MCCAI तर्फे युवक-युवतींना फेलोशिपची संधी

MCCIA Fellowship 2020

MCCAI तर्फे युवक-युवतींना फेलोशिपची संधी

 पुणे – उद्योगजगताच्या आंतरराष्ट्रीय व्यापार, कृषी, अन्नप्रक्रिया, प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आदी विभागांमध्ये युवकांना मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) फेलोशिपची संधी मिळणार आहे.

 आठ दशकांहून अधिक काळाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या ‘एमसीसीआयए’ने महत्त्वाकांक्षी युवक-युवतींना फेलोशिपची संधी उपलब्ध करून दिली आहे. चेंबरच्या विविध विभागांमध्ये वर्षभर काम करून युवकांना आपले अनुभवविश्‍व समृद्ध करता येणार आहे

 या ‘फेलोशिप’ उपक्रमातून निवड झालेल्या उमेदवारांना वर्षभर ‘एमसीसीआयए’ व संलग्न संस्थांच्या चमूसोबत काम करता येईल. त्याशिवाय पुण्यासह देशभरातील आघाडीच्या उद्योगांचे संस्थापक व कार्यकारी प्रमुखांची भेट तसेच धोरणकर्त्यांशी संवाद साधण्याची संधीही त्यांना मिळेल. विविध क्षेत्रातील पदवीधर व पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थ्यांकडून फेलोशिपसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुकांनी ‘एमसीसीआयए’च्या www.mcciapune.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

सोर्स: सकाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!