मुंबई विद्यापीठ पेट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
Mumbai University PET Exam Time Table
PET Exam Time Table: Mumbai University has announced the schedule for PhD and MPhil entrance exams. Accordingly, MPhil will be held on March 25 and PhD entrance examination will be held on March 26 and 27, 2021. The examination will be conducted online for a total of 79 subjects and a detailed subject wise schedule has been made available on the University’s website.
मुंबई विद्यापीठ पेट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परिक्षेसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार २५ मार्च रोजी एमफील तर २६ आणि २७ मार्च २०२१ रोजी पीएचडी प्रवेश परीक्षा होणार आहे. एकूण ७९ विषयांसाठी ही परीक्षा ॲानलाईन पद्धतीने होणार असून याबाबतचे सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मॅाक टेस्ट लिंक (PET Mock Test Link)
दिनांक १२ ते १७ मार्च दरम्यान विद्यार्थ्यांना मॅाक टेस्ट परीक्षा देता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना लघुसंदेश आणि ईमेलवर माहिती पाठविण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितले.