Malabar Gold Bharti – मलाबार गोल्ड करणार 5000 अधिक पदांची भरती
Malabar Gold & Diamonds Bharti 2021
Malabar Gold & Diamonds provide the jobs opportunity to Freshers candidates. As many as 5,000 vacancies have been announced in all over country for retail operations. The company on Tuesday announced retail jewellery, sales, store operations and account positions. The recruitment will be done mainly at the company’s headquarters in Kozhikode, Bangalore, Chennai, Hyderabad, Mumbai and Kolkata. More details regarding the Malabar Gold Bharti 2021 are given below:-
मलाबार गोल्ड करणार 5000 अधिक पदांची भरती
केरळ (Kerala) येथील मलाबार गोल्ड आणि डायमंडसने (Malabar Golds And Diamonds) रिटेल्स ऑपरेशन्ससाठी देशात तब्बल 5 हजार पदांची भरती (Vacancies) करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मंगळवारी रिटेल ज्वेलरी, सेल्स, स्टोअर ऑपरेशन्स आणि अकाउंट पदांची घोषणा केली आहे. यापैकी निम्म्या पदांवर महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Opportunity in Malabar Gold – यांनाही मिळणार संधी
- फ्रेश बीटेक, एमबीए उमेदवारांना ज्वेलरी रिटेल्स सेल्स आणि ऑपरेशन्स या कामाचा अनुभव मिळावा यासाठी इटर्नशीप (Internship) आणि ट्रेनीशीपचाही (Traineeship) पर्याय देण्यात आला आहे. असे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
Malabar Gold Department Name या विभागात केली जाणार भरती
- यासंदर्भात मलाबार गोल्डने दिलेल्या निवेदनानुसार, ही पदभरती प्रामुख्याने डिझाईन अॅण्ड डेव्हलपमेंट, डिजीटल मार्केटिंग, ज्वेलरी उत्पादन, सप्लाय चेन मॅनेजमेंट, मर्चंटडायझिंग, प्रोजेक्ट एक्जिक्युशन, फायनान्स अॅण्ड अकाउंटस, बिझनेस अॅनालिक्टस आणि आयटी या विभागात केली जाणार आहे.
- ही पदभरती प्रामुख्याने कंपनीचे कोझिकोड येथील मुख्यालय, बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि कोलकाता या विभागीय कार्यालयाव्यतरिक्त अन्य ठिकाणी केली जाणार आहे.