KVS Admission-KVS कडून पहिलीच्या प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर

Kendriya Vidyalay Admission 2022-2023

Kendriya Vidyalaya Admission 2022-2023: Kendriya Vidyalaya has published a revised schedule of KVS Admission 2022-23 for the year 2022-23 in the country and abroad. According to the revised schedule of KVS Admission 2022-23 announced by the organization, online lottery will be held on 29th April 2022. Also, the first list of first class admissions will be released by KVS today. The second list will be announced on May 6 and the third list on May 10, 2022.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

KVS Admission 2022-23: केंद्रीय विद्यालय (Kendriya Vidyalaya) संघटनेने २०२२-२३ या वर्षासाठी देश आणि परदेशातील केंद्रीय विद्यालयांमध्ये होणाऱ्या प्रवेशाचे (KVS Admission 2022-23) सुधारित वेळापत्रक  प्रसिद्ध केले आहे. संस्थेने जाहीर केलेल्या केव्हीएस प्रवेश २०२२-२३   च्या सुधारित वेळापत्रकानुसार, ऑनलाइन लॉटरी २९ एप्रिल २०२२ रोजी आयोजित केली जाणार आहे. तसेच इयत्ता पहिलीच्या प्रवेशाची पहिली यादी देखील केव्हीएसतर्फे आजच प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ६ मे रोजी दुसरी यादी आणि १० मे २०२२ रोजी तिसरी यादी जाहीर केली जाणार आहे. केव्हीएसच्या सूचनेनुसार, पहिल्या दोन याद्यांनंतर जागा रिक्त राहिल्या असतील तरच तिसरी यादी जाहीर केली जाणार आहे.

पुढील वर्गांसाठी प्रवेश
२१ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या यादीत ज्या पालकांच्या मुलाचे नाव समाविष्ट आहे आणि त्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नसेल, अशा पालकांनी लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. केंद्रीय विद्यालय संघटनेने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, इयत्ता दुसरी आणि त्यानंतरच्या प्रवेशासाठी २८ एप्रिल ही अंतिम तारीख होती.

केंद्रीय विद्यालय संघटनेच्या सूचनेनुसार, केव्हीएस इयत्ता पहिली प्रवेश २०२२ ची पहिली यादी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. यासोबतच पालकांना संबंधित शाळेत जाऊन अर्ज केलेल्या केंद्रीय विद्यालयाचा सूचना फलकही पाहता येणार आहे. सर्व शाळांना त्यांच्या सूचना फलकावर यादी प्रदर्शित करण्याच्या सूचना केव्हीएसकडून देण्यात आल्या आहेत.

पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित
केंद्रीय विद्यालय (Kendriya Vidyalaya) संस्थेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी (1st std admission) मुलांची वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत (New Educational Policy) केंद्रीय विद्यालयाने हा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून इयत्ता पहिली मधील नोंदणीसाठी आता मुलाचे वय १ मार्च २०२२ पर्यंत सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. आधी हे वय पाच वर्षे होते आणि आता त्यात बदल करण्यात आला आहे.

दुसरीकडे देशभरातील केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक आणि शिक्षकेत्तर पदांवर बंपर भरती सुरु आहे. त्यानुसार, संस्थेने पीआरटी, टीजीटी, पीजीटी, योग शिक्षक, क्रीडा शिक्षक, नृत्य, विशेष शिक्षक, संगणक प्रशिक्षक, सल्लागार आदी पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या पदासाठी इच्छुक उमेदवारांना केव्हीएसच्या अधिकृत वेबसाइटवर सविस्तर तपशील मिळू शकणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


KVS Admission : MPs will not have to be chased to get admission in the school. Because the Kendriya Vidyalaya Sangh has canceled the MP quota. Earlier, KVS had canceled the quota of education ministers last year, but now the remaining MP quota has also been canceled. Read More details as given below.

Kendriya Vidyalay admission:आता केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी खासदारांच्या मागे लागावे लागणार नाही. कारण केंद्रीय विद्यालय संघटनेने खासदार कोटा  रद्द केला आहे. यापूर्वी केव्हीएस संस्थेने गेल्या वर्षी शिक्षणमंत्र्यांचा कोटा रद्द केला होता, आता यावेळी उर्वरित खासदार कोटाही रद्द करण्यात आला आहे. वास्तविक यावेळी खासदारांना कूपन देण्यात आलेले नाहीत, तेव्हापासून केव्हीएसच्या प्रवेशासाठी खासदारांचा कोटा रद्द केला जाऊ शकतो, अशी चर्चा होती.

