पदवीधारकांनासाठी भारतीय नौसेनात नोकरीची संधी

Naval Dockyard Recruitment 2020

Indian Navy Bharti 2020: Job Opportunities for BSc graduate candidates in Naval Dockyard. The Western Naval Command Headquarters has made space for the post of Scientific Assistant in this dock, which is mainly used for boat repair and maintenance.Interested candidates may apply before the last date more details are given below.

Naval Dockyard Recruitment 2020  : बीएस्सी पदवीधारक उमेदवारांना नौदल गोदीत नोकरीची संधी आहे. प्रामुख्याने नौका दुरुस्ती तसेच देखभालीचे काम होणाऱ्या या गोदीत वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी पश्चिम नौदल कमांड मुख्यालयाने जागा काढल्या आहेत.

पदवीधारकांनासाठी भारतीय नौसेनात नोकरीची संधी

कुलाब्यात नौदलाचा मोठा तळ आहे. नौदलाच्या युद्धनौका तसेच पाणबुड्या तेथे उभ्या केल्या जातात. तसेच समुद्रात उतरण्याआधी या नौकांची संपूर्ण देखभाल व दुरुस्तीदेखेल ‘गोदी’तच (डॉकयार्ड) केली जाते. कुलाब्यातील या गोदीतच नौदलाच्या पश्चिम कमांडचे मुख्यालय आहे. त्यांनीच या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या पदाची जाहिरात काढली आहे.

जाहिरातीनुसार, उमेदवारांना 15 जानेवारीपर्यंत यासाठी अर्ज करायचा आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स किंवा समुद्री विज्ञान (ओशनोलॉजी) यापैकी कुठल्याही विषयात विज्ञान पदवी (बीएस्सी) घेतलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. परंतु त्याखेरीज उमेदवारांना धातू विश्लेषण, धातू तंत्रज्ञान किंवा यांत्रिक कंपने (व्हायब्रेशन), त्याच्याशी संबंधित विश्लेषण तसेच तंत्रज्ञान किंवा वंगण रसायनशास्त्र अशा प्रकारच्या कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे अत्यावश्यक आहे. उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे. उमेदवाराची आधी १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. सामान्य इंग्रजी, अंकात्मक क्षमता व सामान्य बुद्धिमता यासाठी प्रत्येकी दहा गुण, विज्ञान व तंत्रज्ञानासाठी २० गुण तसेच संबंधित क्षेत्रावर आधारित ५० गुणांची ही परीक्षा असेल. अर्जासंबंधीची माहिती केंद्र सरकारच्या http://employmentnews.gov.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.

जागांचा प्रवर्गनिहाय तपशील –Vacancy Details 

एकूण १४ जागा

प्रवर्ग जागा

  • खुला ६
  • इतर मागासवर्ग ३
  • एससी २
  • एसटी २
  • आर्थिकदृष्ट्या मागास १

अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा 

1 Comment
  1. Naval Rathod says

    Good bhejo muze

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!