मुंबई विद्यापीठाचे ३० दिवसांच्या आत ७२ निकाल जाहीर – Mumbai University Results

Mumbai University Results

Mumbai University Results 2024 – Mumbai University has declared the results of 72 examinations for the winter session held in October and November 2023 within 30 days. Measures such as conducting exams according to the academic session, evaluating them on time and declaring the results within the stipulated time seem to have had a positive impact.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
मुंबई पोलीस दलातील १२ हजार ८९९ पदं त्वरित भरा, वर्षा गायकवाड
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
वनविभाग वनरक्षक भरती ऑनलाईन परिक्षेचा निकाल, गुणवत्ता यादी
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू”; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

तीस हजार शिक्षक भरती, शिक्षण आयुक्तांनी दिला महत्त्वाचा आदेश

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Mumbai University has declared the results of 72 examinations including BA, BCom, BSc, BPharm, BArch for the winter session. During the summer session, the results of many students were reserved as students made mistakes in barcodes and seating numbers. Their results could also not be declared within the stipulated time. Therefore, The University of Mumbai emphasized on measures in the winter session.

Till date, the results of more than one lakh students at the undergraduate level have been declared on time. The results of the three examinations were declared in 45 days. The results of the remaining examinations will also be declared on time, said The Director of Examinations and Evaluation Board. Prasad Karande said.

मुंबई विद्यापीठाचे ३० दिवसांच्या आत ७२ निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाने ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या हिवाळी सत्रातील ७२ परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर केले आहेत. शैक्षणिक सत्रानुसार परीक्षा घेणे, त्याचे मूल्यांकन वेळेवर करणे, निर्धारित वेळेत निकाल लावणे अशा उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसत आहे.

मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्रातील बीए, बीकॉम, बीएस्सी, बीफार्म, बीआर्च अशा ७२ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. उन्हाळी सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी बारकोड व आसन क्रमांकांमध्ये चूक केल्याने अनेक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव होते. त्यांचा निकालही निर्धारित वेळेत जाहीर होऊ शकला नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्रात उपाययोजनांवर भर दिला.

आजपर्यंत पदवी स्तरावरील एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यात आले आहेत. तीन परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत लागले. उर्वरित परीक्षांचे निकालही वेळेत जाहीर करण्यात येतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले.


Mumbai University Results for B.Com Examine 2023 – Mumbai University 3rd Year BCom Semester 5 Exam Result of Winter Session which was concluded in October 2023 of the final year of academic year 2023-24 has been declared within the stipulated time. The university has declared 18 results for winter session 2024 till date. The results of this examination are displayed on the university website http://www.mumresults.in/.

A total of 21745 students have successfully passed the BCom Session 5 examination. 60 thousand 073 students had registered for this exam. Out of them 57 thousand 692 students had appeared in the examination. So 2381 students were absent in the examination. Also 35874 students have failed in this exam. Also, there have been 73 copy cases in this exam. The result of BCom session 5 is 37.74 percent.

Mumbai University च्या बीकॉम सत्र ५ परीक्षेचा निकाल जाहीर; अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थितीचा प्रयोग यशस्वी

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या अंतिम वर्षाच्या ऑक्टोबर २०२३ मध्ये संपन्न झालेल्या हिवाळी सत्राच्या वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र ५ या परीक्षेचा निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी झाली असून कोणताही निकाल राखीव ठेवण्यात आलेला नाही. वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू डॉ.अजय भामरे, कुलसचिव डॉ. सुनील भिरूड व परीक्षा विभागाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मूल्यांकनाकडे विशेष लक्ष दिल्याने व शिक्षकांनी वेळेत मूल्यांकन केल्यानेच हा निकाल वेळेत जाहीर करणे शक्य झाले असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी व्यक्त केले.

बीकॉम सत्र ५ च्या परीक्षेमध्ये एकूण २१७४५ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ६० हजार ०७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५७ हजार ६९२ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर २३८१ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ३५८७४ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. तसेच या परीक्षेत ७३ कॉपी केसेस झाल्या आहेत. बीकॉम सत्र ५ चा निकाल ३७.७४ टक्के लागला आहे.

अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी :

उन्हाळी सत्राच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी आसन क्रमांक व बारकोड चुकीचे लिहिले होते, यामुळे त्यांचे निकाल राखीव राहिले होते, नंतर ते जाहीर झाले. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने या हिवाळी सत्रापासून विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक, बारकोड व इतर माहिती असलेली पीडीएफ फाईल प्रत्येक परीक्षा केंद्रांना पाठविलेली होती. ती फाईल परीक्षा केंद्राने डाऊनलोड करून विद्यापीठाने दिलेल्या स्टिकरवर प्रिंट करून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर चिकटविली गेली. यावर क्यूआर कोड असल्याने विद्यार्थ्याची सर्व माहिती विद्यापीठास मिळाली व या कारणासाठी विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहिले नाहीत. तसेच विद्यार्थी परीक्षेत उपस्थित आहे का नाही यासाठी ऑनलाईन उपस्थिती पद्धत सुरू करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र विद्यार्थ्याची उपस्थिती विद्यापीठाच्या ऑनलाईन उपस्थिती प्रोग्राममध्ये नोंदवली गेली .यामुळे विद्यार्थी उपस्थित आहे का नाही ते तात्काळ विद्यापीठास समजले.

विद्यापीठाने आजपर्यंत २०२४ च्या हिवाळी सत्राचे १८ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.


Final Year Exam Result  : Mumbai University Results 2020: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष/ सत्राच्या नियमित परीक्षेतील तृतीय वर्ष बीए, बीएस्सी व बीएमएस सत्र ६ या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आजपर्यंत विद्यापीठाने ८७ परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत.आज विद्यापीठाने १३ परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत.

तृतीय वर्ष बीए सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९४.७० टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण ९ हजार ७८२ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १३ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १३ हजार ५३७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. तर १०० विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच ५४७ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.

तृतीय वर्ष बीएस्सी सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९७.८५ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण ८ हजार ०२५ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १० हजार ५२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १० हजार ४४७ परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर ७६ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच १७६ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.

तृतीय वर्ष बीएमएस सत्र ६ या परीक्षेचा निकाल ९७.५८ टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण १३ हजार १६६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १५ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १५ हजार ७०७ परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर ४४ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच ३२७ विद्यार्थी हे परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षा विभागातील निकाल कक्ष व सीसीएफ मधील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग निकाल जाहीर करण्यासाठी कार्यरत आहेत.

निकाल – http://www.mumresults.in/


मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम, बीएमएम परीक्षांचे निकाल जाहीर

Final Year Exams Results 2020 Bcom, Bmm Results

मुंबई विद्यापीठाचा बीकॉम आणि बीएमएमचा निकाल जाहीर झाला आहे…

मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम, बीएमएम परीक्षांचे निकाल जाहीर

 

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२०च्या अंतिम वर्षाच्या नियमित परीक्षेतील बीकॉम आणि बीएमएमचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बीकॉमच्या सत्र ६चा निकाल ९५.७९ टक्के, तर बीएमएमचा निकाल ९६.११ टक्के इतका लागला आहे.

बीकॉमच्या परीक्षेत एकूण ४९ हजार २९३ एवढे विद्यार्थीउत्तीर्ण झाले. या परीक्षेला ६४ हजार ७४७ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६४ हजार १८२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, तर ५३९ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. यासह बीएमएम सत्र ६च्या परीक्षेत एकूण तीन हजार ९५७ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेसाठी एकूण चार हजार ९४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी चार हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या वेबसाइटवरील http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने प्रथमतःच सत्र ६ सह नियमित मुख्य परीक्षेच्या सर्व निकालांच्या नमुना गुणपत्रिका गुण, ग्रेड व छायाचित्रासह विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांने त्यांच्या कॉलेजच्या नावाची निवड करून आसन क्रमांक टाकल्यास ही गुणपत्रिका छायाचित्रासह पीडीएफ फॉर्मेटमध्ये उपलब्ध होणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

‘अन्य निकालही वेळेत लागणार’
मुंबई विद्यापीठाच्या सर्व नियमित आणि बॅकलॉग परीक्षांच्या निकालास सर्वोच्च प्राधान्य देऊन वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठाने यशस्वी नियोजन केले आहे. कॉलेजांनी वेळेत पोर्टलवर गुण उपलब्ध करून दिल्यामुळे अल्पावधीतच विद्यापीठाने हे महत्वाचे निकाल जाहीर केले आहेत. इतरही सर्व निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यापीठाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Mumbai University Results

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!