MAH MBA, MMS CET प्रवेशांचे वेळापत्रक जारी

Mah MBA MMS Admission Time Table

The Maharashtra State CET Cell has announced the application dates for the first-year admission process for full-time MBA courses. The admission process will be implemented for MBA courses in government, government-aided, university-affiliated, and private unaided institutions in the state. As per MAH MBA, MMS CET dates, candidates can register on the official website cetcell.mahacet.org and upload certificates till December 25.

Mah MBA MMS Admission Time Table : महाराष्ट्र राज्य सीईटी कक्षाने फुल टाइम एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्जाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यातील शासकीय, शासकीय अनुदानित, विद्यापीठ संलग्न आणि खासगी विनाअनुदानित संस्थांमधील एमबीए अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

एमएएच एमबीए (MAH MBA), एमएमएस सीईटी (MMS CET) च्या तारखांनुसार, उमेदवार २५ डिसेंबर पर्यंत अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर नोंदणी करू शकतात आणि प्रमाणपत्र अपलोड करू शकतात.

महाराष्ट्र राज्य सीईटी सेल २८ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२० या कालावधी दरम्यान एमएएच एमबीए (MAH MBA), एमएमएस (MMS) प्रवेशासंबंधी तक्रार दाखल करण्याची संधी देखील देणार आहे.

‘शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी तंत्रशिक्षणांतर्गत एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरीता मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अखिल भारतीय उमेदवारी प्रकारामध्ये प्रवेशाकरीता ATMA,MAT,XAT,GMAT या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना दिनांक २५/१२/२०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची संधी देण्यात येत आहे. तसेच सदर कालावधीमध्ये इतर अन्य परिक्षेच्या विद्यार्थ्यांनाही वरील अभ्यासक्रमासाठी नोंदणीची सोय उपलब्ध राहील. अधिक माहितीसाठी सीईटीच्या http://mahacet.org या संकेतस्थळावर भेट द्यावी,’ असं ट्विट राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!