 1. काही खासदार या निर्णयावर खूश आहेत तर काहींनी हा कोटा रद्द न करता वाढवायला हवा होता असा आक्षेप घेतला आहे. करोनाच्या काळात अनाथ झालेल्या मुलांना प्रवेशात प्राधान्य देण्यात येईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
 2. ‘गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना या कोट्यातून प्रवेश मिळतो. गरीब कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना खासगी शाळेत शिकता येत नाही’ असे काँग्रेस नेते उदित राज म्हणाले. भाजप सरकारने गरीब विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून कोटा वाढवण्याऐवजी हा कोटा रद्द केला आहे. आमचे सरकार आल्यावर हा रद्द केलेला कोटा पूर्ववत करेल असेही ते पुढे म्हणाले.

कोट्यातून असा मिळायचा प्रवेश

 • गेल्या वर्षापर्यंत, केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठी १० जागा खासदारांसाठी राखीव होत्या. म्हणजेच प्रत्येक खासदार त्याच्या क्षेत्रातील केव्हीएसमध्ये १० विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतो.
 • लोकसभा खासदार किंवा राज्यसभा खासदारांना यासाठी केव्हीएस कूपन जाहीर करण्यात आले होते. तर शिक्षणमंत्र्यांसाठी हा कोटा ४५० जागासाठी होता.
 • म्हणजेच शिक्षण मंत्रालय ४५० विद्यार्थ्यांना केव्हीएसमध्ये प्रवेश देऊ शकत होते. मात्र आता केव्हीएस संस्थेकडून पुढील आदेश येईपर्यंत हे सर्व कोटा रद्द करण्यात आले आहेत.

खासदारांच्या कोट्याचा फायदा कोणाला?

या कोट्यातून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो असे खासदारांचे म्हणणे आहे. गरीब विद्यार्थी किंवा गरजू विद्यार्थी खासदारांकडे यायचे आणि नावनोंदणी करून घेत असत. पण हे प्रत्यक्षात खरे आहे का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. खासदारांकडून आपल्या ओळखीतल्या मुलांची नोंदणी करून घेतली जात असे.


Kendriya Vidyalaya Admission 2022-2023- Kendriya Vidyalaya has taken an important decision. As per this decision, the age limit of children for 1st std admission has been increased. Kendriya Vidyalaya has taken this decision under the New Educational Policy. For enrollment in Class I from the academic session 2022-23, the child must now complete six years of age by March 1, 2022. Earlier this age was five years and now it has been changed.

KVS कडून पहिलीच्या प्रवेशाची वयोमर्यादा वाढविली; जाणून घ्या

Kendriya Vidyalay Admission 2022-2023: केंद्रीय विद्यालयांमधील प्रवेशासाठी वयोमर्यादेतील बदलाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी वयोमर्यादेतील बदलावर शिक्कामोर्तब केले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा हवाला देत प्रवेशासाठी किमान वयोमर्यादा पाच वर्षांवरून सहा वर्षे करण्याचा निर्णय केंद्रीय विद्यालय संघटनेकडून घेण्यात आला होता. याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान उच्च न्यायालयाने केंद्रीय विद्यालय संघटनेच्या बाजुने निकाल दिला आहे.

प्रवेश वयोमर्यादेत बदल करण्याच्या निर्णयाविरुद्ध यूकेजी विद्यार्थ्याचे वकील अशोक अग्रवाल यांनी उच्च न्यायालयाला याचिका दाखल केली. केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी वयोमर्यादेत अचानक बदल करण्यात आला आहे. संस्थेने प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या चार दिवस आधी नोटिफिकेशनद्वारे वयोमर्यादा पाच वर्षांवरून सहा वर्षे केल्याची माहिती दिली असे अशोक अग्रवाल यांनी न्यायालयात सांगितले. हा बदल अनैतिक आणि बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला होता. हा बदल शिक्षण हक्क कायदा, घटनेच्या कलम १४, २१, २१ ए, दिल्ली शालेय शिक्षण कायदा १९७३, बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ चे उल्लंघन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

केंद्रीय विद्यालय (Kendriya Vidyalaya) संस्थेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी (1st std admission) मुलांची वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत (New Educational Policy) केंद्रीय विद्यालयाने हा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून इयत्ता पहिली मधील नोंदणीसाठी आता मुलाचे वय १ मार्च २०२२ पर्यंत सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. आधी हे वय पाच वर्षे होते आणि आता त्यात बदल करण्यात आला आहे.


Kendriya Vidyalaya is announcing the first list (KVS Admission 2021 First List) for class I from today (June 23, 2021). The list will be uploaded on the official website of KVS immediately after the draw. Parents can click on https://kvsonlineadmission.kvs.gov.in/index.html to view the first admission list

केंद्रीय विद्यालयातर्फे इयत्त पहिलीसाठी आजपासून (२३ जून २०२१) पहिली यादी (KVS Admission 2021 First List) जाहीर केली जात आहे. ड्रॉ संपल्यानंतर लगेचच KVS च्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट अपलोड केली जाणार आहे. पालक पहिली प्रवेश यादी पाहण्यासाठीhttps://kvsonlineadmission.kvs.gov.in/ index.html वर क्लिक करु शकतात.

KVS Admission 2021 First List

वेगळ्या-वेगळ्या केंद्रीय विद्यालयांची यादी(Kendriya Vidyalaya) आपापल्या वेबसाइटवर जाहीर केली जाणार आहे.जागा रिकामी राहील्यास ३० जूनला दुसरी आणि ५ जुलैला तिसरी यादी (KVS (KVS Admission 2021 List) जाहीर करण्यात येईल.

एसएमएस / ई-मेलच्या माध्यमातून शाळांमार्फत संबंधित अपडेट कळविली जाईल.अनारक्षित जागांसाठी प्राथमिकता सेवा श्रेणीनुसार उमेदवारांची अंतिम निवड यादी (KVS Admission 2021 List)ची घोषणा २ जुलै ते ६ जुलै २०२१ पर्यंत सुरु आहे.

KVS Admission 2021 असे तपासा

 • संबंधित KV वेबसाइटवर जा.
 • होमपेज वर किंवा लॉगिन विभागांच्या खाली प्रकाशित यादीवर क्लिक करा.
 • पुढील पेजवर आपल्या मुलांचे नावे तपासा

KVS Admission Documents 

 • विद्यार्थ्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो आणि भरुन डाऊनलोड केलेला फॉर्म
 • पडताळणीसाठी जन्म तारखेचे ओरिजनल प्रमाणपत्र
 • एससी / एसटी / ओबीसी प्रमाणपत्र
 • राहते ठिकाण बदलल्याचे प्रमाणपत्र (लागू होत असेल तर)

या कागदपत्रांची झेरॉक्स

 • जन्म तारखेचे प्रमाणपत्र
 • निवासाचे प्रमाणपत्र
 • सेवा प्रमाण (लागू असेल तर)
 • नियुक्ती पत्र (लागू असेल तर)
 • नवीन पगार स्लिप (लागू असेल तर)
 • मुलांच्या नावावर जात प्रमाणपत्र (लागू असेल तर)
 • मुलांचे विकलांगता प्रमाणपत्र (लागू असेल तर)

KVS Admission- There is great news for students who want to get admission in Kendriya Vidyalaya. At this time, it has been said that no examination will be held for admission in 9th class in the Central Union schools. KVS took this decision against the backdrop of an epidemic.

 केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. यावेळी केंद्रीय संघटनेच्या शाळांमध्ये 9 वीच्या वर्गात प्रवेशासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नसल्याचे म्हटले आहे. साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर केव्हीएसने हा निर्णय घेतला. केव्हीएसने प्रसिध्द केलेल्या नोटिसीत म्हटले आहे, की साथीच्या आजारामुळे 9 वी प्रवेशासाठी लेखी प्रवेश परीक्षा रद्द केली जात आहे. प्रसिध्द केलेल्या आदेशानुसार, केंद्रीय विद्यालयाने प्रवेश प्रक्रियेमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. केव्हीएसच्या म्हणण्यानुसार, या वेळी प्राथमिक प्रवर्गाच्या आधारे नवीच्या वर्गात प्रवेश असणार आहे.

या व्यतिरिक्त केंद्रीय विद्यालयाने शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये प्रथम श्रेणी प्रवेशासाठी सुरू असलेली प्रक्रिया पुढे ढकलली आहे. असे म्हणतात, की परिस्थिती सामान्य झाल्यास प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जाईल. केव्हीएसने प्रथम वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानंतर 23 एप्रिल रोजी पहिली यादी जाहीर केली जाणार होती. यानंतर प्रथम श्रेणीसाठी ऑनलाइन नोंदणीही सुरू होणार होती. ज्या शाळांमध्ये गर्दी असायची. हे टाळण्यासाठी प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.


For academic year 2018 – 19 admission to 1st standard in Kendriya Vidyalay Bambolim Camp – Goa, online applications will get starts from 1st March 2018 from 8 Am to 19th March 2018 to 4 Pm. For admission to above 2nd standard online applications will be schedule from 2nd April 2018 from 8 Am to 9th April 2018 to 4 pm. For more details about the applications can be obtain from www.kvsanghatan.nic.in. For online applications candidates need to use following official  online applications link.

Candidates have to make new registration to online applications. After getting register for the new user, applicants have to fill the online applications form y mentioning all necessary details about the applicants.

Kendriya Vidyalay Admission 2018

Important Links:


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!