NDA Exam Results Declared
NDA Exam Results Declared
NDA परीक्षेचा निकाल UPSC कडून जाहीर
पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रोधिनीतील (एनडीए) प्रवेशासाठी 17 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल केंद्रीय नागरी सेवा आयोगाने (यूपीएससी) घोषीत केला आहे. या परिक्षेत देशभरातील एकूण 7034 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
एनडीए ही सर्वोत्तम लष्करी प्रशिक्षण संस्थेपैकी एक आहे. तीनही दलातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करणारी जगातील एकमेक प्रबोधिनी आहे. जुलै 2020 च्या प्रवेशासाठी यूपीएससीकडून परिक्षा घेण्यात आली. त्यानुसार आता उत्तीर्ण उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर पुढील दोन आठवड्यात नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.
मुलाखतीमधून साधारण 300 उमेदवारांची वैद्यकीय चाचणीनंतर एनडीएतील तीन वर्षाच्या अंतिम प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. निकालाबाबत अधिक माहितीसाठी व स्तव:चे नाव तपासण्यासाठी यूपीएसीसीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.