बेळगावात मेगा लष्कर भरती 

Mega Army Recruitment in Belgaum

 बेळगावात मेगा लष्कर भरती

Mega Army Recruitment in Belgaum: Army recruitment will take place on the grounds of Visvesvaraya Technical University from Thursday, February 4 to February 15. 5,000 candidates will participate in the army recruitment every day. The process will run from 4 to 15 February. It is expected that 250 candidates will participate in one round.

 विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या मैदानावर गुरुवार 4 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत लष्कर भरती होणार आहे. यासाठी बेळगावला येणाऱया उमेदवारांची आरोग्य तपासणी, सुरक्षा व इतर सुविधा पुरविण्यासंबंधी जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी अधिकाऱयांना सूचना केल्या.

 शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ही बैठक झाली. सैन्यदलात भरती होण्यासाठी येणाऱया उमेदवारांना आवश्यक सुविधा मिळाव्यात. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या मैदानात व मैदानाबाहेर पोलीस व गृहरक्षक दलाने सुरक्षा पुरवावी. आरोग्य खात्याने उमेदवारांची थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी करण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे.

याबरोबरच आरोग्य विभागाने मास्क, सॅनिटायझर व रुग्णवाहिका तयार ठेवावी. भरती प्रक्रियेवेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी या परिसरात हजर राहणे सक्तीचे आहे. मध्यवर्ती बसस्थानक व रेल्वेस्थानकापासून विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या मैदानावर उमेदवारांना जाता यावे, यासाठी आवश्यक बस सुविधा पुरविण्याची सूचना परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांना करण्यात आली आहे.

 लष्कर भरतीसाठी रोज 5 हजार उमेदवार भाग घेणार आहेत. 4 ते 15 फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. एका फेरीत 250 उमेदवार भाग घेतील, अशी सोय आहे. शिक्षण खात्याच्या अधिकाऱयांनी उमेदवारांचे दाखले तपासावेत, अशी सूचना करण्याबरोबरच परिसरात अखंडित वीजपुरवठय़ासंबंधी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना हेस्कॉमच्या अधिकाऱयांना करण्यात आली आहे.

सोर्स: तरुण भारत

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!