Anganwadi Bharti-२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती २६ जानेवारीनंतर

Anganwadi Bharti 2023 Vacancy Details & Application Form

Maharashtra Anganwadi Bharti 2023

अंगणवाडी भरती फॉर्म २०२३ – Maharashtra Anganwadi Bharti 2023: The recruitment of more than 20 thousand posts of Anganwadi Sevaks, Anganwadi Helpers and Mini Anganwadi Sevaks in the state has been approved. The state government has announced that the recruitment process of 20 thousand Anganwadi workers will start after 26th January. At this time, the condition of passing the 12th examination has been fixed for the post.

राज्य शासनाने २६ जानेवारीनंतर २० हजार अंगणवाडी सेविकांची भरतीप्रक्रिया सुरू होईल, असे जाहीर केले आहे. या वेळी पदभरतीसाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण असल्याची अट निश्चित करण्यात आली आहे.

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे मिशन पोषण २.०, मिशन शक्ती आणि मिशन वात्सल्य हे तीन महत्वपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. राज्यात कोरोना महामारीनंतर आजतागायत अंगणवाडी सेविकांची भरतीप्रक्रिया झालेली नाही. वेगवेगळ्या कारणांनी अनेक अंगणवाड्यांमधील पदे रिक्त आहे. त्यामुळे मिशन पोषण २.०, मिशन शक्ती आणि मिशन वात्सल्य या तीन योजना महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवण्यात अडचणी येत आहेत. ही त्रुटी लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात २० हजार अंगणवाडी सेविकांची पदभरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मिशन पोषण २.० या उपक्रमामध्ये केंद्र सरकारने पोषण ट्रॅकर हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दररोजच्या पोषण आहाराची माहिती टाकणे बंधनकारक आहे. हे ॲप इंग्रजीत असल्याने अनेक अंगणवाडी सेविकांकडून पोषण ट्रॅकर ॲप मराठीत करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका पद भरतीप्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेचा निकष बदलण्यात आला आहे. १०वी उत्तीर्णऐवजी किमान १२वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता करण्यात आली आहे.

या संबंधीचा शासननिर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर भरतीप्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
विश्वसनीय माहितीनुसार २६ जानेवारीनंतर भरतीप्रक्रिया सुरू होईल. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवणे, उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून त्याबाबत हरकती मागवणे यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागेल. त्यानंतर विधवा, जात संवर्ग, पूर्वीचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता या सर्वांचा विचार करून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल


अंगणवाडी भरती फॉर्म २०२३ – Maharashtra Anganwadi Bharti 2023: The recruitment of more than 20 thousand posts of Anganwadi Sevaks, Anganwadi Helpers and Mini Anganwadi Sevaks in the state has been approved and this recruitment will be started soon. Besides this, Chief Minister Eknath Shinde said today that a positive decision will be taken on issues such as insurance along with salary, classes for Anganwadis, new mobile phones etc., The recruitment of 20186 posts of Anganwadi workers, Anganwadi helpers and Mini Anganwadi workers has been approved and the Chief Minister also directed to complete this recruitment process in six months.

अंगणवाडी सेविकांसाठी १२वी उत्तीर्णची अट- Anganwadi Sevika Bharti 2023

राज्यातील एक लाख १० हजार अंगणवाड्यांमध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून २० हजार पदांची भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘पोषण २.०’अंतर्गत आता पदभरतीसाठी दहावी नव्हे तर बारावी उत्तीर्ण महिलांनाच संधी मिळणार आहे. मदतनीस पदासाठी सातवी उत्तीर्णची अट कायम राहणार आहे. २६ जानेवारीनंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

Anganwadi Sevika Bharti 2023

अंगणवाडी सेविकांना दुहेरी आनंद, २० हजार पदे भरण्यासोबत मानधनही दुप्पट?

राज्यात लवकरच २० हजार अंगणवाडी सेविकांची भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली होती. यापाठोपाठ अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ, नवे मोबाइल, जागेच्या भाड्याच्या तुटपुंज्या रकमेमध्ये बदल, अंगणवाड्यांची संख्या वाढवणे यासारख्या बदलांबाबतही राज्य सरकारच्या पातळीवर विचार सुरू असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. अंगणवाडी सेविकांना लवकरच नवे मोबाइल देण्यासाठी १२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही सांगण्यात आले.

