ कॉन्स्टेबल, एक वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी यांचा समावेश आहे.

यांतील उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल यांची थेट भरती करण्यात आली होती. इतर पदे भरती नियमानुसार, बढती देऊन भरण्यास मान्यता देण्यात आली होती. तसेच इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांची थेट भरती करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!