शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ चा अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे – MSCE Pune 5th & 8th Class Results
MSCE 5th & 8th Class Results 2023
MSCE 5th & 8th Class Results 2023
Scholarship exam for 5th & 8th Class has been declared now. candidates check the below given details and check their score. Candidates entered the seat no. on below given link and click on the submit button to check the marks.
5th & 8th Class Results Declared
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) – 2023
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) – 2023
शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२३ च्या अंतरिम निकालाबाबतचे प्रसिद्धीपत्रक…
शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२३ च्या अंतिम उत्तरसूचीबाबतचे प्रसिद्धीपत्रक
शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२३ च्या अंतरिम उत्तरसूचीबाबतचे प्रसिद्धीपत्रक
शिष्यवृत्ती परीक्षेत २५७८ पोरं पास; ५ वीचा १५ तर आठवीचा केवळ ८ टक्के निकाल
- पाचवीची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीतील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये जिल्ह्यात पाचवीचा १५.४८ टक्के, तर आठवीचा ८.६० टक्के निकाल लागला आहे.
- पाचवीचे १ हजार ८०२, तर आठवीचे ७७६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. दोन्ही मिळून २ हजार ७७८ मुले या परीक्षेत पास झाली आहेत.
- जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतून पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी पार पडली. या परीक्षेला पाचवीच्या १२ हजार १५७ जणांनी नोंदणी केली. यापैकी ११ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा दिली. आठवीच्या ९४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९०२८ जणांनी परीक्षा दिली. अशा एकूण २० हजार ६६६ पैकी केवळ २ हजार ५७८ विद्यार्थीच शिष्यवृत्तीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
- निकालात अंजनगाव तालुका अव्वल
- जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात अंजनगाव सुर्जी तालुका (१४.३३ टक्के) अव्वल आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर अमरावती तालुका १२.५० टक्के, तिसऱ्या क्रमांकावर धामणगाव रेल्वे ११.११, त्यानंतर मोर्शी १०.९५ टक्के, वरुड ७.७२ टक्के याप्रमाणे निकालाची टक्केवारी आहे. उर्वरित सर्व तालुके निकालाच्या टक्केवारीत मागे पडले आहेत.
MSCE 5th & 8th Class Results 2023
MSCE declared the scholarship results for 5th & 8th Class on official website – https://www.2022.mscepuppss.in/ Candidates just click on the below given link and Enter Candidate’s Seat Number (11 Digits) to see the results. Candidates keep visit us for the further updates.
5th & 8th Class Results Declared
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) – 2022
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) – 2022
MSCE Scholarship 2023 Application form
Online Application link open till 5th November 2022 for 8th Class scholarship on the official website www.nmmsmsce.in & www.mscepune.in. Candidates apply till 5th Nov. 2022 for scholarship. Scholarship examine for 8th Class will be held on 18th December 2022. Read the more details given below:
MSCE Pune 8th Class Scholarship Exam 2023
MSCE Scholarship Answer Key 2023
MSCE Scholarship Exam Answer Key: Maharashtra State Examination Council have been published paper wise final answer sheets of Class V and VIII Scholarship examinations. Maharashtra State Examination Council have been published on the Council’s website www.mscepune.in and https://www.mscepuppss.in.. 5th, 8th scholarship exam interim result is expected by the end of September as the result is released in two months. Read More details are given below.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (Maharashtra State Council of Examination) घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वी च्या स्कॉलरशीप निकालाचे (Maharashtra Scholarship Exam 2022 Result) वेध आता विद्यार्थ्यांना लागले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 20 सप्टेंबरला या परीक्षेची अंंतिम उत्तर तालिका (Final Answer Key) जारी केली आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांतच निकालही जाहीर केला जाणार असल्याने विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कोविड 19 संकटामुळे मागील दोन वर्षापासून या परीक्षेच्या तारखांमध्ये सातत्याने बदल झाले होते. यंदा 31 जुलैला ही परीक्षा राज्यात पार पडली आहे. त्यामुळे परीक्षेनंतर दोन महिन्यात निकाल जारी केला जात असल्याने सप्टेंबर महिना अखेरीपर्यंत 5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल अपेक्षित आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा 2022 अंतिम उत्तरसूची जारी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरसूची जारी करण्यात आली आहे. अंतरिम उत्तरसूची 18 ऑगस्ट 2022 दिवशी जारी केली होती. त्यावर तज्ञांचे अभिप्राय जाणून घेऊन आता अंतिम उत्तरसुची बनवण्यात आली आहे. या अंतिम उत्तर तालिकेवरून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल लावला जाणार आहे.
MSCE Pune Scholarship Exam Answer Key: Maharashtra State Examination Council have been published paper wise final answer sheets of Class V and VIII Scholarship examinations. Maharashtra State Examination Council have been published on the Council’s website www.mscepune.in and https://www.mscepuppss.in. Applicants having any objection may raise their objection before 28th August 2022. Read More details are given below.
शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ ची अंतरिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आलेली असून सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन नोंदविण्यासाठी पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये दि. १८/०८/२०२२ ते दि. २८/०८/२०२२ रोजीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम उत्तरसूची परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.
या अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबत निवेदन परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in’ या संकेतस्थळावरुन ऑनलाइन स्वरूपात करता येणार आहे. ऑनलाइन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर आणि शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये ‘ऑब्जेक्शन ऑन क्वेश्चन पेपर अँड आन्सर की’ या पर्यायात उपलब्ध करून दिली आहे. त्रुटी तसेच आक्षेपाबाबतचे ऑनलाइन निवेदन सादर करण्यासाठी २८ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर त्रुटी तसेच आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. ऑनलाइन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी तसेच आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही. मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
तसेच मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे परिषदेने सांगितले आहे.
ऑनलाइन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्तीबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्याचे नाव, आडनाव. वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग इत्यादी दुरुस्ती करण्यासाठी देखील २८ ऑगस्टपर्यंत मुदत दिल्याचे, दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ च्या अंतरिम उत्तरसूचीबाबतचे प्रसिद्धीपत्रक
Maharashtra State Examination Council have been published Class wise, paper wise final answer sheets of Class V and VIII Scholarship examinations. Maharashtra State Examination Council have been published on the Council’s website www.mscepune.in and https://www.mscepuppss.in.
MSCE Exam 2022 – 5th & 8th Class शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतिम उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता अंतिम उत्तरसूचीच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार असल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे.
या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येणार आहेत. या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा निकाल तयार केला जाईल, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर केला जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.
MSCE Pune Scholarship – 5th & 8th Class शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर