अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ८४ आयटीआयमध्ये ८ हजार ३४८ जागांसाठी प्रवेशप्रक्रिया
DVET ITI Admission 2020
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ८४ आयटीआयमध्ये ८ हजार ३४८ जागांसाठी प्रवेशप्रक्रिया
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना देण्याच्या अनुषंगाने यंदा राज्यातील 44 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीतील वर्ग चालविले जाणार आहेत. याबरोबरच 40 खाजगी आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या चालविण्यात येणार आहेत. या माध्यमातून 84 आयटीआयमध्ये एकुण 8 हजार 348 जागांवर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी उपलब्ध होत आहे. उद्या 1 ऑगस्टपासून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर सुरु होणाऱ्या नियमित आयटीआयच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबरोबरच या वर्गांचीही प्रवेशप्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यु या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते. या समुदायातील इच्छूक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थी नियमित आयटीआयसाठीही अर्ज करु शकतात. तसेच अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय आयटीआयमध्ये असलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीतील वर्गामध्ये सर्वसाधारण आणि इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही 30 टक्के जागांवर प्रवेश दिला जाणार आहे, जेणेकरुन सर्व समाजातील विद्यार्थी एकत्र शिक्षण घेऊ शकतील, अशी माहितीही मंत्री श्री. मलिक यांनी दिली.
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता 44 शासकीय व 40 खाजगी आयटीआय मधून प्रवेशासाठी अनुक्रमे 197 व 189 तुकड्या या वर्षी प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्याद्वारे एकूण 8 हजार 348 विद्यार्थी या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. शासकीय आयटीआयमध्ये 4 हजार 304 तर खाजगी आयटीआयमध्ये 4 हजार 044 जागा भरल्या जाणार आहेत, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.
प्रवेश प्रक्रिया
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून उद्या 1 ऑगस्ट 2020 पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. अल्पसंख्याकांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या वर्गांचीही प्रवेश प्रक्रिया याच पद्धतीतून होईल. तथापी, सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया सुरु होत असून आयटीआय वर्ग कधी सुरु होणार याबाबत लॉकडाऊनसंदर्भातील शासनाच्या नियमांना अनुसरुन नंतर माहिती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
उत्तीर्ण, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी
प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुतीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. चालू वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीचा प्रभावी वापर केला जाणार असून प्रवेश अर्ज व अर्ज नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, प्रमाणपत्रे तपासणी, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे ऑनलाईन करता येणार आहेत. प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
DVET ITI Admission through admission.dvet.gov.in is starting from 1st August 2020. The Online registration process will start now. The Detail Advertisement PDF link is given below. Read all instructions carefully & apply for the Admission of ITI 2020 – 2021.
राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) प्रवेश प्रक्रिया यंदा केंद्रीभूत ऑनलाईन पद्धतीने (सेंट्रलाइज्ड) करण्यात येणार आहे. त्यासाठी १ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी सविस्तर माहितीपुस्तिका ३१ जुलैपासून संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शनमध्ये पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्यातील खासगी आणि शासकीय आयटीआयमधील प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू होत आहे.. अधिक तपशील जाणून घ्या…
प्रवेशअर्ज शुल्क: Application Fees
- राखीव प्रवर्ग उमेदवार (Unreserved Category): रु. १५०/-
- महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार (Outside Maharashtra State): रु. ३००/-
- राखीव प्रवर्ग उमेदवार (Reserved Category): रु. १००/-
- अनिवासी भारतीय उमेदवार (Non Residential Indian): रु. ५००/-
अर्ज करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे –
- ऑनलाईनप्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दि. १ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध होईल.
- प्रवेश अर्जात “Primary Mobile Number (प्राथमिक मोबाईल नंबर)” नोंदविणे अनिवार्य आहे. एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच प्रवेश अर्ज नोंदविता येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रीयेबाबत उमेदवारांना वेळोवेळी SMS व्दारे माहिती व OTP (One Time Password) कळविण्यात येईल. सबब, उमेदवारांनी आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक ऑनलाइन प्रवेश अर्जात “Primary Mobile Number” म्हणून नोंदविणे आवश्यक आहे. तसेच सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिये दरम्यान बदलता येणार नाही.
- तथापि, उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर “हरकती नोंदविणे” या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन तसा बदल करता येईल. तद्नंतर प्रवेश अर्जातकोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.
- प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावरच पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादरकरण्यासाठी प्रवेशसंकेतस्थळावर नोंदणीक्रमांक (Registration Number) वपासवर्ड (Password) व्दारे प्रवेश (Login) करुन “Submit/ Change Options/ Preferences” व्दारे सादर करावेत.
- पहिल्याप्रवेशफेरीसाठी व्यवसायवसंस्थानिहायविकल्पवप्राधान्यपूर्ण भरल्यानंतर Option Form ची छापीलप्रत (Print Out) घ्यावी.
- उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चूकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेशप्रक्रीयेतुन बाद होईल.