MEMS Bharti Pune Interviews for Medical Care
MEMS Bharti Pune Interviews for Medical Care
मेम्स भरती जाहिरात – ८३ जागा
वैद्यकीय सेवेकरिता थेट मुलाखतीचे आयोजन
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेत (मेम्स) आठ पदांच्या ८३ पेक्षा जास्त रिक्त जागांवर नियुक्ती करण्यासाठी थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. ११ व १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या मुलाखतींसाठी बीएएमएस, बीयुएमएस यासह एमबीए, बीई आणि इतर पदवीधर पात्र असून राज्यातील शहरी व ग्रामीण भागात नियुक्ती केली जाणार आहे.
राज्य आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय रूग्णवाहिका सेवेच्या रिक्त पदांसाठी भरतीप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पुणे येथील औंध कॅम्प परिसरातील औंध चेस्ट हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात त्यासाठीच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. या अंतर्गत ऑपरेशन मॅनेजरच्या १८, ट्रेनिंग इंस्ट्रक्टरच्या ३, फ्लीट मॅनेजर आणि एरिया मॅनेजर -बायो मेडिकलच्या प्रत्येकी १, बायो मेडिकल इंजिनीअरच्या ८, क्वॉलिटी असोसिएटच्या २, टेली कॉलरच्या ५० आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिकारी रिक्त पदांसाठी मुलाखत होईल. अधिकारी पदाकरिता बीएएमएस आणि बीयुएमएस पदवीधर पात्र असतील. तर मॅनेजर पदाकरिता हेल्थ केअर एमबीए, मेकॅनिकल, बायोमेडिकल आणि ऑटोमोबाइल इंजिनीअर, असोसिएट व टेली कॉलरसाठी कोणत्याही शाखेचे पदवीधर पात्र असतील.
नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, रायगड, उस्मनाबाद, भंडारा, वाशिम, वर्धा या ठिकाणी मॅनेजर पदे भरण्यात येतील. इतर पदे रिक्त जागांच्या तपशिलानुसार भरण्यात येणार असून, अधिकाऱ्यांची पदे ग्रामीण व शहरी दोन्ही भागात भरण्यात येणार असल्याची माहिती भरती समितीने दिली.
How to Registered MEMS Pune Recruitment 2019 / अशी करा नोंदणी
११ व १२ नोव्हेंबर रोजी सकाली १० ते सायंकाळी ६ या वेळेत मुलाखती होतील. त्यासाठी इच्छुकांनी त्यांचे नाव, संपूर्ण माहिती [email protected] या ई-मेलवर पाठविण्याची सूचना केली आहे. अधिक माहितीसाठी ७३५००१०८०४ किंवा ९५२७२१०८०८ या हेल्पलाइन क्रमांकावर इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
म. टा.
Complete Information and Application Form