Nagpur Postal -टपाल विभागात पोस्टमन पदांची तीनशेहून अधिक पदे रिक्त
Nagpur Postal Vibhag Bharti 2022-Notification, Vacancy, Pay Scale, Apply Link
Nagpur Postal Department Recruitment 2022
Nagpur Postal Department Bharti 2022: There are 303 vacant posts in Nagpur Postal Department including 175 Postmen. Due to vacancies in the postal department, the workload of the employees has increased. Read More details about Nagpur Postal Department Recruitment 2022 are given below.
आधुनिक जगातही स्वतःचे अस्तित्व टिकवून असलेल्या टपाल विभागात रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. नागपूरचा विचार करता, विविध पदांवरील ३०३ पदे रिक्त असून त्यात सर्वाधिक १७५ पोस्टमनचा समावेश आहे.
टपाल विभागात पोस्टमन पदांची तीनशेहून अधिक पदे रिक्त :
Nagpur Postal Vibhag Bharti 2022 Vacancy Details
- रेल्वे, पोस्ट, बीएसएनएल या सरकारी विभागांशी असलेले नागरिकांचे नाते जिव्हाळ्याचे आहे. जुन्या पिढीच्या हृदयाजवळ असणारी ही खाती नव्या पिढीलाही आपलीशी वाटतात. टपाल विभागाने काळानुरूप स्वत:मध्ये बदल केल्यामुळे हा विभाग जिवंत आहे.
- मात्र, मनुष्यबळाची कमतरता, वाढलेली कामे यामुळे कर्मचाऱ्यांवर भार पडत असल्याचे चित्र आहे. प्राप्त माहितीनुसार, सद्यस्थितीत शहरात एकूण ६६ पोस्ट ऑफिसेस असून २०७ पत्रपेट्या (लेटर बॉक्स) आहेत.
- त्याशिवाय सबपोस्ट मॅनेजर-४५, पोस्टल असिस्टंट-३०७, पोस्टमन-१५९, मल्टिटास्किंग स्टाफ-६६ असे एकूण ५७७ कर्मचारी कार्यरत आहेत. तर ३०३ पदे रिक्त आहेत. त्यात सबपोस्ट मॅनेजर-१४, पोस्टल असिस्टंट-६७, पोस्टमन-१७५, मल्टिटास्किंग स्टाफ-४७ यांचा समावेश आहे.
- या सर्व पदांची पूर्तता झाल्यास विद्यमान स्थितीत कार्यरत कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होऊन योग्य व्यवस्थापन होऊ शकेल, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.
- नवीन भरती हवी – इतर सरकारी विभागांप्रमाणेच टपाल विभागातही नवीन भरतीप्रक्रिया मोठ्या प्रमाणात आणि नियमित स्वरूपात नाही. रिक्त जागांच्या तुलनेत भरतीचे प्रमाण कमी असल्याने कामावर परिणाम होत आहे.