जेईई ॲडव्हान्सची तारीख लवकरच होणार जाहीर 

EE Advanced 2021 Exam Date Announced Soon

Are you preparing for JEE Advanced Exam-2021 !! So you should definitely check the website of this exam. The organizing body of the exam, IIT, Kharagpur, has recently uploaded a detailed information booklet regarding the exam on its website. It is also said that the revised dates of the exam will be announced soon.

जेईई ॲडव्हान्सची तारीख लवकरच होणार जाहीर

तुम्ही ‘जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा-२०२१’ची तयारी करत आहात का!! तर तुम्ही या परीक्षेचे संकेतस्थळ नक्की पहायला हवे. परीक्षेच्या आयोजक संस्थेने म्हणजेच ‘आयआयटी, खडगपूर’ने परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती पुस्तिका नुकतीच संकेतस्थळावर अपलोड केली आहे. तसेच परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यंदा जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेचे आयोजन करणाऱ्या खडगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी, खडगपूर) परीक्षेसाठी माहिती पुस्तिका नुकतीच प्रसिद्ध केली आहे. यामध्ये परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे, आयआयटीमध्ये उपलब्ध असणारे अभ्यासक्रम, आरक्षित जागा यांचा सविस्तर तपशील दिला आहे. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेची तारीख लवकरच घोषित करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे. जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेच्या प्रतीक्षेत असणारे विद्यार्थी ‘https://jeeadv.ac.in’ या संकेतस्थळावर जाऊन परीक्षेची माहिती पुस्तिका पाहू शकणार आहेत.

जेईई ॲडव्हान्स्ड २०२०साठी यशस्वीपणे नोंदणी केलेल्या, मात्र या परीक्षेतील पेपर एक आणि पेपर दोन साठी अनुपस्थित राहिलेले सर्व विद्यार्थी देखील जेईई ॲडव्हान्स्ड २०२१ परीक्षेला उपस्थित राहण्यास पात्र राहणार आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन पोर्टलवर पुन्हा नव्याने शुल्क भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. एखादा विद्यार्थी सलग दोन वर्षांमध्ये जास्तीत जास्त दोन वेळा या परीक्षेसाठी पात्र ठरू शकणार आहेत.


JEE Advanced 2020 Exam Date Announced

JEE Advanced  2020 Exam: TThe entrance test for engineering courses in IITs across the country will be held in the month of JEE Advanced in August. The date of the exam was also announced by IIT Delhi today. JEE Advanced Examination is scheduled on 23rd August.

This year, IIT Delhi is responsible for organizing the JEE exams. Earlier, Union Manpower Minister Dr. Ramesh Paokhriyal had announced the dates of JEE Main exams. He had given the information while interacting with the students in a webinar on May 5. Accordingly, JEE Main will be held from 18th to 23rd July 2020. The JEE Advanced Exam is generally conducted within a month after the JEE Main Exam. Therefore, it has been decided to conduct JEE Advanced Exam on 23rd August 2020, exactly one month after the end of JEE Main on 23rd July.

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेची तारीख जाहीर

देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा जेईई अॅडव्हान्स्ड ऑगस्ट महिन्यात होणार आहे. परीक्षेची तारीखही आज आयआयटी दिल्लीने जाहीर केली.

देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा जेईई अॅडव्हान्स्ड ऑगस्ट महिन्यात होणार आहे. परीक्षेची तारीखही आज आयआयटी दिल्लीने जाहीर केली. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा २३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे.
NEET and JEE 2020 Exam Date Announced

यंदा आयआयटी दिल्लीकडे जेईई परीक्षांच्या आयोजनाची जबाबदारी आहे. यापूर्वी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी जेईई मेन परीक्षांच्या तारखांची घोषणा केली होती. ५ मे रोजी एका वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी माहिती दिली होती. त्यानुसार जेईई मेन १८ ते २३ जुलै २०२० या कालावधीत होणार आहे. साधारणपणे जेईई मेन परीक्षा झाल्यानंतर महिनाभराच्या कालावधीत जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा घेण्यात येते. म्हणूनच जेईई मेन २३ जुलै रोजी संपल्यानंतर बरोबर एक महिन्याने २३ ऑगस्ट २०२० रोजी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

सौर्स : मटा

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!