राज्यातील इंजिनीअरिंग पदवी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जारी

Maharashtra Engineering Admission 2020-21

Maharashtra Engineering Admission 2020-21: Following the announcement of the results of the entrance examination, the timetable for the admission process of Engineering and Pharmacy (B.E. / B.TECH Admission 2020-21) has been announced. The admission process for both these courses will start on Wednesday, December 9. This will bring relief to the students who have been waiting for admission for the last few months.

राज्यातील इंजिनीअरिंग पदवी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जारी

इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले.

प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर इंजिनीअरिंग आणि फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेचे (B.E. / B.TECH Admission 2020-21) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया बुधवार ९ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेरीचे (Engineering Admission 2020-21) वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. यंदा प्रवेशाची प्रक्रिया केवळ दोन फेरींमधून पूर्ण केली जाणार आहे. ९ ते १५ डिसेंबरपर्यंत नोंदणीची प्रक्रिया तर अर्ज पडताळणीची प्रक्रिया १६ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना पूर्ण करावी लागणार आहे. १८ डिसेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेचा निकाल २८ नोव्हेंबरला जाहीर झाला. यंदा कोरोनामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा उशिराने सुरू झाल्या. यामुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केल्यानंतर सीईटी सेलने आता प्रवेश प्रक्रियेला सुरूवात केली आहे. त्यानुसार मंगळवार एमबीए आणि आर्किटेक्ट या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा सुरू झाल्यानंतर आता इंजिनीअरिंग आणि फार्मसीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून सुरूवात करण्यात येत आहे. यंदा इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेला तीन लाख ८६ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष प्रवेश प्रक्रियेकडे लागले होते.

अशी आहे इंजिनीअरिंगची प्रवेश क्षमता..
राज्यातील कॉलेज… ३३०
प्रवेश क्षमता… १२३४३१

एमबीए, आर्किटेक्‍ट अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवातइंजिनियरिंग अभ्यासक्रमाचे वेळापत्रक
ऑनलाइन नोंदणी – ९ ते १५ डिसेंबर
कागदपत्र पडताळणी – ९ ते १६ डिसेंबर

तात्पुरती गुणवत्ता यादी – १८ डिसेंबर

हरकती नोंदवणे – १९ व २० डिसेंबर
अंतिम गुणवत्ता यादी – २२ डिसेंबर
कॅप राऊंड १ साठी सीट मॅट्रिक्स जाहीर – २२ डिसेंबर
पहिली सामायिक प्रवेश फेरी – २३ ते २५ डिसेंबर
तात्पुरती प्रवेश यादी जाहीर – २८ डिसेंबर
हरकती व प्रवेश प्रक्रिया – २९ ते ३१ डिसेंबर
कॅप राऊंड २ ला सुरुवात – १ जानेवारी २०२१

B.E. / B.TECH Admission 2020-21 ची सविस्तर माहिती असलेली नोटीस वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!