शिष्यवृत्ती प्रशिक्षणासाठी होणार ३०० विद्यार्थ्यांची निवड, १ डिसेंबरला परीक्षा, शिष्यवृत्ती निकाल वाढीसाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न – MSCE Pune Scholarship

MSCE Scholarship Exam Registration

The education department of the Zilla Parishad is making special efforts to ensure that as many students as possible from the district get the merit list of the state in the scholarship examination of class 5 (pre-upper primary) and 8th (pre-secondary) conducted by the Maharashtra State Examination Council every year. In this regard, now all the students will be tested and selected from them and online guidance classes will be started for them. Every year, the State Examination Council organizes scholarship exams for students of classes 5 and 8 to introduce students to competitive exams right from the school level. Students from all mediums, all management schools, including zilla parishads, participate in it. But despite this, the results of this examination are very low.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल, अंतिम निवड यादी जाहीर
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
DTE पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु, येथे पहा वेळापत्रक
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The selection process will be conducted on December 1, 2023, the Navodaya and Scholarship Preparatory Practice Examination will be conducted online for students of all medium and all management schools from class 3 to 8. The result of this examination will be declared on the same day and the merit list preparation will be done at the district level. A total of 300 students, including 150 from class V and 150 from class VIII, will be selected. They will later take online classes till the main exam.

Online Apply Schedule – Format of online session – Opportunities for students of all mediums, all management schools, offline examination on December 1 for selection, guidance by expert teachers of the district, online session organized from December 3, 2023 to February 16, 2024, link to online hour will be sent to selected students. Hourly hours are 7 to 8 a.m. daily, with students as well as their classroom teachers participating.

शिष्यवृत्ती प्रशिक्षणासाठी होणार ३०० विद्यार्थ्यांची निवड, १ डिसेंबरला परीक्षा; शिष्यवृत्ती निकाल वाढीसाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि आठवीच्या (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादी यावेत यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग विशेष प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने आता सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यातून निवडक ३०० विद्यार्थी निवडून त्यांच्यासाठी ॲानलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी म्हणून राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. जिल्हा परिषदेसह सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील विद्यार्थी यात सहभाग नोंदवतात. परंतु असे असतानाही या परीक्षेचा निकाल फारच कमी लागतो.

मागील वर्षी जिल्ह्याचा पाचवीचा निकाल २६ टक्के, तर आठवीचा निकाल १६.८७ टक्के एवढाच होता. त्यामुळे या निकालात वाढ व्हावी, तसेच राज्याच्या गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा समावेश व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जिल्ह्यात अनेकदा शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आल्या. शिवाय शालेय स्तरावर जादा तासही घेण्यात आले. त्याच धर्तीवर आता निवडक ३०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची विशेष तयारी करून घेतली जाणार आहे. पुढील वर्षीची शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. त्या परीक्षेच्या दृष्टीने हे नियोजन सुरू आहे.

Selection Process अशी असेल विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया – १ डिसेंबर २०२३ रोजी तिसरी ते आठवीपर्यंतच्या सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची नवोदय व शिष्यवृत्ती पूर्वतयारी सराव परीक्षा ॲाफलाईन घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा निकाल त्याच दिवशी जाहीर करून जिल्हास्तरावर गुणवत्ता यादी तयारी केली जाईल. त्यात पाचवीचे १५० व आठवीचे १५० असे एकूण ३०० विद्यार्थी निवडले जातील. त्यांचे पुढे मुख्य परीक्षेपर्यंत ॲानलाईन वर्ग घेतले जातील.

Online Apply Schedule -ॲानलाईन सत्राचे स्वरूप –  सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापन शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी संधी, निवडीसाठी १ डिसेंबरला ॲाफलाईन परीक्षा, जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन, ३ डिसेंबर २०२३ ते १६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ॲानलाईन सत्राचे आयोजन, ॲानलाईन तासिकेची लिंक निवडलेल्या विद्यार्थ्यांना पाठवण्यात येईल. तासिकेची वेळ दररोज सकाळी ७ ते ८. विद्यार्थ्यांसह त्यांचे वर्गशिक्षकही सहभागी होणार.


The Maharashtra State Council of Examination, Pune has been issued a notification for Maharashtra Scholarship Registration Form. The Government will give the scholarship to eligible students who qualify in the MSCE Pune Scholarship Exam on 12.02.2023. Students who wish to avail the benefit of this scholarship can apply online for the MSCE Pune 5th & 8th Class Scholarship Examination before 20th December 2022. The deadline for filling the online application form for this exam was given till 15th December.

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) १२ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येत्या २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली होती. परंतु अद्याप शाळांनी ऑनलाइन माहिती आणि आवेदनपत्र भरलेले नाहीत. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळा माहिती प्रपत्र, ऑनलाइन आवेदनपत्र आणि नियमित शुल्क ऑनलाइन भरण्याची मुदत २० डिसेंबर आहे. तसेच, विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी २१ ते २५ डिसेंबरपर्यंत, तर अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत २६ ते ३१ डिसेंबरपर्यंत आहे. शाळांनी आपली माहिती आणि आवेदनपत्र मुदतीत भरावेत, असे आवाहन परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी (दि.20/12/2022) अखेरची संधी मिळणार आहे. या मुदतवाढी संदर्भातील परिपत्रक आज विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.

MSCE Pune

दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरतात. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील 38 हजार 477 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 35 हजार 848 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात गुणवत्ता यादीत येणार्‍या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत दरमहा 100 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तर आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे म्हणजेच दहावीपर्यंत दरमहा 150 रुपये शिष्यवृत्ती मिळते. दरम्यान, शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदनपत्र हे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. परीक्षेविषयी अधिक माहिती https:/www.mscepuppss.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.

फेब्रुवारीत परीक्षा- यंदा शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत घेण्याचे राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केले आहे. त्यानुसार 12 फेब्रुवारीला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी सकाळी 11 ते 12.30 व दुपारी 2 ते 3.30 अशा दोन सत्रांत पेपर घेण्यात येणार आहे.


MSEC Scholarship 2022:  The scholarship examination of class V and VIII was to be conducted on July 20 in all the districts of the state. The scholarship examination has been postponed due to flood-like conditions caused by heavy rains and landslides in most places. Now this scholarship exam will be held on 31st July instead of 20th July. Read More details as given below.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी आणि आठवीची येत्या बुधवारी (ता.२०) होणारी शिष्यवृत्ती परीक्षा अतिवृष्टीमुळे उद्‌भवलेल्या पूरसदृश स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या हित लक्षात घेऊन पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलै ऐवजी येत्या ३१ जुलै रोजी होणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे. सद्यःस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश स्थिती उद्‌भवली आहे.

 • तसेच बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी आणि विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
 • आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ३१ जुलै या एकाच दिवशी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील ४८ हजार ८० शाळांमधील सात लाख २१ हजार ५९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिली आहेत.
 • इयत्ता पाचवीच्या (पूर्व उच्च प्राथमिक) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी चार लाख १७ हजार ८९४ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तीन लाख तीन हजार ६९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील एकूण पाच हजार ७०७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

शिष्यवृत्तीसाठी नोंदणी झालेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांची आकडेवारी

 • – एकूण नोंदणी केलेल्या शाळा : ४८,०८०
 • – इयत्ता पाचवीचे विद्यार्थी : ४,१७,८९४
 • – इयत्ता आठवीचे विद्यार्थी : ३,०३,६९७
 • – एकूण विद्यार्थी : ७,२१,५९१
 • – परीक्षा केंद्रांची संख्या : ५,७०७

MSCE Scholarship Exam 2022 Hall Ticket

शिष्यवृत्ती परीक्षा बुधवार दि. २०/०७/२०२२ रोजी घेण्यात येणार आहे.

MSCE Scholarship Exam 2022 Date Declared and Hall Ticket available soon – https://www.2022.mscepuppss.in/startpage.aspx/ published the Scholarship Examine Hall tickets soon. MSCE Pune Scholarship 2022 Exam is going to be held on 20th July 2022. Candidates can check the all details below on this page. This is a scholarship exam for class 5th (PUP) and class 8th (PSS) students.

There is good news for the students who are waiting for the 5th and 8th Scholarship Exam 2022. The exam will now be held on 20th July 2022 in all the districts of the state on the same day.  The Scholarship Exam 2022 hall ticket will be available from 1st July 2022 in school. Shailja Darade, Commissioner, Maharashtra State Examination Council, informed that the Exam Hall Tickets of the students for the scholarship examination have been made available in the login of the school concerned.

MSCE Admit Card download

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी तब्बल सात लाख २१ हजार ५९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.

MSCE Pune Scholarship 2022 Exam Date Released

राज्यातील ४८ हजार ८० शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. इयत्ता पाचवीच्या (पूर्व उच्च प्राथमिक) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तब्बल चार लाख १७ हजार ८९४ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तीन लाख तीन हजार ६९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

या परीक्षेचे प्रवेशपत्र एक जुलैपासून संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्याचे वितरित करावे. परीक्षार्थी आणि पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन दराडे यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी मुंबई वगळता संपूर्ण राज्यात ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. आता मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी ही परीक्षा होणार आहे. शाळा-शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेची जोरदार तयारी करून घेतली जात आहे. शिष्यवृत्ती परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली असून परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा परीक्षेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

शिष्यवृत्तीसाठी नोंदणी झालेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांची आकडेवारी –

 1. – एकूण नोंदणी केलेल्या शाळा : ४८,०८०
 2. – इयत्ता पाचवीचे विद्यार्थी : ४,१७,८९४
 3. – इयत्ता आठवीचे विद्यार्थी : ३,०३,६९७
 4. – एकूण विद्यार्थी : ७,२१,५९१
 5. – परीक्षा केंद्रांची संख्या : ५,७०७

MSCE Scholarship Exam 2022- There is good news for the students who are waiting for the 5th and 8th Scholarship Examinations. The exam will now be held on 20th July 2022 in all the districts of the state on the same day. The examination council had given the required period for filling up the application for the scholarship examination. But for some reason students who could not fill the online application are given the opportunity to apply. Students will be able to apply for the exam from 23rd April 2022 to 30th April 2022. Read the more details given below:

MSCE Pune 5th & 8th Class Scholarship Exam 2022

MSCE 5th & 8th Class Scholarship

5th and 8th Class Scholarship Exam

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा गल्या काही महिन्यांपासून टीईटी प्रवेशाच्या घोटाल्यामुळे रखडली होती. मात्र ही परीक्षा आता येत्या 20 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हांमध्ये एकाच दिवशी घेतली जाणार आहे. कोरोनामुळे मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा लांबली होती. विद्यार्थ्यांना विनाकारण अनेक महिने या परीक्षेचा अभ्यास करावा लागला होता. 2022 मधील शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यातच व्हावी यासाठी परीक्षा परिषदेने आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. मात्र टीईटी परिक्षेतील घोटाळ्यात ‘विनर’ कंपनीचे नाव आल्यामुळे शासनाने या कंपनीच्या सहकार्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, विनर कंपनीने याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने विनर कंपनीच्या बाजूने निकाल दिला. परिणामी परीक्षा परिषदेला आता विनरच्या सहकार्याने शिष्यवृत्ती परीक्षा घ्यावी लागणार आहे

 शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने अर्ज भरणयासाठी आवश्यक कालावधी दिला होता. परंतु काही कारणास्तव ऑनलाईन अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थी 23 ते 30 एप्रिल या कालावधीत परीक्षेसाठी अर्ज भरू शकणार आहेत. 30 एप्रिलनंतर परीक्षेसाठी अर्ज भरता येणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलेजा दराडे यांनी स्पष्ट केले आहे


