MPSC परीक्षेच्या तारखेत बदल ; MPSC’चा मोठा निर्णय!

mPSC Exam Revised Date 2020

 MPSC परीक्षेच्या तारखेत बदल ; MPSC’चा मोठा निर्णय!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 या परीक्षेच्या तारखेत पुन्‍हा एकदा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सोमवारी  (ता.०७) परीपत्रक जारी करत वेळापत्रकात बदल केल्‍याचे कळविले आहे. कोविड परिस्थिमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा 


MPSC’चा मोठा निर्णय! ‘या’ विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा

 सोलापूर :  राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी पुणे जिल्हा निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या महसुली ठिकाणी परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. 17 ऑगस्ट च्या दुपारी दोन वाजल्यापासून 19 ऑगस्टच्या रात्री 23.59 वाजेपर्यंत उमेदवारांना केंद्र बदलता येणार आहेत.

 पुणे जिल्हा निवडलेल्या उमेदवारांपैकी पुणे महसुली विभागात बाहेरील मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या उमेदवारांना त्यांच्या महसूली विभागातील परीक्षा केंद्र निवडता येणार आहे. तर पुणे महसूली विभागातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यास मुभा असणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान महसुली परीक्षा केंद्र बदलण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना आयोगामार्फत एसएमएस केले जाणार आहेत.

 ठळक बाबी. 

  •   17 ऑगस्ट दुपारी दोन ते 19 ऑगस्ट सायंकाळी बारा वाजेपर्यंत बदलता येणार परीक्षा केंद्र
  •   जिल्हा केंद्र निवडण्यासाठी असलेल्या पात्र उमेदवारांना आयोगामार्फत एसएमएस द्वारे कळविले जाणार
  •  प्रत्येक महसूल विभागाच्या मुख्यालयातील जिल्हा केंद्रांची कमाल क्षमता लक्षात घेऊन प्रथम येणाऱ्यास राहणार प्राधान्य
  •   परीक्षा केंद्राची क्षमता संपल्यानंतर केंद्राची निवड उमेदवारांना करता येणार नसल्याचे आयोगाकडून स्पष्टीकरण

 उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय

 राज्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 20 सप्टेंबर रोजी देणार आहेत. परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर येणे उमेदवारांना कठीण होणार आहे. ही अडचण लक्षात घेऊन आयोगाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी दिली आहे.

राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी पुणे जिल्हा निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या महसुली ठिकाणी परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. 17 ऑगस्ट च्या दुपारी दोन वाजल्यापासून 19 ऑगस्टच्या रात्री 23.59 वाजेपर्यंत उमेदवारांना केंद्र बदलता येणार आहेत.

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० – पात्र उमेदवारांना महसुली विभाग मुख्यालय निवडण्यासाठीचे टप्पे खालील प्रमाणे आहेत.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

NEW UPDATE: MPSC Exam 2020: The Maharashtra State Public Service Commission’s recruitment examination for various posts to be held on September 20 will now be conducted not only in Mumbai and Pune but at all the divisional centers in the state. The decision is made against the backdrop of the corona

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर होणार आहे.

मुंबई  : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्यावतीने चर्चा केली आणि कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहोचणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली.

अखेर २० सप्टेंबर २०२० रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे.  यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची अडचण दूर केल्याने राज्याच्या सर्व विभागातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.  अनेक उमेदवारांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांचे आभार मानले आहेत.

परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


MPSC State Services Preliminary Examination 2020- Exam Date Changed

The examination conducted by the National Examination Institute will be conducted at the national level. With this in mind, the State Service Pre-Examination-2020 organized by the Maharashtra Public Service Commission for administrative reasons will be held on Sunday, September 20, 2020.

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020- परीक्षेच्या तारखेत बदल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्‍यसेवा पूर्व परीक्षा २०१९ च्‍या तारखेत पुन्‍हा एकदा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी तारखेत दोनवेळा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्‍या तारखेला वैद्यकीय अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्‍तरावर नीट परीक्षा होणार असल्‍याने पुन्‍हा एकदा एमपीएससीतर्फे परीक्षेची तारीख बदलली आहे. सुधारीत वेळापत्रकानुसार २० सप्‍टेंबरला परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे बुधवारी (ता.१२) परीपत्रक जारी करत वेळापत्रकात बदल केल्‍याचे कळविले आहे. २३ डिसेंबर २०१९ ला प्रसिद्ध केलेल्‍या जाहिरातीस अनुसरून राज्‍य सेवा पूर्व परीक्षा २०१९ यापूर्वी ५ एप्रिलला घेण्याचे प्रस्‍तावित होते. परंतु कोरोना विषाणुमूळे उद्भवलेल्‍या परीस्‍थितीत परीक्षा पुढे ढकण्याचा निर्णय होता. यानंतर १७ जूनला जारी केलेल्‍या परीपत्रकानुसार ही परीक्षा १३  सप्‍टेंबरला घेण्याचे जाहीर केले होते.

राष्ट्रीय परीक्षा संस्‍थेकडून  घेण्यात येणारी परीक्षा ही देशपातळीवर घेण्यात येणार आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासकीय कारणास्‍तव महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विषयांकित राज्‍यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही २० सप्‍टेंबरला घेतली जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता उमेदवार व परीक्षा आयोजनातील सर्व कमृचारी यांच्‍या सुरक्षेसाठी आयोगाकडून आवश्‍यक उपाययोजना केल्‍या जातील, असे स्‍पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!