ISRO bharti Results Declared
ISRO bharti Results Declared
इस्रोच्या सायंटिस्ट / इंजिनीअर भरती परीक्षेचा निकाल जाहीर
ISRO Published the results of Scientist and Engineer Exam January 2020 on their official website. We provide the link of results below on this page. Candidates who appear the written exam for that posts they were able to check their results here. Candidates keep visit on our website for further updates.
ISRO Recruitment Results 2020
इस्रो सायंटिस्ट / अभियंता लेखी परीक्षेला हजेरी लावणारे उमेदवार आपला निकाल पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर – isro.gov.in येथे भेट देऊ शकतात. इस्रोने जानेवारी २०२० मध्ये घेतलेल्या सायंटिस्ट / इंजिनीअर परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) वैज्ञानिक / अभियंता ‘एससी’ (इलेक्ट्रॉनिक्स, मेकेनिकल आणि कॉम्प्युटर सायन्स) या पदांवरील भरतीसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेचा निकाल आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे.
इस्रोने वैज्ञानिक / अभियंता ‘एससी’ (इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि संगणक विज्ञान) भरतीसाठी लेखी परीक्षा १२ जानेवारी २०२० रोजी विविध केंद्रांवर घेतली होती.
How to check the results – इस्रो सायंटिस्ट / इंजीनिअर परीक्षेचा निकाल २०२० कसा पाहाल?
उमेदवार इस्रो सायंटिस्ट / अभियंता परीक्षेचा निकाल २०२० पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप बाय स्टेप सूचनांचे पालन करा –
१. इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – isro.gov.in
२. करिअरच्या पेजवर जा, RESULTS OF THE WRITTEN TEST HELD ON 12.01.2020 असे लिहिलेल्या लिंकवर जा.
३. तुमची शाखा निवडा आणि मग तुम्ही थेट निकालाच्या पेजवर जाल.
४. ctrl+F किज् दाबा आणि तुमचा रोल नंबर टाइप करा.
५. इस्रो वैज्ञानिक / अभियंता परीक्षेचा निकाल २०२० स्क्रीनवर दिसेल.
६. संदर्भासाठी आपल्या इस्रो सायंटिस्ट / अभियंता परीक्षेचा निकाल २०२० डाऊनलोड करा आणि प्रिंट आऊट घ्या.