PET 2024: मुंबई विद्यापीठाच्या ‘पेट’ परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
MU PET Exam Time Table
Ph.D. from The University of Mumbai. The last date for submission of online applications for the Pre-Admission Test (PET) has been extended till November 6 and the Mumbai University administration has appealed to all the candidates to apply with the prescribed fee within the prescribed time. The exam will be conducted on Sunday, November 17 at various centres through online Centre Based Test (CBT) for 77 different subjects in all the four disciplines. Meanwhile, the detailed information of this examination and the facility to fill the application form has been made available on the website. As many as 4,073 students have applied for PET so far. Mumbai University will conduct the PET exam on November 17 from 10.30 am to 12.30 pm at the respective centres.
पेट’चे प्रवेश अर्ज भरण्यास अंतिम मुदतवाढ – मुंबई विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेचे (पेट) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून सर्व परीक्षार्थींनी विहीत कालावधीत निर्धारीत शुल्कासह अर्ज करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. ही परीक्षा चारही विद्याशाखेतील विविध ७७ विषयांसाठी ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट ( सीबीटी) पद्धतीने रविवार, १७ नोव्हेंबर रोजी विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. 0 दरम्यान, या परीक्षेची तपशीलवार माहिती आणि अर्ज भरण्याची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ‘पेट’साठी आतापर्यंत जवळपास चार हजार ७३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मुंबई विद्यापीठातर्फे ‘पेट‘ ही परीक्षा १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या दोन तासाच्या कालावधीत संबंधित केंद्रांवर घेतली जाणार आहे.
As per the latest information the much-awaited Ph.D. from The University of Mumbai. The deadline for submission of pre-admission test (PET) applications has been extended till November 4. The exam will now be held on November 17. The university has started filling up the pet exam forms from last week. Earlier, the last date for submission of admission forms for the PET exam was October 31.
The PET exams will be conducted through online centre-based test (CBT). The university has also released a schedule. The university has extended the deadline for Diwali holidays and to allow more students to apply. Students can now submit their applications by November 4.
The PET exam will be held on November 17 from 10:30 am to 12:30 pm at various centres. The board has appealed to the examinees to appear at the centres 30 minutes in advance.
मुंबई विद्यापीठाच्या ‘पेट’ परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
- मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतीक्षित पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) अर्ज भरण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही परीक्षा १७ नोव्हेंबरला घेतली जाणार आहे. विद्यापीठाने गेल्या आठवड्यापासून पेट परीक्षेचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. याआधी पेट परीक्षेचे प्रवेश अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही ३१ ऑक्टोबर होती.
- पेट परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाने वेळापत्रकही जाहीर केले आहे. दिवाळीच्या सुट्ट्या आणि आणखी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी मिळावी यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ केली आहे. आता ४ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येईल.
- पेट परीक्षा १७ नोव्हेंबर रोजी विविध केंद्रांवर सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० या कालावधीत घेतली जाणार आहे. परीक्षार्थीनी ३० मिनिटांपूर्वी केंद्रांवर उपस्थित राहण्याचे आवाहन परीक्षा मंडळाने केले आहे.
- पेट परीक्षेला ७६ विषय – ऑनलाइन पेट परीक्षेसाठी ७६ विषय आहेत. गेल्या पेट परीक्षेत सर्वसाधारण ६ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
Mumbai University announces The Examine Schedule of PET, LLM pre-examination. The much-awaited Ph.D. degree from the University of Mumbai. The application process for the Entrance Test (PET) and LLM Pre-Examination will finally begin from Saturday. Of these, the LLM pre-admission exam will be held on November 10 at various examination centres, while the PET exam will be held in the second week of November, the university said.
Both the exams will be conducted through online centre-based test (CBT) mode. The last date for submission of application for LLM entrance exam is November 3 and information related to the admission form, eligibility, registration fee and rules has been made available on the official website of The University of Mumbai. The last date for submission of application forms for the PET exam, which will be held in the second week of November, is October 31. There are 76 subjects for online PET and 6,000 students had appeared for the previous exam.
मुंबई विद्यापीठातर्फे पेट, एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
- मुंबई विद्यापीठातर्फे बहुप्रतिक्षित पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) आणि एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज भरण्यास आज, शनिवारपासून अखेर सुरुवात होणार आहे. यातील एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा १० नोव्हेंबरला विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार असून, पेट परीक्षा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेतली जाणार आहे, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
- या दोन्ही परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर असून, प्रवेश अर्ज, पात्रता, नोंदणी शुल्क आणि नियम अनुषंगिक माहिती मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या पेट परीक्षेचे प्रवेश अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर आहे. ऑनलाइन पेटसाठी ७६ विषय असून, मागील परीक्षेत सहा हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
MU PET 2021 Mumbai University’s PET (Phd Entrance Test PhD Pre-Examination) Examination Schedule has been announced. On Friday 17th and Saturday 18th, December 2021, subject-wise and subject-wise examinations will be conducted online. Vinod Patil said.
मुंबई विद्यापीठाच्या पेट परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
MU PET 2021 मुंबई विद्यापीठाच्या पेट (Phd Entrance Test पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. शुक्रवार १७ आणि शनिवार १८ डिसेंबर २०२१ रोजी विद्याशाखानिहाय आणि विषयनिहाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
यानुसार मानव्यविद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि आंतरविद्याशाखेच्या परीक्षा १७ डिसेंबर रोजी तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षा १८ डिसेंबर रोजी आयोजित केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ९ ते १५ डिसेंबर दरम्यान सराव (मॉक) परीक्षांचेही आयोजनही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे.
पेट परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये एकूण ४,४९९ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून २,६५४ एवढ्या मुलींनी तर १,८४५ एवढ्या मुलांनी अर्ज केले आहेत. विद्याशाखानिहाय विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी सर्वाधिक १,९२१ एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यानंतर मानव्यविद्याशाखेसाठी १,१३२, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ७४५ आणि आंतरविद्याशाखेसाठी ७०१ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. एकूण ७९ विषयांसाठी ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी रसायनशास्त्र विषयासाठी सर्वाधिक ४६९ एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापाठोपाठ इंग्रजी या विषयासाठी २२५ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत.