Kuwait Jobs -भारताबाहेर नोकरी शोधताय? उत्तम संधी!-  कुवैत मध्ये सुरु होतेय भरती

Job in Kuwait

Kuwait Jobs for Indian- If you are looking for a job outside India, you are looking for opportunities in Kuwait. The Kuwaiti government will start recruiting workers from abroad. Job opportunities will be available in Kuwait. According to the report, families in Kuwait are in dire need of domestic workers and families with elderly or young children need workers to take care of such people.

भारताबाहेर नोकरी शोधताय?  उत्तम संधी!-  कुवैत मध्ये सुरु होतेय भरती

कोरोना महामारीमुळे जगभरातील लोकांचे उद्योग आणि नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे सध्या प्रत्येकजण नोकऱ्याच्या शोधात आहे. तुम्ही जर भारताबाहेर नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला कुवैतमधील संधी खुणावत आहेत. कुवैत सरकार देशाबाहेरील कामगारांसाठी भरती सुरु करणार आहे. अल अंबा या वृत्तपत्राचा संदर्भ देत गल्फ न्यूजने सांगितलं की, कुवैत संसदेकडे आरोग्याच्या काही अटीवर या भरतीला मान्यता देण्यासाठी प्रस्ताव आला आहे. त्यानुसार कामगारांच्या व्हिजासाठीसुद्धा प्रयत्न केले जाणार असल्याचं यामध्ये सांगितलं आहे.

हा प्रस्ताव मंजूर झाल्यास भारतीयांना कुवैतमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. रिपोर्टनुसार कुवैतमधील कुटुंबांना घरी काम करणाऱ्या कामगारांची जास्त गरज असून ज्या घरी वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुले असतात त्या कुटुंबांना अशा लोकांच्या देखभालीसाठी कामगारांची गरज असते. कुवैतमधील मंत्र्यांनी सांगितलं की, सरकारने बाहेरील कामगारांना प्रवेशासाठी परवानगी दिली आहे. आणि त्यांच्या व्हिजासाठीसुद्धा सरकार प्रयत्न करत आहे.

कोरोनामुळे कुवैतमधील विदेशी कामगारांना फटका बसला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल १ लाख ६८ हजार कामगारांना कुवैत सोडावं लागलं होत. त्यामध्ये सर्वांत जास्त भारतीयांचा सामावेश होता. त्यानंतर तेथील कामगारांची संख्या ९ टक्क्यांनी कमी झाली होती. या प्रस्तावानंतर भरतीसंबंधी कोणतीही तारीख स्पष्ट केली नसल्याचं मंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान कुवैतमधील असलेल्या परदेशी नागरिकांच्या लोकसंख्येत भारतीयांचा आकडा जास्त आहे.

5 Comments
 1. Vijay says

  I am interested

 2. Ganesh hegaje says

  Yes I am interested for Kuwait job

 3. Ganesh hegaje says

  muji job Kuwait Karna hi please di do

 4. Raju vaidya says

  Hiii

 5. Akash Virkar says

  Yes I am Interested

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!