लॉकडाउनमध्येही रोजगार ‘अनलाॅक’; सतरा हजार बेरोजगारांची नोंदणी

Maharashtra Job Fair 2020

Maharashtra Rojgar Melava 2020: The Corona crisis has created a problem of unemployment. However, in the last three months, the online job fairs organized by the Skill Development Department in the districts and the Mahaswayam web portal have provided employment to 17 thousand 715 unemployed people. During this period, one lakh 72 thousand 165 unemployed people have registered on various platforms of the department and the department is making efforts to get jobs for all these candidates, informed the Minister for Skill Development Nawab Malik.

Maharashtra Rojgar Melava 2020 

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. मात्र, असे असतानाही गेल्या तीन महिन्यांत कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाइन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. या कालावधीत विभागाच्या विविध व्यासपीठांवर एक लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी नोंदणी केली असून, या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

 लॉकडाउनमध्येही रोजगार ‘अनलाॅक’; सतरा हजार जणांना मिळाले काम

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले असून, त्यावर बेरोजगार उमेदवार नोंदणी करत आहेत; तर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्‌स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजकांमध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येत आहे, अशी माहिती मलिक यांनी यावेळी दिली.

मागील तीन महिन्यांत एप्रिल ते जून अखेर या वेबपोर्टलवर २ लाख ७२ हजार १६५ इतक्‍या इच्छुक उमेदवारांनी नोकरीसाठी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली.

ऑनलाईन मेळाव्यात ४० हजार जण सहभागी

जिल्हास्तरावर मागील तीन महिन्यांत २४ ऑनलाइन रोजगार मेळावे पार पडले आहेत. या मेळाव्यांमध्ये १६७ उद्योजकांनी सहभाग घेतला असून, १६ हजार ११७ जागांसाठी त्यांनी ऑनलाइन मुलाखती घेतल्या व  ४०,२२९ तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत २,१४० तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरू आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही मंत्री मलिक यांनी यावेळी सांगितले.

2 Comments
  1. Balu damodar pashte says

    Job

  2. Swapnil konge says

    Mla ter kahi milali nahi ajun job me registered karun pn

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!