GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Navi Mumbai Arogya Vibhag Bharti 2020

Navi Mumbai Arogya Vibhag Bharti 2020

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात भरती

NMMC Arogya Vihag Bharti 2020 – Navi Mumbai Mahanagarpalika published an advertisement for the recruitment of Medical Officer and Nurse. There are total 180 vacancies available for these posts. Eligible and interested candidates will be apply for these posts from 8th May 2020 to 13th May 2020. The other important details like age limit, pay scale how to apply, educational critieria etc., given briefly below on this page. Apply link also given below candidates keep visit on our website for the further updates.

NMMC Arogya Vihag Bharti 2020

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी आरोग्य विभागात मेगा भरती केली जाणार आहे. यानुसार साहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यासह कर्मचारी आणि परिचारिका यांची मिळून १८० पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी पालिकेकडे १३ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. गेल्या वर्षीही महापालिकेच्या आरोग्य विभागात भरती करण्यात आली होती. मात्र या भरतीप्रक्रियेला हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे वारंवार जाहिराती देऊन पालिकेने रुग्णालयात डॉक्टरांच्या आणि परिचारिकांच्या भरतीसाठी आवाहन केले होते आणि त्यानुसार काही पदे भरण्यात आली होती. मात्र अद्यापही यातील काही पदे रिक्त आहेत. आत्ता आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे नव्याने भरती केली जात आहे.

या पदांची वेतनश्रेणी २५ हजारांपासून ते ६५ हजारांपर्यंत असणार आहे. थेट मुलाखतीद्वारे निवडप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी ८ ते १३ मे या दरम्यान नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात, प्रमाणपत्रासहित थेट हजर राहावे, असे आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. तर ,परिचारिकांची १२वी उत्तीर्ण आणि गीएनएन डिप्लोमा ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे.

सौर्स : मटा

Leave A Reply

Your email address will not be published.