Mumbai University Started Helpline For Student
मुंबई विद्यापीठाची विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुरु
Mumbai: As per the directions of the University Grants Commission (UGC) and the Department of Higher and Technical Education of the State Government, the University of Mumbai has started a helpline number and email facility for students regarding university examinations and admission to the next class on the background of Kovid-19. Students can contact this helpline number and email for guidance on exams and admission to the next class.
मुंबई: विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी ) व राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाने कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक व ईमेल सुविधा सुरु केली आहे. विद्यार्थी या हेल्पलाईन क्रमांकावर व ईमेलवर संपर्क साधून परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन घेऊ शकतील.
कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरु असल्यामुळे विद्यापीठ व महाविद्यालये यांच्या परीक्षाबाबत राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समिती नियुक्त केली होती, त्या समितीच्या शिफारशीनुसार पदवी व पदव्युत्तर वर्षाच्या अंतिम सत्राच्या / वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. पदवीस्तरावरील द्वितीय व तृतीय वर्षाच्या व पदव्युत्तर द्वितीय वर्षाच्या प्रवेशाविषयीही निर्देश दिले होते. या संदर्भात अधिक तपशील विद्यापीठ प्रसिद्ध करेल असे जाहीर केले होते. यानुसार विद्यापीठ परीक्षा व प्रवेशाबाबत एक कृती योजना ( Action Plan ) तयार करीत आहे. यामध्ये प्रत्येक विद्याशाखेनुसार ( Faculty wise ) त्याचा सविस्तर तपशील लवकरच जाहीर करणार आहे.
विद्यापीठ हेल्पलाईन क्रमांक : + ९१ ९६१९० ३४६३४ व + ९१ ९३७३७ ००७९७
ईमेल : [email protected]
आयडॉलच्या विद्यार्थ्यांसाठी ईमेलद्वारे मदत
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या विद्यार्थ्यांकरिता
[email protected] या ईमेलवर संपर्क साधावा. या ईमेलवरून विद्यार्थी परीक्षा व प्रवेशाबाबत आपल्या समस्येचे निराकरण करू शकतील.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या आणि संस्थांच्या तक्रारी आणि त्यांचे निवारण कसे होत आहे, यावर देखरेख ठेवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने एका टास्क फोर्सची देखील स्थापना केली आहे. विद्यापीठांनी असे तक्रार निवारण कक्ष स्थापन केल्यावर त्यासंबंधीची माहिती सर्व विद्यार्थ्यांना कळवावी, अशा सूचनाही विद्यापीठ अनुदान आयोगाने केल्या आहेत.
my bcom aplication is wrong i tried to delete this and apply new application please help me and please tell procedure
This number is not working…. i am contuniously call on this number but every time this number is not rechebal…i think this fake number