GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Information regarding Staff Selection Commission Examinations

SSC Exam 2020 Date details

SSC Exam 2020: The Commission has issued a circular regarding the dates of examinations of the Staff Selection Commission. According to the circular, the schedule of CHSL 2019 Tier 1, Junior Engineer Paper 1 2019, Stenographer Group C and D, CGL 2018 Skill Test and other examinations will be released after the lockdown.

स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षांसंदर्भात माहिती

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांच्या तारखांसंदर्भात आयोगाने परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार सीएचएसएल २०१९ टिअर १, ज्युनिअर इंजिनीअर पेपर १ २०१९, स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि डी, सीजीएल २०१८ ची स्कील टेस्ट आणि अन्य परीक्षांचं शेड्युल लॉकडाऊन संपल्यानंतर जारी केलं जाणार आहे.

उमेदवारांच्या सोयीसाठी परीक्षांच्या तारखांच्या घोषणा परीक्षेच्या किमान एक महिना आधी जारी केली जाणार आहे. परिपत्रकात असंही सांगितलं आहे की देशभर लॉकडाऊनचे निर्बंध हटवण्यासंबंधी केंद्र सरकार जे निर्णय घेत आहे, ते ध्यानात घेऊन त्यानुसार परीक्षांच्या वार्षिक कॅलेंडरचा आढावा घेतला जाईल. परिपत्रकानुसार, लॉ़कडाऊन संपल्यानंतर आयोग प्रलंबित निकालाच्या तारखाची घोषणा करणार आहे. लॉकडाऊनमुळे मूल्यांकनाचे कामही पूर्ण झालेले नाही. १८ मे २०२० रोजी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

Umang App Updatse – UMANG अॅप वर मिळणार अपडेट

युनिफाइड मोबाइल अॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स अर्थात UMANG अॅप वर स्टाफ सिलेक्शन कमिशनशी संबंधित प्रत्येक माहिती, परीक्षा, निकालासंबंधीचे अपडेट मिळणार आहेत. ज्या उमेदवारांकडे अँड्रॉइड फोन आहे, ते गुगल प्ले स्टोरमध्ये आणि अॅपल वापरकर्त्यांसाठी अॅप स्टोरवर जाऊन हा अॅप डाऊनलोड करता येईल. UMANG व्यतिरिक्त SSC संबंधीची सर्व माहिती ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरदेखील उपलब्ध असेल.

सौर्स : मटा

Leave A Reply

Your email address will not be published.