MSBTE Exam: वेळापत्रकात बदल ;प्रात्यक्षिक परीक्षा २२ जून ते ३ जुलै दरम्यान

MSBTE Exam 2021-2022

MSBTE’s Engineering, Pharmacy, Hotel Management, Surface Coating Technology courses have been rescheduled for summer examinations. Practical exams will be held from June 22 to July 3, while online written exams will be held from July 13 to August 3.

सध्याची करोनाची स्थिती पाहता महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) दुसरी घटक चाचणी आणि उन्हाळी परीक्षेंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांच्या कालावधीत बदल केला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष एक सप्टेंबरपासून सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. सम सत्रांचा शैक्षणिक कालावधीही बदलण्यात आला आहे.

एमएसबीटीईच्या इंजिनीअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनजमेंट, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांच्या उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. प्रात्यक्षिक परीक्षा २२ जून ते ३ जुलैदरम्यान, तर ऑनलाइन लेखी परीक्षा १३ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान होणार आहेत.

 


MSBTE Exam 2021-2022- Diploma examinations conducted by Maharashtra State Board of Technical Education will be held in July-August. The board has informed that the students will be able to fill up the application till 12th May 2021.

MSBTE Exam: डिप्लोमाच्या परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत (MSBTE) राबविण्यात येणाऱ्या विविध डिप्लोमा व अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांच्या उन्हाळी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहेत. या परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर झाले असून, विद्यार्थ्यांना १२ मेपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचे मंडळामार्फत सांगण्यात आले आहे.

‘एमएसबीटीई’मार्फत वेबसाइटवरील स्टुडंट लॉग इन मध्ये विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी हा परीक्षा अर्ज भरताना स्वत:चा मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी भरणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी फॉर्ममध्ये भरलेल्या मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडीवर परीक्षाविषयक माहिती पाठवली जाणार असल्याने, या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांनी अचूकपणे नमूद कराव्यात, असे आवाहन ‘एमएसबीटीइ’मार्फत करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!