MSCE Scholarship Exam 2022 Postponed

The deadline for filling up online application for Class V and VIII Scholarship Examination conducted by Maharashtra State Examination Council has been extended till 31st January. Also, the examination scheduled for February 20 has been postponed as per the earlier schedule. The revised date of the examination will be announced soon, the Maharashtra State Examination Council has clarified.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार २० फेब्रुवारी रोजी होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची सुधारित तारीख लवकर जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

 • पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (म्हणजेच इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (म्हणजेच इयत्ता आठवी) २०२२ संदर्भात परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in/’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
 • या परीक्षेचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज (आवेदनपत्र)भरण्यासाठी १ ते ३१ २०२१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु आता शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत मुदतवाढ देण्यात येत आहे.
 • शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अद्याप ऑनलाइन अर्ज न भरलेल्या शाळांना ३१ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ३१ जानेवारीनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज किंवा शुल्क भरता येणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेची सुधारित तारीख लवकरच प्रसिद्ध होणार

‘‘शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलणे क्रमप्राप्त आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेची सुधारित तारीख यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.’’


The application process for the scholarship examination for students in both the fifth and eighth classes has started. The exam will be held on February 20, 2022. Students will be able to fill up these applications from 1st to 31st December

MSCE Scholarship-5th & 8th Class शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

Maharashtra Scholarship 2022 Date: पाचवी आणि आठवी अशा दोन्ही वर्गांमधील विद्यार्थ्यांकरिता असणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जप्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. २० फेब्रुवारी, २०२२ मध्ये ही परीक्षा होणार आहे. एक ते ३१ डिसेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना हे अर्ज भरता येतील.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती, पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती , शासकीय विद्यानिकेतन प्रवेश, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. १ डिसेंबरपासून हे अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे.

MSCE Pune Scholarship – 5th & 8th Class शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर

या परीक्षेत प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा चार विषयांची परीक्षा होईल. सकाळी ११ ते ३ या वेळेत ही परीक्षा होईल. या परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जातील. महाराष्ट्राचे रहिवासी असलेले आणि पाचवी किंवा आठवीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी या परीक्षेकरिता पात्र राहतील. एकूण सात माध्यमे आणि सात सेमीमाध्यमे यांच्यात ही परीक्षा देता येईल. याबाबतची संपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थ‌ळावर देण्यात आली आहे.The Maharashtra State Examination Council conducts the fifth and eighth scholarship examinations every year. Scholarships are given to the students who pass this examination for a certain period of time every month. The state government’s school education department on Thursday decided to increase the fees for the fifth and eighth scholarship examinations.

राज्य सरकारने विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पाचवी; तसेच आठवीच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करण्याऐवजी परीक्षा आणि प्रवेश शुल्कात एकूण अडीचपट वाढ केली आहे. या शुल्कवाढीमुळे शिष्यवृत्ती परीक्षा देण्याकडे कल नसणारे विद्यार्थी यापुढे परीक्षा देतील का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या निर्णयाला पालक आणि विद्यार्थी संघटनांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.

 • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दरवर्षी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा काही कालावधीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठीचे शुल्क वाढविण्याचा निर्णय़ गुरुवारी घेतला.
 • या निर्णयानुसार बिगरमागास; तसेच मागास आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क २० रुपयांवरून ५० रुपये केले आहे, तर बिगरमागास विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ६० रुपयांवरून १५० रुपये केले आहे. यापूर्वी, मागास आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क आकारण्यात येत होते.
 • मात्र, आतापासून ७५ रुपये आकरण्यात येणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षांसाठी बिगरमागास विद्यार्थ्यांना एकूण २०० रुपये, तर मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांना १२५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
 • त्याच वेळी पाचवीची शिष्यवृत्ती सहावी ते आठवीपर्यंत प्रत्येत वर्षातील दहा महिने २५० ते एक हजार रुपयांपर्यंत मिळते, तर आठवीची शिष्यवृत्ती नववी आणि दहावीत प्रत्येकी दहा महिन्यांसाठी ३०० ते दीड हजार रुपयांपर्यत मिळते. ही रक्कम फारच तुटपुंजी असल्याचे शिक्षक आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 • त्यामुळे विद्यार्थी आणि पालक शिष्यवृत्तीच्या परीक्षा गांभीर्यांने घेत नाहीत. आता या परीक्षांच्या शुल्कात अडीचपट वाढ करण्यात आल्याने, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत निम्म्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत शुल्कवाढ करून, शालेय शिक्षण विभागाने कोणता उद्देश साधला, अशी विचारणा होऊ लागली आहे.

परीक्षेचा खर्च वाढल्याने शुल्कात वाढ

शालेय शिक्षण विभागाने २०१० सालानंतर शिष्यवृत्तीच्या रक्कमेत फारशी वाढ केली नाही. मात्र, २०१६मध्ये आणि आता ११ नोव्हेंबरला शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी लागणाऱ्या प्रवेश आणि परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली. या शुल्कवाढीसाठी आवेदनपत्रे भरणे, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांची छपाई, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, निकाल तयार करणे, गुणवत्ता याद्या तयार करणे यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या शुल्कात वाढ करण्यात येत असल्याचा दाखला शिक्षण विभागाने दिला आहे.


Scholarship examinations for Class V and VIII students in the state have been postponed twice in the last fortnight. The exam will now be held on August 12. Earlier, it was announced that the exam would be held on August 8.

Maharashtra Scholarship Exam 2021: राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा ८ ऑगस्टला होणार असे जाहीर झाले होते. पण केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या परीक्षेशी क्लॅश होत असल्याने ती ८ ऐवजी ९ ऑगस्ट रोजी होईल असे जाहीर करण्यात आले. आता पुन्हा ही परीक्षा लांबणीवर पडली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरस्थिती आणि बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होती. ही मागणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा ९ ऑगस्टऐवजी १२ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. यापूर्वी दिलेले प्रवेशपत्र १२ ऑगस्ट रोजीच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे कळवण्यात आले आहे.

Maharashtra State Examination Council President Tukaram Tupe has informed that the date of the fifth and eighth scholarship examinations in the state has been changed. Now the scholarship exam will be held on 9th August.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे यांनी राज्यातील पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलली असल्याची माहिती दिली आहे. आता शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्टला आयोजित केली जाईल. 8 ऑगस्ट ला राज्यात केंद्रीय पोलीस बलाची परीक्षा होत असल्याने परीक्षा पुढे ढकलली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकली होती.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये घेतली शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे आता ही परीक्षा येत्या 8 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती आता ती 9 ऑगस्टला होईल. सर्वसाधारणपणे दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे 10 लाखांहुन अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात. परंतु, यंदा कोरोनामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट झाली आहे.


The fifth and eighth scholarship exams, which were earlier postponed three times due to corona, will now be held on August 8. The school education department has recently given an order in this regard to the Maharashtra State Examination Council

कोरोनामुळे (corona) याआधी तीन वेळा लांबणीवर पडलेली पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा (scholarship exam) आता येत्या ८ ऑगस्टला घेतली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा आदेश महाराष्ट्र राज्‍य परीक्षा परिषदेला नुकतेच दिला आहे. (Fifth and eighth standard scholarship examination now 8th August )

दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी ही परीक्षा घेण्यात येते. यंदा मात्र या कालावधीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होऊ लागली होती. त्यामुळे राज्य सरकारने ही परीक्षा स्थगित केली होती. त्यानंतर एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी ही परीक्षा घेण्यास सरकारने राज्य परीक्षा परिषदेला परवानगी दिली होती. परंतु याच कालावधीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्गांचे प्रमाण खूप वाढले होते. त्यामुळे दुसऱ्यांदा ही परीक्षा स्थगित करावी लागली होती. त्यानंतर २३ मे २०२१ ला ही परीक्षा ठेवण्यात आली होती. परंतु, सलग तिसऱ्यांदा कोरोनामुळे ही परीक्षा स्थगित करण्याची वेळ आली होती.

