राज्यातील सीईटी रद्द होणार नाही; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

Maharashtra CET 2020

About seven lakh students have registered for admission in various vocational courses in the state. Most of the students are from MHT CET who want to pursue a career in engineering and pharmacology. Discussions were going on about admitting these students without taking the entrance test. However, the state government is in favor of taking the entrance test without doing so. Now, the exam is likely to be held by the end of September, sources said.

राज्यातील सीईटी रद्द होणार नाही; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

प्रवेशपरीक्षा घेण्याबाबत राज्य सरकार अनुकूल आहे. परीक्षा नेमकी कशी घ्यायची याबाबत सरकारी पातळीवर चर्चा सुरू आहे.

राज्यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुमारे सात लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात सर्वाधिक विद्यार्थी हे इंजिनीअरिंग आणि औषधनिर्माणशास्त्र विषयात करिअर करू इच्छिणाऱ्या ‘एमएचटी’ सीईटीचे आहेत. या विद्यार्थ्यांची प्रवेशपरीक्षा न घेताच प्रवेश देण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, तसे न करता प्रवेशपरीक्षा घेण्याबाबत राज्य सरकार अनुकूल आहे. आता ही परीक्षा सप्टेंबरअखेरीस होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

तरुणांसाठी सुवर्णसंधी; दहावीच्या गुणांच्या आधारावर रेल्वेत मिळणार…

परराज्यात सध्या १३ विविध प्रवेशपरीक्षा होतात. करोनाचे संकट तीव्र होत असल्याने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या परीक्षा दोनवेळा पुढे ढकलल्या आहेत. या विद्यार्थ्यांची सीईटीहोणार की, नाही याबाबत निर्णय जाहीर केलेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटीसेलकडून दरवर्षी प्रवेशपरीक्षा घेतल्या जातात. त्या गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांसंबंधी तब्बल तीन लाख जागांवर प्रवेश दिले जातात. मात्र, यंदा करोनाचे संकट तीव्र झाल्याने या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. याचदरम्यान, प्रवेशपरीक्षा न घेता प्रवेश देण्याबाबतची चर्चाही झाली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि विद्यार्थ्यांची प्रवेशपरीक्षेची मानसिकता लक्षात घेता, ही परीक्षा घेणेच हिताचे ठरेल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत ठरविण्यात आले.

आता ही परीक्षा नेमकी कशी घ्यायची याबाबत चर्चा सुरू आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय पातळीवरील ‘जेईई’ आणि ‘नीट’ या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामुळे या परीक्षा पार पडल्यानंतर राज्यातील प्रवेशपरीक्षा पार पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

एम्समध्ये नर्सिंग ऑफिसरच्या 3803 पदाकरिता भरती सुरू

रम्यान, राज्यात प्रवेशपरीक्षा होणार असून, ही परीक्षा नेमकी कशी घ्यायची याबाबत सरकारी पातळीवर चर्चा सुरू असल्याचे राज्याचे प्रवेशपरीक्षा कक्षाचे आयुक्त संदीप कदम यांनी सांगितले. यंदा एमएचटी सीईटीसाठी पाच लाख ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!