मालेगाव मनपात मानधन तत्त्वावर जम्बो भरती!
मालेगाव मनपात जम्बो भरती! निर्देशांचे पालन करीत राबवणार भरतीप्रक्रिया
MMC Vacancies 2020
मालेगाव (नाशिक) महापालिकेत अस्थापनेवर मंजूर पदांपेक्षा शेकडो पदे रिक्त आहेत. ६० टक्के कर्मचाऱ्यांवर कामकाजाचा गाडा आहे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता तातडीने कामे मार्गी लागण्यासाठी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी विविध ४४ संवर्गातील एक हजार सहा पदांची जम्बो भरती होणार आहे. ठोक मानधन पद्धतीने थेट मुलाखतीद्वारे नियुक्ती केली जाणार आहे. महापालिकेच्या मुख्य कार्यालयात कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक निर्देशांचे पालन करीत भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे .
Malegaon Mahanagarpalika Recruitment 2020
मालेगाव मनपात मानधन तत्त्वावर भरती
मनपातील जागा मानधन स्वरूपाच्या आहेत. ही भरतीप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी कुठल्याही गैरप्रकाराला बळी पडू नये. विविध पदनिहाय मुलाखतींची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे. भरतीप्रक्रियेचे सर्व अधिकार आयुक्तांना आहेत. सहा महिन्यांचा कार्यकाळ संपताच नियुक्ती संपुष्टात येईल. अनुभवी व स्थानिक उमेदवारांना भरतीप्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांच्या प्रमाणपत्राच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. अपात्र उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
सौर्स : सकाळ