कोरोना संसर्गामुळे गेल्या शैक्षणिक वर्षातील पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा अद्याप झालेली नाही. त्यातच आता १५ जून २०२१ पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे या नवीन शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षेबाबतची प्रक्रियाही सुरु करावी लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर येत्या ८ ऑगस्टमध्ये मागील शैक्षणिक वर्षातील पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यास शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी परवानगी दिली आहे

The way has been cleared for class V and VIII scholarship examinations (scholarship exam2021). The exam will be held in August. Education Minister Varsha Gaikwad made the announcement in this regard

Scholarship exam 2021: इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा (scholarship exam2021) मार्ग मोकळा झाला आहे. ही परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे.

२०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ऑगस्टमध्ये होणार आहेत. या परीक्षेदरम्यान कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे.

याआधी ही परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या/तिसऱ्या रविवारी घेण्यात येणार होती. त्यानंतर करोना पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलून एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. पण करोनाची परीस्थिती नियंत्रणात न आल्याने पुन्हा या परीक्षेला स्थगिती देण्यात आली.


MSCE Scholarship Exam 2021 Postpone

23मे ला होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ठाकलण्यात येण्याची शक्यता

The scholarship examination for the fifth and eighth year students conducted by the Maharashtra State Examination Council has been postponed. The exam, which will be held on April 25, will now be held on May 23. The State Examination Council has issued a press release in this regard.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 25 एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता 23 मे रोजी होईल. राज्य परीक्षा परिषदेने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.

25 एप्रिल ऐवजी 23मे ला होणार परीक्षा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 25 एप्रिल दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा येत असल्यानं शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली आहे.


Pre-Upper Primary Scholarship Examination for Class V and Pre-Secondary Scholarship for Class VIII are conducted every year. The examination is conducted simultaneously in all the districts of the state. Due to the Corona crisis, the exam has been postponed for two months and will be held on April 25, 2021 instead of February 2021.

MSCE Scholarship Exam 2021 : इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२१ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेसाठी दिनांक ३०/०३/२०२१ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते. परंतु, करोनाच्या संकटामुळे ही परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आली असून, फेब्रुवारी २०२१ ऐवजी 25 एप्रिल 2021 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

दरवर्षी इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती घेण्यात येते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल मध्ये

Scholarship Examine 2020-2021

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी साधारणतः फेब्रुवारीमध्ये होतात. मात्र यंदा या परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहेत.

यंदा स्कॉलरशिपची परीक्षा दोन महिने पुढे ढकलली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लावण्यास उशीर झाला आहे. चालू शैक्षणिक वर्षात होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी साधारणत: ऑक्टोबरमध्ये सुरू होते. याच कालावधीत परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जातात. परंतु यंदा कोरोनामुळे आधीच्याच (फेब्रुवारी २०२०) परीक्षेचा निकालही उशीरा लागला. परिणामी यंदाच्या शैक्षणिक वर्षात (२०२०-२१) शिष्यवृत्ती परीक्षा दोन महिने पुढे जाण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. याबाबत ‘सकाळ’ने ऑक्टोबरमध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याप्रमाणे आता राज्य परीक्षा परिषदेने या परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे.

यापूर्वी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रविवारी घेण्यात येत. मात्र यंदा (२०२०-२०२१) शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्याऐवजी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षा एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी घेण्याचा प्रस्ताव असून त्याला मान्यता मिळाल्यानंतर परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी कळविले आहे.

सौर्स : सकाळ


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!