२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती

  1. राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग, नवीन मोबाईल आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक घेण्यात आली. महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल यांचेसह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना-समितींचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
  2. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी एलआयसीकडे शासनाने १०० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. या संदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करुन संबंधितांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.
  3. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजार १८६ पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
  4. अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विभागाला दिल्या. आढाव्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे वर्ग भरविण्याच्या संदर्भात त्यांना आदेश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
  5. पोषण आहाराचा दर वाढविण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच त्यात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करतांनाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
  6. दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने भाऊबीज दिल्याबद्दल आणि गणवेशाचे पैसे थेट खात्यावर जमा केल्याबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या बैठकीत पोषण ट्रॅकर ॲप, मानधनवाढ, रिक्त पदे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.

Latest updates regarding Anganwadi Recruitment 2023 is that Finance department approved to fill the vacancies of Anganwadi workers, helpers etc. This will pave the way for filling up the vacant posts and the disrupted work will resume. According to  government decision, approval has been given to fill up 20 thousand 183 vacant posts. Today, the finance department has given approval to fill up the vacant posts of Sevak, Mini Sevak and Helpers in Anganwadi. Earlier in some districts these posts were filled to the extent of 50%. However, the implementation of the schemes was adversely affected due to large number of vacant posts. Therefore, according to today’s government decision, approval has been given to fill up 20 thousand 183 vacant posts.

Anganwadi Sevika Bharti 2023

चिमुकल्यांसाठी शाळेची गोडी लावणारी संस्कार केंद्र आणि गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेणारे आरोग्य केंद्र या दुहेरी भूमिकेत असणाऱ्या गावोगावच्या अंगणवाड्यात असणाऱ्या रिक्त पदांचा प्रश्न आता सुटू शकणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीसांची रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाने आज (ता. १०) मान्यता दिली. यामुळे रिक्त असलेली पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याने विस्कळित झालेल्या कामकाजाला पुन्हा गती येणार आहे.

Asha Sevika Bharti- साडेपाच हजार आशा सेविकांची नियुक्ती होणार; राज्य सरकारचा निर्णय

Maharashtra Anganwadi Sevika Bharti 2023 and Madatnis Bharti 2023

  • गावोगावी बालकांसह महिलांच्या दृष्टीने अंगणवाडीचे कार्य आजही महत्त्वपूर्ण व मोलाचे ठरत आहे. त्यातच जिल्ह्यात तब्बल आजारावर पदे रिक्त असल्याने अंगणवाड्यांच्या कामकाजाला नक्कीच विस्कळितपणा आला असल्याने जिल्हा परिषदेने व लोकप्रतिनिधींनी देखील वेळोवेळी ही रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. ‘सकाळ’ ने देखील वेळोवेळी या प्रश्न आवाज उठविला आहे.
  • वर्षांपूर्वी जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या १७९, मदतनीसांच्या ७३८ तर मिनी अंगणवाडी सेविकांच्या २२ जागा रिक्त होत्या. यात नव्याने भर पडली असून एकट्या येवला तालुक्यात दोन्ही प्रकल्पांची प्रकल्प अधिकाऱ्यांसह ९९ पदे रिक्त आहेत. यामुळे जिल्ह्यात कामकाजात विस्कळितपणा येऊन कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे.
  • अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे प्रश्‍न वर्षोनुवर्षे पासून कायम असल्याचे चित्र आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे आहे, त्या सेविका व मदतनिसांवर कामाचा ताण येत आहे. आपले काम पाहून शेजारच्या अंगणवाडीची जबाबदारी सांभाळण्याची वेळ अनेकांवर येत असल्याने साहजिकच विस्कळितपणा वाढत असल्याचे दिसते. यामुळे रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती.
  • आज वित्त विभागाने सेविका,मिनी सेविका व मदतनिसांची मंजूर पदांच्या संकेत रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. यापूर्वी काही जिल्ह्यात ही पदे ५० टक्के प्रमाणात भरली होती. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम जाणवत होता. त्यामुळे रिक्त असलेली २० हजार १८३ पदे भरण्यास आजच्या शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली आहे.
  • भरती प्रक्रियेच्या वेगळ्यावेगळ्या निकषानुसार ही पदे भरण्यास मान्यता देण्यात आली असून भविष्यात मंजूर पदसंख्येच्या प्रमाणात रिक्त होणारी सर्व पदे भरण्याची प्रक्रिया नियमितपणे चालू ठेवावी, असे आदेश देखील शासनाने दिल्याने यापुढे रिक्त होणारी पदे वेळेत भरली जातील, अशी अपेक्षा वाढली आहे.
  • रिक्त अधिकाऱ्यांचे काय? – गाव पातळीवर कार्यरत कर्मचाऱ्यांची पदे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आजही अनेक पंचायत समितीतील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांसह पर्यवेक्षिका, लिपिक व इतर कर्मचाऱ्यांची पदे ही मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. यामुळे साहजिकच तालुका पातळीवरून काम करण्यास मर्यादा पडतात.त्यामुळे अधिकाऱ्यांची पदेही त्वरित भरावीत अशी मागणी हे होत आहे.

