MPSC साठी अडीच लाख विद्यार्थी! परीक्षा केंद्रे न बदलण्यावर आयोग ठाम
एमपीएससी’साठी अडीच लाख विद्यार्थी! परीक्षा केंद्रे न बदलण्यावर आयोग ठाम
सोलापूर : राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. लॉकडाउनमध्ये मूळगावी परतलेली मुले अद्यापही त्याच ठिकाणी अभ्यास करीत आहेत. दरम्यान, आता 13 सप्टेंबरला राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार असून, अडीच लाख विद्यार्थ्यांनी यापूर्वी निवडलेल्या परीक्षा केंद्रांवर जाणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रे बदलण्याची मुभा आयोगाने द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, ठरलेल्या केंद्रावरच परीक्षा होईल, अशी ठाम भूमिका आयोगाने घेतली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने 24 मार्चपासून देशभर कडक संचारबंदी लागू केली. तत्पूर्वी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉस्टेल, अभ्यास केंद्रे बंद करण्यात आल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अंदाजित सव्वा लाखाहून अधिक परीक्षार्थी त्यांच्या मूळगावी परतले आहेत. उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, बीड, गडचिरोली, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमधील बहुतांश विद्यार्थ्यांनी पुणे केंद्र निवडले असून, ते परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात राहात होते. आयोगाने काही झाले तरी परीक्षा घेण्याचे नियोजन केले असून, परीक्षा केंद्रांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या हेतूने निविदाही काढली आहे. तत्पूर्वी, परीक्षार्थींनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या माध्यमातून आयोगाला परीक्षा केंद्रे बदलण्याची संधी द्यावी, असे पत्र पाठविले आहे. आमदार रोहित पवारही त्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र, आयोग त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने आता सरकार काय तोडगा काढणार, याकडे लक्ष लागले आहे
आगामी परीक्षेची स्थिती
- एकूण परीक्षार्थी : 2.60 लाख
- परीक्षा केंद्रे : 800
- एका खोलीतील विद्यार्थी : 24
- मूळगावी परतलेले परीक्षार्थी : 1.30 लाख
मुख्यमंत्र्यांची आयोगाच्या अध्यक्षांसमवेत बैठक
राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच मृतांची संख्याही कमी झालेली नाही. राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप कमी झाले नसल्याने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय प्रलंबितच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य लोकसेवा आयोगाने दोनवेळा पुढे ढकललेली राज्यसेवेची परीक्षा आता 13 सप्टेंबरला घेण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, त्याच दिवशी “आयबीपीएस’चीही परीक्षा जाहीर झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या हिताचा तोडगा काढण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई यांची 15 ऑगस्टला भेट घेणार असल्याचे समजते. बैठकीनंतर मुख्यमंत्री काय निर्णय जाहीर करतील, याची परीक्षार्थींना उत्सुकता आहे.
‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांसाठी…’; मनविसेने विभागीय आयुक्तांकडे काय केली मागणी?
पुणे ‘कोरोना’मुळे पुणे सोडून गेलेले स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे हजारो विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या;राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी पुण्यात येणार आहेत. बहुतांश जण त्यांच्या खोल्या सोडून गावाकडे गेले होते, त्यामुळे त्यांच्या निवासाची व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी;महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी खबरदारीच्या उपाययोजना आयोगाकडून घेण्यात येत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात या विद्यार्थ्यांना आपली;राहती ;खोली, वसतिगृह सोडावे लागले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी शहरात आल्यानंतर निवास व्यवस्थेची मोठी अडचण येणार आहे.
राज्यभरात सध्या असंख्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती देखील हलाकीची आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात यावी, अशी मागणी शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली आहे. राव यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन निवास व्यवस्था करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे, असे यादव यांनी यावेळी सांगितले.
MPSC Has Taken Various Measures to Conduct the Examination
MPSC Has Taken Various Measures to Conduct the Examination: During the Corona crisis, the Maharashtra Public Service Commission (MPSC) will have to conduct three examinations from September to November. The Commission’s readiness to conduct the examination safely during this period will be tested. Therefore, precautionary measures have been taken by the Commission by providing other facilities including Basic Covid Kit to each candidate.
परीक्षा घेताना ‘एमपीएससी’चीच लागणार कसोटी; उमेदवारांसाठी घेतला ‘हा’ निर्णय!
पुणे :’कोरोना’ संकट असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात तीन परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. या काळात सुरक्षितपणे परीक्षा पार पाडण्यासाठी आयोगाच्याच तयारीची कसोटी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला बेसिक कोवीड कीटसह इतर सुविधा देऊन खबरदारीच्या उपाययोजना आयोगाने हाती घेतल्या आहेत.
‘कोरोना’मुळे एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा ‘एमपीएससी’ला पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. सुधारीत नियोजनानुसार आता राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर रोजी राज्यात घेतली जाणार आहे. या परीक्षा ऐन कोरोनाच्या काळात होत असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी केली होती. मात्र, आयोगाने स्पष्ट नकार दिल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाकडचे परीक्षा केंद्र उपलब्ध होणार नाही, त्यांना मुंबई, पुणेच गाठावे लागणार आहे.
या शहरांमध्ये परीक्षार्थींची संख्या मोठी असल्याने सोशल डिस्टन्सिंग ठेवून परीक्षा व्हाव्यात, उमेदवार, परीक्षक सुरक्षित राहावेत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परीक्षा केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी १२० विद्यार्थ्यांसाठी एका व्यक्तीची नियुक्ती केली जाईल. याच व्यक्तीकडून थर्मल गनने शरीराचे तापमान मोजले जाईल. <br>
ओळखपत्र तपासणीसाठी क्यूआर कोड स्कॅनिंगची व्यवस्था केली जाणार आहे. प्रत्येक उमेदवार, कर्मचारी यांना मास्क बंधनकारक असणार आहे.
दोन विद्यार्थ्यांमध्ये दोन मीटरपेक्षा कमी अंतर असू नये.
त्याचप्रमाणे प्रत्येक उमेदवारास बेसिक कोवीड कीट, हाँडग्लोज, मास्क, सॅनिटाइजर दिले जाणार आहे. तसेच एखादा संशयित रुग्ण वाटल्यास त्यासाठी देखील जास्त काळजी घेतली जाणार आहे. एमपीएससीने या सुविधा पुरविण्यासाठी, परीक्षा केंद्र निर्जंतुकीकरण करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये यासह इतर खबरदारी घेतली आहे.