सावधान ! आदिवासी विभाग भरतीची खोटी जाहिरात व्हायरल

Mahatribal Fake Website

Maha Tribal Bharti 2020 Fake Website – mahatribal.webs.com

बनावट शासकीय संकेतस्थळावर ‘त्याने” चक्क 199 जागांसाठी मेगा नोकरभरती जाहीर केली होती….अखेर..

Adiwasi Vikas Bharti Fake News: The chief suspect in cyber police has been arrested from Jalgaon for allegedly promoting mega bureaucrats on a fake website in the name of Tribal Development Commissioner. The court has given him a police custody till next Monday (Date 2), and a large racket may be handed over from the probe. The highly-educated suspect had created a fake website of “tribal” and announced a mega job of 3 thousand 199 different positions.

Adiwasi Vikas Bharti Fake News

आदिवासी विकास आयुक्तालयाच्या नावाने बनावट संकेतस्थळावर मेगा नोकरभरतीची जाहिरात करीत फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांत मुख्य संशयिताला जळगाव येथून अटक केली. न्यायालयाने त्यास येत्या सोमवार (ता. 2)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, चौकशीतून मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्‍यता आहे. उच्चशिक्षित असलेल्या या संशयिताने “आदिवासी’चे बनावट संकेतस्थळ तयार करून तीन हजार 199 विविध पदांची मेगा नोकरभरती जाहीर केली होती.

सायबर पोलिसांनी घेतले जळगावातून ताब्यात

या प्रकरणी आदिवासी विकासचे सहाय्यक आयुक्त अविनाश चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या 18 फेब्रुवारीस नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. जितेंद्र रामा तायडे (वय 24, रा. पुरी, पो. बलवाडी, ता. रावेर, जि. जळगाव) असे संशयिताचे नाव आहे. तो बीई-सिव्हिल असून, त्याला संगणकाची चांगली माहिती आहे. त्यानेच आदिवासी विकास आयुक्तालयाचे mahatribal.webs. com या नावाचे बनावट संकेतस्थळ तयार करून तीन हजार 199 जागांसाठीची मेगा नोकरभरती जाहीर केली होती. यात सिव्हिल इंजिनिअर, इलेक्‍ट्रिक इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट, सुपरवायझर, लॅबोरेटरी असिस्टंट, शिपाई अशा पदांसाठी उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात केले होते. अर्जासाठी खुल्या प्रवर्गाला 500 रुपये आणि इतरांसाठी 350 रुपये शुल्क आकारणी करीत हे शुल्क ऑनलाइन मागविले होते. मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांत भरती असून मुंबईसाठी एक हजार 31, नाशिक 724, पुणे 866, जळगाव 578 जागा भरणार असल्याची mahatribal.webs.com या बनावट संकेतस्थळावर माहिती दिली होती.

जळगावातून केली अटक

संशयित तायडे याने बनावट संकेतस्थळावरून ऑनलाइन पेमेंटसाठी payumoney या वॉलेटशी लिंक केले होते. नाशिक सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराज बोरसे यांच्यासह पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला व जळगावमध्ये सापळा रचून त्यास अटक केली. त्याच्याकडून एक लॅपटॉप, मोबाईल, दोन मोबाईल सीमकार्ड असा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्याला 2 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयिताच्या चौकशीतून मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्‍यता आहे.

सायबर पोलिसांकडे संपर्क साधावा.

संशयित उच्चशिक्षित असून, संगणक प्रोग्रॉमिंगचेही त्याला ज्ञान आहे. चौकशीतून त्याच्या साथीदार आणि यापूर्वीही त्याने अशा पद्धतीने गुन्हा केल्याची माहिती मिळण्याची शक्‍यता आहे. या बनावट जाहिरातीनुसार अर्ज करीत पैसे भरले असतील, अशा उमेदवारांनी सायबर पोलिसांकडे संपर्क साधावा. –

सौर्स : सकाळ


आदिवासी विभागात नोकर भरती असल्याची जाहिरात गेल्या दोन दिवसांपासून व्हाट्सएप, इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. मात्र, व्हायरल झालेली पोस्ट आणि लिंक ही आदिवासी विकास आयुक्तालयाची फेक वेबसाइट असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता नाशिक सायबर ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. आदिवासी विकास आयुक्तालयाच्या नावाने ही जाहीरात व्हायरल होत आहे.

या फेक वेबसाइटमध्ये माहिती देताना 3 हजार 199 जागांसाठी नोकर भरती असून सिव्हिल इंजिनिअर, इलेक्ट्रिक इंजिनीअर 8, सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट, सुपरवायझर, लॅबोरेटरी असिस्टंट, शिपाई अशा 6 विभागांध्ये भरतीची जाहिरात काढण्यात आल्याची खोटी माहिती देण्यात आली आहे. या जागा मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव या ठिकाणा अंतर्गत भरती असून मुंबईसाठी 1 हजार 31, नाशिक 724, पुणे 866, जळगाव 578 जागा भरणार असल्याची mahatribal.webs.com या वेबसाईटवर माहिती देण्यात आलीय. यापुढे उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले असून अर्जासाठी खुल्या प्रवर्गाला 500 रुपये आणि इतरांसाठी 350 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. ऑनलाइन शुक्ल मागविण्यात आले असून त्यामुळे हजारो बेरोजगार तरुणांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. याची दखल आदिवासी विकास विभागाने घ्यावी, अशी मागणी केली आहे.

ही वेबसाइट आणि त्यातील मजकूर हा मुख्य आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वेबसाइटप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या वेबसाइटची लिंकला क्लिक केले असता कोणत्याही व्यक्तीला ही वेबसाइट खरी आहे की खोटी हे कळणार नाही. याबाबत एका वृत्तवाहिनीने या वेबसाइटची पडताळणीसाठी आदिवासी विकास आयुक्तांना याबाबत विचारले असता त्यांनी आज याबाबत तक्रार दाखल केल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!