Maharashtra Anganwadi Sevika Bharti 2022

Solapur Anaganwadi Bharti 2022 for 581 posts: Anganwadi workers have not been recruited in Solapur district for the last three years. Due to this, the working Anganwadi workers and helpers have increased their workload. There are as many as 581 vacancies of Anganwadi Sevika and Madatnis were vacant in Solapur District. Taluka wise Vacancy Details chart are given below. Candidates read the given details carefully and keep visit us for further details.

सोलापूर जिल्हाभरात अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या तब्बल 581 जागा रिक्त आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ही पदे रिक्त आहेत. रिक्त जागा अद्याप भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर कामाचा अतिरिक्‍त भार वाढला आहे. अंगणवाडीकडे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया म्हणून पाहिले जाते. बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी शासन त्यांच्या आहारासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत आहे.

Maharashtra Anganwadi Bharti 2022

  • रिक्त जागामुळे अंगणवाडीतील बालकांचे भवितव्य अंधारात सापडण्याची चिन्हे आहेत. अनेक नजीकच्या अंगणवाडी सेविकांना रिक्त पदावरील अंगणवाडीचा प्रभारी चार्ज देण्यात आला आहे, मात्र त्याकडे त्यांना पूर्ण वेळ देता येत नसल्याने येथील अनेक बालकेही दुर्लक्षित ठरत आहेत.
  • सहा महिन्यांपूर्वी महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तांकडून रिक्त जागांच्या 50 टक्के जागा भरण्याचा आदेश आला. या आदेशात 31 डिसेंबर 2019 पूर्वी रिक्त झालेल्या जागाना प्राधान्य देण्याचे सांगण्यात आले होते.
  • त्यानुसार 50 टक्के जागा भरुनदेखील गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात आजपर्यंत 581 कर्मचार्‍यांच्या जागा या रिक्त आहेत. येत्या काळात लवकर या जागा न भरल्यास अंगणवाडीतील मुलांच्या शिक्षणाचा दर्जा ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
  • फक्त सोलापुरात ही परिस्थिती नसून अशी परिस्थिती संपूर्ण राज्यभरात आहे. अंगणवाडीत काम करणारे कर्मचारी कमी मानधनावर प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करतात.
  • त्यामुळे त्यांचे नेहमीच कौतुक होत असते. असे असतानाही कमी मानधनासाठी कर्मचार्‍यांची नियुक्‍ती राज्य शासनाकडून होत नसल्याने पालकांत शासनाच्या विरोधात रोष बळावत आहे.

Vacancy Details of Maharashtra Anganwadi Bharti 2022

  1. अक्कलकोट तालुक्यात सेविका 16, मिनी सेविका 3, मदतनीस 55,
  2. बार्शी तालुक्यात सेविका 12, मिनी सेविका 1, मदतनीस 30,
  3. वैराग सेविका 8, मदतनीस 20,
  4. करमाळा तालुक्यात सेविका 17, मिनी सेविका 1, मदतनीस 25.
  5. माढा तालुक्यात सेविका 2, मिनी सेविका 1, मदतनीस 22,
  6. कुर्डूवाडी आणि टेंभुर्णी येथे सेविका 6, मदतनीस 11,
  7. माळशिरस तालुक्यात सेविका 18, मिनी सेविका 1, मदतनीस 19,
  8. अकलूज येथे सेविका 17, मदतनीस 31.
  9. मंगळवेढा तालुक्यात सेविका 1, मिनी सेविका 1, मदतनीस 26,
  10. मोहोळ तालुक्यात सेविका 13, मिनी सेविका 5, मदतनीस 29,
  11. उत्तर सोलापूर सेविका 13, मदतनीस 20,
  12. पंढरपूर 1 सेविका 9, मदतनीस 36,
  13. पंढरपूर क्र. 2 येथे सेविका 9, मदतनीस 24,
  14. सांगोला तालुक्यात सेविका 3, मिनी सेविका 1, मदतनीस 10,
  15. कोळा येथे सेविका 11, मिनी सेविका 2, मदतनीस 9,
  16. दक्षिण सोलापूर येथे 9, मदतनीस 34 अशा जागा रिक्त आहेत.

