PSI परीक्षा उत्तीर्ण 737 उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय

MPSC PSI Exam 2021

Home Minister Dilip Walse Patil has taken a big decision regarding the students of the Sub-Inspector of Police Examination (PSI) 2017 and 2018 conducted by the Maharashtra Public Service Commission (MPSC). The Home Minister has announced that MPSC will send a total of 737 eligible candidates for the Sub-Inspector of Police Direct Service Examination 2108 and Sub-Inspector of Police Limited Divisional Examination 2017 under the department for basic training from June 2021.

PSI परीक्षा उत्तीर्ण 737 उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (PSI) 2017 आणि 2018 च्या विद्यार्थ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. MPSC द्वारे पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा 2108 आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2017 मधील एकूण पात्र 737 उमेदवारांना जून 2021 पासून मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय गृहमंत्र्यांनी जाहीर केला आहे. सदरचे प्रशिक्षण हे कोरोना परिस्थितीच्या अधिन राहून तसेच राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांच्या अधिन राहून सुरु करण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

MPSC आयोगातर्फे 2018 मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक भरतीमधील निवड झालेल्या आणि 2017 मध्ये खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2017 मधील एकूण 737 उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जाणार आहे. या उमेदवारांचं प्रशिक्षण जून महिन्यापासून सुरु होईल असे  अपेक्षित आहे. या संदर्भातील पुढील माहिती आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!