महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत अधिकाऱ्यांची विविध पदे रिक्त
Maharashtra State Council Of Examination Bharti 2021
The Maharashtra State Examination Council has sanctioned 23 posts of officers out of which 12 are vacant. The test is contracted out to a private agency. However, it has to be controlled by the authorities. Many posts in the examination council have been vacant for the last few years
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत अधिकाऱ्यांची विविध पदे रिक्त
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत अधिकाऱ्यांची 23 पदे मंजूर असून त्यातील 12 रिक्त आहेत. यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्त कामाचा भार पडतो आहे.
परीक्षा परिषदेत अधिकाऱ्यांची 11 पदे भरली आहेत. उर्वरित रिक्त आहेत. अध्यक्षपद हे शिक्षण संचालक दर्जाचे व आयुक्तांचे पद हे सहसंचालक दर्जाचे आहे. ही दोन्ही पदे रिक्त आहे. सहायक आयुक्तांची चार पदे मंजूर असून त्यातील दोन पदे भरली आहेत. प्रशासन अधिकारी पदही रिक्त आहे. अधिक्षकांची पाचही पदे भरली आहेत.
परीक्षा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी विविध परीक्षा घेण्यात येतात. परीक्षांचे अर्ज मागविण्यापासून ते निकाल लावण्यापर्यंत सर्व कामांचे नियोजन अधिकाऱ्यांनाच करावे लागते. परीक्षा घेण्याचा ठेका खासगी एजन्सीला दिला जातो. मात्र, त्यावर नियंत्रण अधिकाऱ्यांनाच ठेवावे लागते. मागील काही वर्षांपासून परीक्षा परिषदेतील बरीचशी पदे रिक्त आहेत