Solapur Anganwadi Bharti – 581 Vacancy Details

anganwadi solapur


There are vacancies for Anganwadi Sevika and Anganwadi Madatnis Bharti in Chiplun, Ratnagiri District. The Ekatmik Balvikas Vibhag Appeal to apply for the post of Anganwadi Sevika and helper in Chiplun candidatse. In Integrated Child Development Services Scheme Projects 1 and 2, vacancies are to be filled for the above post. Applications are invited from aspiring and required qualified candidates with local residents in the respective Gram Panchayat area. Complete details are given below, Read the details carefully and apply as soon as possible.

चिपळुणात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प १ व २ मध्ये अंगणवाडी सेविका पदासाठी व मदतनीस पदासाठी रिक्त जागा भरावयाच्या आहेत. यासाठी इच्छुक व आवश्यक अर्हताधारक संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील स्थानिक रहीवाशी असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदरचे अर्ज २२ जून ते ४ जुलैपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी परकार कॉम्पलेक्स दुसरा मजला २१८ येथे सादर करावे.

  1. तालुक्यातील अंगणवाडी सेविका पदासाठी रिक्त जागा प्रकल्प १ व २ मध्ये जाहीर झाले असून यासाठी विविध नमुन्यांमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत.
  2. अंगणवाडी सेविका पदासाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्ष असे राहील. सदर पदांसाठी यापुर्वी जाहीरातीनुसार अर्ज केले असल्यास पुन्हा अर्ज करणे बंधनकारक आहे.
  3. प्रकल्प १ मध्ये अंगणवाडीका सेविका पदासाठी धामेली गायकर व निरबाडे लाल या ठिकाणी अंगणवाडी सेविका पद रिक्त आहे. सदर पदासाठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील स्थानिक उमेदवारांनी अर्ज करावेत.
  4. त्याप्रमाणे प्रकल्प २ मध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी रिक्त जागा भरावयाच्या आहेत. यासाठी गाव मजरेकाशी अंगणवाडी मजरेकाशी व गाव मिरजोळीमध्ये अंगणवाडी कोलेखाजन या ठिकाणी अंगणवाडी सेविका पद भरावयाचे आहेत.
    अंगणवाडी मदतनीस रिक्त जागेसाठी कामथेमधील अंगणवाडी कामथे टेपवाडी येथे मदतनीस पद भरावयाचे आहे.
  5. सदर पदासाठी दि. २२ जून ते १ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. सदरचे अर्ज परकार कॉम्पलेक्स गाळा नं. २२६ या कार्यालयामध्ये सादर करावे.
  6. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी १मध्ये शिवानी शिंदे आणि प्रकल्प २ मध्ये अधिकारी एस.एस. नार्वेकर यांच्याशी संपर्क साधावा.

  1. Anganwadi Bharti 2022- A meeting of Anganwadi workers and helpers was held at Sitra Bhavan. Sitaram Thombre, District President of CITU was in the chair Person. On this occasion, Vice President of All India CITU and President of Maharashtra CITU Dr. D. L. Guided by Karad. Anganwadi workers and helpers should be recognized as government employees. Until then, they should get a minimum salary of Rs 26,000, pension and graduation, was demanded in the meeting.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी. तोपर्यंत त्यांना २६ हजार रुपये किमान वेतन मिळावे, पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळावी, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सिट्र भवन येथे मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सिटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे होते. यावेळी अखिल भारतीय सीटूचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र सिटूचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी. 

तोपर्यंत त्यांना २६ हजार रुपये किमान वेतन मिळावे, पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळावी, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली. अंगणवाडी सेविकांच्या जिल्हाध्यक्ष सुलक्षणा ठोंबरे, सरचिटणीस कल्पना शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सुनीता मोगल, लता लावले, सुरेखा पवार, गौरी वैद्य, अंबाबाई गुंबाडे, कुसुम खोकरे, सुनीता कांबळी, लीला भोये, वैशाली घुमरे, आदींसह अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 


Nandurbar Anganwadi Bharti 2022: Integrated Child Development Services Scheme Project is invited application form for the Anganwadi Sevika, Mini Anganwadi Sevika and Helper Posts. There is a total of 17 vacancies to be Filled under Nandurbar Anganwadi Recruitment 2022. Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 25th and 31st May 2022

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा 


Approved today to disburse funds of Rs.  100 crores for For a lump sum benefit plan after termination of service or death Anganwadi workers, Mini Anganwadi workers and helpers in the state. Read More details are given below.

राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेकरिता १०० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.

यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे, किंवा मृत्युनंतर द्यावयाच्या विमा योजनेंतर्गत एकरकमी लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा लाभ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना होणार आहे.

अशा एकरकमी लाभाचे प्रस्ताव निकाली काढण्याकरिता भारतीय आयुर्विमा महामंडळास हा हप्ता देण्याकरिता निधी मिळावा असा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने सादर केला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत मान्यता दिली.

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे असे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहणार आहे.


Anganwadi Sevika Bharti 2022– As per the order of the state government, the process of filling up the vacancies of Anganwadi workers and helpers has been started in Ramtek taluka. Applications for these posts were to be handed over to Gram Sevaks by Monday (21st). However, Gramsevak from Pusada Rehabilitation No. 1 (Tal. Ramtek) has not come to the office for six days. Therefore, this recruitment process is not complete.

राज्य सरकारच्या आदेशान्वये रामटेक तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी करावयाचे अर्ज सोमवार (दि. २१) पर्यंत ग्रामसेवकांकडे सोपवायचे होते. मात्र, पुसदा पुनर्वसन क्रमांक-१ (ता. रामटेक) येथील ग्रामसेवक सहा दिवसांपासून कार्यालयात आले नाही. त्यामुळे अर्ज सोपवायचे कुणाकडे असा प्रश्न इच्छुकांसमोर निर्माण झालेल्याने येथील भरती प्रक्रिया वांध्यात आली. 


अंगणवाडी सेविकाची पगारवाढ होणार…..

Maharashtra Anganwadi Sevika Recruitment 2022

As per the news published in the news paper that the Angawadi Sevika and Asha Sevika will be get Salary increment. As well as Health Insurance and Pension Scheme for Anganwadi Sevika and Ashasevikas will be launches soon. Minister for Women and Child Welfare Yashomati Thakur said that the Mahavikas Aghadi government is working for the empowerment of women and it will be done very soon. 

अंगणवाडी सेविका आणि आशासेविका याची पगारवाढ होणार आहे, तसेच अंगणवाडी सेविका आणि आशासेविका यांच्या साठी विमायोजना आणि पेन्शन योजना याचेही नियोजन करण्यात येत आहे. महिला सबलीकरण यासाठी महाविकास आघाडी सरकार काम करत असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले

Anganwadi Sevika Bharti updates


अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या…

As the latest news regarding the Anganwadi Bharti is that Anganwadi Sevika and Anganwadi Helper needs to be treated as a government employees. According to the latest information about Anganwadi Sevika Recruitment 2022, there is some demand among the candidates – As per their demand, they have demanded recognition of Anganwadi worker and Anganwadi helper as government employees. Read the more details given below:

अंगणवाडी सेविका भरती 2022 बद्दलच्या ताज्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांना अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदासाठी इच्छुक आहेत त्यांची काही मागणी आहे. त्यांच्या मागणीनुसार त्यांना अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी केली आहे

Anganwadi Sevika Bharti updates

Anganwadi Sevika Bharti 2022- The government has given the green light to fill the vacancies of supervisors in urban projects. Approval will soon be given by the Rural Development Department to fill the posts in rural areas. This will provide better manpower in this department in future. Read More details as given below.

Anganwadi Bharti 2022- Latest Updates- शहरी प्रकल्पातील पर्यवेक्षकाची रिक्त पदे भरण्यास शासनाने हिरवा कंदील दर्शविला आहे. ग्रामीण भागातील पदे भरण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून लवकरच मान्यता मिळेल. यामुळे आगामी काळात या विभागात चांगले मनुष्यबळ उपलब्ध होतील. 

महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव श्रीमती कुंदन यांनी कर्मचारी सभेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, मोबाइल खर्चासाठी चार वर्षांकरिता १० हजार रुपये भत्ता देण्याचा शासनाचा विचार आहे.

