राज्यातील १ली ते १२वीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात 25 टक्के कपात
Maharashtra Board Syllabus 2020-21
राज्यातील १ली ते १२वीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात 25 टक्के कपात
Due to the outbreak of Coronavirus, schools could not be started on time during the academic year. Due to the problem in completing the syllabus, the school education department of the state government has decided to reduce the syllabus of class I to XII in all the schools and colleges of the state for the academic year 2021-22 by 25 percent. This has been a great relief to the students.
Maharashtra Board Syllabus 2020-21: करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंृदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा वेळेवर सुरू करता आलेल्या नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात समस्या निर्माण झाल्याने राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांतील इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रम २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
शासन निर्णयात म्हटले आहे की – ‘शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोविड – १९ या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीचा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. या कमी केलेल्या पाठ्यक्रमाची यादी राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, पुणेच्या संचालकांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, तसेच याबाबत शाळांना, विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी आवश्यक प्रसिद्धी द्यावी.’
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून या निर्णयाची घोषणा केली. तसेच यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर ) देखील जारी झाला आहे.
१५ जून पासून राज्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरु करण्यास शासनाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे. दरम्यान ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विविध शाळांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणामधील विविध अडचणी आणि विद्यार्थ्यांवर पडणार ताण या बाबींचा विचार करता शासनाने यापूर्वीच ऑनलाइन शिक्षणासंदर्भात वेळा निश्चित करून दिल्या आहेत. दरम्यान या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर निर्माण होणारा तणाव व दडपण या बाबी लक्षात घेऊन शासनाने आदेश जारी केले आहेत. त्यानुसार इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील एकूण पाठ्यक्रमा पैकी २५ टक्के पाठ्यक्रम कमी करण्यात आला असून यासंदर्भातची मार्गदर्शक सूचना राज्याचे शैक्षणिक संशोधक परिषदेच्या संचालकांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.