राज्यातील तुरुंगांमध्ये वैद्यकीय अधिकाऱयांची पदे रिक्त
Jail Officers Bharti 2021
The High Court today directed the state government to immediately fill the vacancies of medical officers in the jail in view of the ongoing COVID period. The High Court found that there were no medical officers in the state jails. Add to that. Mihir Desai said that there is a doctor in Taloja jail but there are vacancies in other jails.
राज्यातील तुरुंगांमध्ये वैद्यकीय अधिकाऱयांची पदे रिक्त
प्राप्त बातमी नुसार, सध्या राज्यातील तुरुंगांमध्ये वैद्यकीय अधिकाऱयांची पदे रिक्त असून या रिक्त पदावरून मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला फटकारले. तळोजा येथील तुरुंगात केवळ ३ आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. मात्र नागपूर, कोल्हापूर, अमरावती, मुंबई तुरुंगात वैद्यकीय अधिकाऱयांची वानवा आहे. सध्या सुरु असलेल्या कोविडचा काळ लक्षात घेता या तुरुंगातील वैद्यकीय अधिकाऱयांची रिक्त पदे तत्काळ भरा असे आदेश हायकोर्टाने आज राज्य सरकारला दिले. कारण सध्या कोरोना मुळे हि सध्याची गरज आहे.
महाराष्ट्र राज्यातील विविध तुरुंगांत शिक्षा भोगणाऱया अनेक कैद्यांनाकोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी राज्यातील तुरुंगांमध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्याचे हायकोर्टाच्या लक्षात आले. त्यावर ऍड. मिहीर देसाई यांनी माहिती देताना सांगितले की, तळोजा येथील तुरुंगात डॉक्टर आहे पण इतर तुरुंगांत ही पदे रिक्त आहेत.
त्यावर राज्यातील तुरुंगात डॉक्टरांची एकतृतीयांश पदे रिक्त असल्याचे निदर्शनास येताच हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. येरवडा तुरुंगात 8 हजार कैदी आहेत, पण एकही डॉक्टर नसल्याचे न्यायमूर्ती म्हणाले. कोरोना येऊन वर्ष उलटले अजून किती काळ सरकारी रुग्णालयांवर अवलंबून राहणार अशी विचारणा खंडपीठाने तुरुंग प्रशासनाला केली. तसेच तुरुंगात मेडिकल स्टाफ, वैद्यकीय अधिकाऱयांची पदे तत्काळ भरण्याचे सरकारला आदेश देत सुनावणी 19 मेपर्यंत तहकूब केली.