सखी पेन्शन योजना राबविण्याचा शासनाचा विचार

परुळेकर म्हणाल्या की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सखी पेन्शन योजना राबविण्याचा विचार शासन करत आहे. मानधनात थोडीफार वाढ केली जाईल, व त्यातूनच पेन्शनसाठीचा हप्ता वळता केला जाईल अशी शक्यता आहे. पण हप्ता घेण्यास आमचा विरोध आहे. पेन्शनची पूर्ण जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. निवृत्तीवेळच्या मानधनाच्या निम्मी रक्कम दरमहा निवृत्तीवेतन म्हणून सरकारने द्यावी अशी मागणी आहे.


Anganwadi Sevika Bharti 2022: The state government has now given permission to fill the vacancies of Anganwadi Sevika and Helper Posts in the state. This has paved the way for filling these vacancies after a gap of about three years.

Anganwadi Sevika Recruitment 2022-राज्यातील अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांची रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने आता परवानगी दिली आहे. यामुळे सुमारे तीन वर्षांच्या खंडानंतर ही रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील निम्मीच रिक्त पदे भरण्याचा आदेश सरकारने जिल्हा परिषदांना दिला आहे. या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या १८९ रिक्त जागांपैकी केवळ ९५ जागा भरता येणार आहेत.

याशिवाय जिल्ह्यातील मदतनिसांच्या ५० जागा रिक्त असून, त्यापैकी २५ जागा भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. सद्यःस्थितीत राज्यात ३ हजार ४३६ पदे रिक्त आहेत. मिनी अंगणवाडीसेविकांची १ हजार ११७ तर मदतनिसांची १ हजार ८३१ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी नंदूरबार, गडचिरोली, उस्मानाबाद, वाशीम, आणि गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, पालघर व अमरावती या जिल्ह्यांमधील काही तालुक्यांतील सर्व रिक्त पदे भरली जाणार आहेत. या जिल्ह्यांव्यतिरिक्त अन्य सर्व जिल्ह्यांमधील ५० टक्के पदे भरली जाणार आहेत.

पुणे जिल्ह्यात एकूण ४ हजार २४६ अंगणवाड्या आणि ४५२ मिनी अंगणवाड्या आहेत. या दोन्ही अंगणवाड्यांसाठी मिळून अंगणवाडीसेविकांची एकूण ४ हजार ६९८ पदे आहेत. जिल्ह्यातील मदतनिसांची एकूण पदे ही सुमारे चार हजारांच्या आसपास आहेत.


Anganwadi Sevika Bharti 2021: Applications are invited for the vacant honorarium posts in the Anganwadi Center under the Integrated Child Development Services Scheme. The last date for submission of application form is 2nd March 2021. Under the Integrated Child Yojana Project, the posts of Anganwadi Sevaks, Mini Anganwadi Sevaks, which are vacant in various areas of the village, will be filled, said Child Development Project Officer Arun Chavan.

 एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय, देवगड अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या मानधनी पदांसाठी दिनांक 2 मार्च 2021 रोजी पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

रिक्त असणारी पदे पुढील प्रमाणे आहेत. ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र व रिक्त पद यांची माहिती अनुक्रमे दिली आहे. लिंगडाळ – लिंगडाळ – अंगणवाडी सेविका, शिरगाव – बैद्धवाडी – अंगणवाडी सेविका, गढिताम्हाणे – गढिताम्हाणे – अंगणवाडी सेविका, रहाटेश्वर – रहाटेश्वर – अंगणवाडी सेविका. गिर्ये – बांदेवाडी – अंगणवाडी सेविका, किंजवडे – ठाकूरवाडी – अंगणवाडी सेविका, फणसे- फणसे – अंगणवाडी सेविका, पडवणे – पडवणे – अंगणवाडी सेविका, मिठबाव – भंडारवाडा – अंगणवाडी सेविका, गिर्ये – जांभुळवाडी – अंगणवाडी सेविका, मुटाट – बौद्धवाडी – मिनी अंगणवाडी सेविका. या प्रमाणे पदे भरण्यात येणार आहेत.

सदर पदांसाठी अर्ज करणाताना अर्जदार हा संबंधित ग्रामपंचायत महसुली गावातील असणे अवश्यक आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालय, देवगड येथे समक्ष सादर करावेत. अर्जा सोबत लहान कुटुंबाबातचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. सदर पदांसाठीची वयोमर्यादा ही 21 ते 30 वर्ष आहे. तसेच शैक्षणिक पात्रता, रहिवासी दाखला, वयाचा दाखला, अनुभव या विषयीची कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.

