Maharashtra NTSE 2022-राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा जानेवारीत होणार

Maharashtra NTSE 2022

Planning for the National Intelligence Test (NTSE 2022) has gained momentum. The first phase of the exam will be held on January 16, 2022. The application process is in the final stage. There is a last chance to submit application till 13th December after paying the late fee. So, as the exam will be conducted by the National Council for Educational Research and Training, the practice classes for the students have also started now.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE, Pune) पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची दिनांक जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या (NTSE 2022) नियोजनाला वेग आला आहे. १६ जानेवारी २०२२ रोजी परीक्षेचा पहिला टप्पा पार पडणार आहे. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अतिविलंब शुल्क भरून १३ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची अखेरीची संधी आहे. तर, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ही परीक्षा होणार असल्याने, विद्यार्थ्यांचे सराव वर्गही आता सुरू झाले आहेत.

 • इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ‘एनटीएस’करीता अर्ज करण्याची संधी आहेत्यासाठी शाळानिहाय अर्ज प्रक्रिया सुरू आहे. १३ डिसेंबरपर्यंत अर्ज व शुल्क नोंदणी होईल.
 • त्याची जबाबदारी पूर्णत: मुख्याध्यापकांवर असेल, असे परिषदेने स्पष्ट केले आहे. गतवर्षी महाराष्ट्र राज्यातून ७७४ विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्तीकरिता करण्याचा ‘कोटा’ निश्चित करण्यात आला होता. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना ‘निगेटिव्ह मार्किंग’ नसेल, असेही स्पष्ट केले आहे.
 • तर, अवघ्या महिन्याभराने परीक्षा होणार असल्याने शाळांमध्ये सराव वर्गांना सुरुवात झाली आहे. प्रत्यक्ष वर्ग भरत असल्याने सराव करणे अधिक सोयीस्कर झाल्याचे विद्यार्थी सांगतात. तर, अतिरिक्त सरावासाठी ई-तासिकांचेही नियोजन काही शाळांनी केले आहे. दरम्यान, परीक्षेची गुणपडताळणी होणार नाही.
 • परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येते. त्यामुळे परीक्षेनंतर अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध होईल. विद्यार्थी त्याद्वारे गुणांची तुलना करू शकतात. प्रथमस्तर परीक्षेचा निकाल मार्च २०२२ मध्ये जाहीर होईल. परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या वेबसाइटवर अपलोड केली जाईल, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.

परीक्षेचे स्वरुप

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
 • सकाळी १०.३० ते १२.२० या वेळेत बौद्धिक क्षमता चाचणी होईल.
 • तर, दुपारी १.३० त ३.३० या वेळेत शालेय क्षमता चाचणी होईल.
 • दोन्ही परीक्षेत १०० प्रश्न असतील. त्यासाठी प्रत्येकी एक गुण असेल.

Maharashtra State Examination Council (Maharashtra NTSE 2022) State Level National Intelligence Research Examination will be held on 16th January. Students studying in class X can apply online. The schedule for the exam has been announced by the Examination Council on Monday. You can apply for the exam from 16th to 30th November with regular fee.

National Talent Search Examination, NTSE – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’तर्फे घेण्यात येणारी (Maharashtra NTSE 2022) राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा १६ जानेवारीला होणार आहे. प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना अधिकाधिक विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे.

National Talent Search Examination Exam 2022

 • इयत्ता दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. परीक्षेसाठीचे वेळापत्रक परीक्षा परिषदेने सोमवारी जाहीर केले आहे. परीक्षेसाठी नियमित शुल्कासह १६ ते ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येतील.
 • विलंब शुल्कासह एक ते सात डिसेंबर दरम्यान आणि अतिविलंब शुल्कासह; तसेच शाळा, संस्था जबाबदार असल्यास अतिविलंब शुल्कासह आठ ते १३ डिसेंबर या कालावधीत विद्यार्थी अर्ज करू शकतील.
 • त्यानंतर ‘एनटीएस’ द्वितीय स्तरावरील परीक्षा पुढीलवर्षी १२ जूनला होईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली.
 • राष्ट्रीय परीक्षेतून देशभरातील दोन हजार प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य शाखांमध्ये पीएचडी पदवी प्राप्त होईपर्यंत विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते.
 • मात्र, इंजिनीअरिंग, वैद्यकीय, व्यवस्थापन आणि विधी या विद्याशाखांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती पदव्युत्तर पदवीपर्यंत दिली जाते, असेही परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. अधिक माहिती परिषदेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!