 शासकीय संस्थेत राहल असलेली विधवा व अनाथ मुली यांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, देवगड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अरूण चव्हाण बाल विकास प्रकल्प अधिकारी, देवगड यांनी केले आहे.

 सोर्स:सिंधुदुर्ग 24 तास


Anganwadi Sevika bharti: There are 1,328 vacancies for Anganwadisevaka, Helper and Mini Anganwadisevaka in the district. There are 241 vacancies for Anganwadi workers, 964 vacancies for Anganwadi helpers and 23 vacancies for mini Anganwadi workers. The government has given permission to implement the recruitment process. Accordingly, Mrs. Aher also directed the Child Development Project Officer to immediately start the recruitment process for Anganwadisevaka-helper.

अंगणवाडी सेविकांची १,३२८ रिक्त पदे भरणार

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अंगणवाडी बांधकामासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले असून, जिल्ह्यात लवकरच नव्याने २२५ अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अश्‍विनी आहेर यांनी ही माहिती दिली.

Anganwadi Sevika Bharti 2021

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीमध्ये नवीन २२५ अंगणवाड्यांना मंजुरी-Anganwadi Workers Bharti 2021

जिल्ह्यात आदिवासी व बिगरआदिवासी क्षेत्रात पाच हजारांहून अधिक अंगणवाड्या आहेत. मात्र यातील अनेक अंगणवाड्या उघड्यावर किंवा समाजमंदिरात भरतात. अशा अंगणवाड्यांना हक्काची इमारत मिळावी म्हणून जिल्हा नियोजन समितीत अंगणवाडी बांधकामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

त्यानंतर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीमध्ये जिल्ह्यात २२५ नवीन अंगणवाडी केंद्र इमारत बांधकामांना मंजुरी देण्यात आB2ी. त्यानुसार आदिवासी क्षेत्रामध्ये नवीन १५९, तर बिगरअदिवासी क्षेत्रात ६६ अंगणवाडी केंद्राच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली. गणेश अहिरे, कविता धाकराव, रेखा पवार, स%5नीता सानप, कमल आहेर, गितांजली पवार-गोळे, शोभा बरके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे या वेळी उपस्थित होते.

अंगणवाडीत १,३२८ पदे रिक्त (Anganwadi Sevika Recruitment 2021)

जिल्ह्यात अंगणवाडीसेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडीसेविका मिळून एक हजार ३२८ पदे रिक्त आहेत.

  1. अंगणवाडी सेविकांची २४१
  2. अंगणवाडी मदतनीस- ९६४ व
  3. मिनी अंगणवाडी सेविकांची २३ रिक्त पदे आहेत

भरतीप्रक्रिया राबविण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार अंगणवाडीसेविका- मदतनीस भरतीप्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेशही श्रीमती आहेर यांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
38 Comments
  1. Sonal Pasankar says

    H am sonal from Nashik I am interested in job please reply m8

  2. priya says

    kiti varsha pasun pement wadi sathi strict kela aganwadi sevikani.konich nit dakhal ghetli nhi ajun..mahagaichya kalat tyana fakta 8000 rs pagar bhetto ..ani Kam matra cleark peksha jasticha krun ghetat,,jya angawadi sevika madasnisacha pn kam krtat mhnje sevikanchya hathakhali madanis nhi asya sevikana sarkarne madnisacha pn pagar dyla hvaa,,

  3. Sujata dudhabhate says

    Hi I am Sujata dudhabhate
    My education is diploma completed so l am interested in this job please encourage me ….

  4. Yashoda somnath dhangar says

    Very very good.

  5. priya band says

    Mala anganwadi sevika, paryveshika sathi form bharaycha ahe…. BA complete ahe.. 6 month anganwadi sevika govt cha course complete kela ahe..navi Mumbai madhe ahe ka vacancy…. Plzzz asel tr kalva….

  6. Karishma mane says

    Hii .. mam,sir I am interest my name is karishma mane
    I am 26 old and b.com 1st year complit.
    Mobile no 9689321237

  7. Karishma mane says

    Hii .. mam,sir I am interestmy name is karishma mane
    I am 26 old and b.com 1st year complit.
    Mobile no 9689321237

  8. Aarti pawar says

    Hii, am interstate,
    Age 23 and BA graduate

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!